लहान शेतकऱ्यांना परराज्यात विकता येईल शेतमाल…!
मागील पंधरवड्यात सुरु झालेली किसान रेल्वे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अनेक संकटाना सामोरे जावे लागले हीच बाब लक्षात घेत सरकारने किसान रेल्वे सुरू केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आठवड्यातून एकदा किसान रेल्वे नाशिकमधील देवळालीहून मुझफ्फरपूरपर्यंत जात आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने केलेल्या नियोजित वेळापत्रकानुसार किसान रेल्वेची वारंवारता आठवड्यातून दोनदा करण्यात येईल. अशी माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी दिली.
शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाहतूक एकदम स्वस्त आणि कमी वेळेत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी रेल्वेहून सोपे व जलद साधन नाही. २१ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या सहाय्याने देवळाली ते मुझफ्फरपूरपर्यंत महाराष्ट्रातून २३५ टन माल वाहून नेला होता. ज्यामध्ये डाळिंबासह लिंबू, फुलकोबी, मासे, मिश्र भाज्या, मिरची तसेच इतर कृषी उत्पादनांचा समावेश होता.
किसान रेल्वेबरोबर शेतकऱ्यांना इतर सेवा सुद्धा पुरवल्या जातील यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. या रेल्वे सेवेचा फायदा फक्त मोठे शेतकरी नाही तर ज्यांच्याकडे लहान शेती भाग आहे. याना सुद्धा मिळू शकेल, या सेवेमुळे स्थानिक शेतकरी, APMC, या शिवाय इतर कृषी उत्पादनाची उलाढाल करण्यास होणार आहे. किसान रेल्वे कोल्हापुरपासून-देवळाली-मुझफ्फरपूर या मार्गाने जाणार आहे, यामुळे भारतातील अनेक राज्यांना याचा फायदा होणार आहे.