यंदा 100% पावसाची शक्यता; हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज
पुणे: उन्हाच्या वाढत्या झळांमुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने IMD वर्तवला आहे. त्यापूर्वी ३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.
हवामान खात्याने गुरुवारीच मान्सून १ जूनला केरळात दाखल होईल, असे म्हटले होते. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल विनासायास होईल, असे IMD ने म्हटले होते.
दरम्यान मालदीव-कोमोरिन परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरुवातही झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागराचा परिसर व अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरातही काहीप्रमाणात मान्सूनच्या सरी बरसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
100 टक्के पावसाची शक्यता
हवामान खात्याने दक्षिण-पश्चिम मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तविला आणि ते म्हणाले की २०२० च्या पावसाळ्यात सरासरीचा कालावधी हा + + किंवा -5% मॉडेल त्रुटीमुळे यावर्षी १००% राहील. यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्याचबरोबर हवामान खात्याने सांगितले की, देशातील बर्याच भागात मान्सूनचे आगमन आणि परतीची तारीख बदलली असून, केरळमध्ये मान्सून 1 जूनपासून दाखल होईल, तर 23 जूनच्या सुरुवातीला दिल्लीत मान्सून येण्याची शक्यता आहे.