मुंबई : जून महिन्यात समाधानकारक न बरसलेला मान्सूनचा पाऊस जुलै महिन्यात तूट भरून काढणार आहे. राज्यात सर्वत्र 5 जुलैपासून चांगला पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. मुंबई, कोकणात या महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत आहे. आता ओरिसा व लगतच्या भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकत आहे. त्यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 5 जुलै पासून राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. हा पाऊस पुढील 4-5 दिवस राज्यात सर्वत्र समाधानकारक बरसत राहील, असे “आयएमडी”चे पुणे वेधशाळा प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.
याशिवाय, दाते पंचांगानुसारही मृग आणि आद्रा नक्षत्र कोरडी गेल्यानंतर आता पुढील सर्व नक्षत्रात चांगला पाऊस बरसणार आहे. विशेषत: जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ऑगस्टच्या पूर्वार्धात जोरदार पाऊस होईल. आता उर्वरित नक्षत्रात एकूण 60 दिवस पाऊस होणार असल्याचे नक्षत्र गणित आणि पंचांग अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी म्हटले आहे.
पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील नवीन अविष्कार नॅनो युरिया, शेतकऱ्यांसाठी सदैव लाभदायक
खरिप हंगामातील पिकांना मिळणार जीवदान
आपल्या परिसरात 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे वारंवार आव्हान केले जात असतानाही राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी “आयएमडी”च्या पहिल्या अंदाजावर भिस्त ठेवून पेरण्या केल्या. कमी-अधिक पावसाच्या जोरावरच राज्यात गेल्या महिन्याभरात 60 लाख हेक्टरावर खरीप पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने ओढ दिलेली असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अशीच स्थिती राहिली तर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. जुलै महिन्यातील पावसावरच खरिपाचे भवितव्य ठरणार आहे. ऐन गरजेच्या वेळी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली तरच आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या खरिप हंगामातील उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडू शकणार आहे.
कोकण, विदर्भात ऑरेंज अलर्ट
जुलै महिन्यात देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा ताजा अंदाज आहे. या अंदाजामध्ये कमी अधिक पाच टक्के राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 98 ते 102 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात 5 जुलैपासून पावासाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असला तरी 3 जुलैपासूनच संपूर्ण राज्यात पाऊस सक्रीय होत आहे. त्याचा जोर काही भागात जास्त राहील व पुढे 8 जुलैपर्यंत तो सर्वत्र जोरदार बरसेल. “आयएमडी”ने सोमवारपासून कोकण आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, पालघर, ठाणे, मुंबईत यलो ॲलर्ट जारी आहे. आतापर्यंत भरपूर पाऊस झालेल्या कोकणातच नाहीतर बऱ्याच भागात सातत्याने बरसलेल्या मराठवाड्यातही विजेंच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज आहे. संपूर्ण जुलै महिन्याच्या अंदाजात मात्र विदर्भात काहीशी तूट राहण्याची शक्यता आहे. हवेच्या दाबाचे वातावरण अनुकूल नसल्याने निम्मा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व बराचसा मध्य महाराष्ट्र अजून कोरडा आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, जून महिन्यात पावसाची भासलेली उणीव जुलै महिन्यात पूर्ण झाली तरच खरीप हंगामातील रखडलेल्या कामांना वेग येणार आहे.
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीवर येणार नियंत्रण; राज्याच्या बीड पॅटर्न प्रस्तावाला केंद्राची मान्यता
“स्कायमेट”चाही पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागा कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असतानाच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने देखील पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम किनार्याजवळील समुद्रकिनाऱ्यावरील कमी दाबाच्या पट्टा आणि मध्य प्रदेश आणि लगतच्या भागांवर असलेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढेल आणि राज्यभरात मान्सून सक्रीय राहील. तर, मंगळवार दि. 5 जुलै पासून पावसाची तीव्रता अधिक होण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.
डॉ. साबळेही म्हणतात, आता पाऊस येणार मोठा
हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांनीही वातावरण बदलत असून जुलै चांगला पाऊस पडणार असल्याचे तसेच 15 जुलैनंतर तो वाढणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या महिन्यापासून कोकणाशिवाय राज्यात हवेचा दाब 2006 रेक्टापास्कलपेक्षा जास्त आहे. आता त्यात सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मराठी नक्षत्रांत जो पाऊस पडायला हवा, तो बहुतांश भागात अजूनही पडलेला नाही. पडलाच नाही. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. मृग, आर्द्रा नक्षत्रे कोरडीच गेली. दाते पंचांगानुसार, यंदा जून महिन्यात पावसाचा अंदाज नव्हता. कारण या महिन्यातील मृग आर्द्रा ही दोन नक्षत्रे प्रतिकूल होती. परंतु पुढील आषाढ, श्रावण, भाद्रपद महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. दाते पंचांगानुसार, पंचांगात पुष्य नक्षत्रांचे गणित मांडून हा अंदाज व्यक्त केला जातो.
Central Maharashtra and Maharashtra will receive normal to above-normal rainfall in July this year, as per India Meteorological Department (IMD) forecast. However, Vidarbha is likely to receive below-normal rainfall in July.
Ajay Pawar