• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

असे करा आंबा मोहोराचे संरक्षण…!

Team Agroworld by Team Agroworld
January 7, 2021
in तांत्रिक
0
असे करा आंबा मोहोराचे संरक्षण…!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान  होतांना दिसून येते.  जुलै किंवा ऑगष्ट महिन्यात पावसाचा खंड पडला तर अशा वेळी बागेमध्ये आंब्याला मोहोर यायला सुरुवात होते. विशेषतः समुद्रानजीकच्या आंबा बागेमध्ये अवेळी मोहोर येण्याची  दाट शक्यता असते. प्रमुख व दुय्यम पोषण द्रव्यांची कमतरता, संजिवकांचा आभाव, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या कारणांमुळे मोहोर गळ आणि फळगळ होते.

पॅक्लोब्यूट्रझोल वापरलेल्या बागांमध्ये उशिरा म्हणजे नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये मोहोर येण्याची दाट शक्यता असते. हमखास मोहोर येण्यासाठी २ मिलि. क्लोरमेक्रॉट क्लोराईड प्रति लिटर या प्रमाणात दोन फवारण्या दहा दिवसांच्या अंतराने केल्यास फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर चार टक्के पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या दहा दिवसांच्या अंतराने केल्याससुद्धा मोहोर येण्यास मदत होते; मात्र आलेल्या मोहोराचे चांगल्या प्रकारे  संरक्षण करून जास्तीत जास्त फळधारणा कशी होईल, यावर लक्ष केंद्रित करावे लागते. आंब्याची उत्पादकता ही मोहोरावरील कीड व रोगापासूनचे संरक्षण या बाबीवर अवलंबून आहे. त्यामुळे आंबा मोहोराचे संरक्षण करणे फुलकिडे, मीजमाशी, शेंडा पोखरणारी अळी इत्यादी किडींचा
कीड व्यवस्थापन
तुडतुडे
आंब्यावरील ही महत्वाची नुकसानकारक कोड असून या किडीच्या विविध २o ते २२ जातींची नोंद झालेली आहे. पैकी महत्वाच्या तीन जाती म्हणजे अम्रीटोडस अटकिनसोनी, इडिआस्कोपस क्लायपिअॅलीस आणि इडिओस्कोपस निव्हीओस्पार्सस या प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास संपूर्ण मोहोर कर्पून जातो. जवळपास ७० ते ८० टक्क्यापर्यंत आंबा उत्पादनात घट येते. नियंत्रण

● आंब्याची लागवड शिफारस केलेल्या अंतरावरच करावी. जास्त दाटी झालेल्या बागेत कमी सुर्यप्रकाश तसेच कोंदटपण जास्त

बाग स्वच्छ तणविरहित ठेवावी. झाडाच्या आतल्या भागातील फांद्याची छाटणी करून विरळ कराव्यात जेणेकरून सुर्यप्रकाश संपूर्ण झाडत पोहोचेल.

● जैविक नियंत्रणांतर्गत निंबोळी अर्क ५ टक्के किंवा निमयुक्त किटकनाशकांचा फवारणी करिता अधून – मधून वापर करावा. तुडतुडे वर्षभर झाडावर असल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यापूर्वी व्हर्टिसिलियम लेकॅनी या मित्र बुरशीवर आधारित कीटकनाशकाची २o५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी e) इमीडाक्लोप्रीड ३ मिली किंवा क्लोथीयानिडीन (दाणेदार) १.२ ग्रॅम किंवा थायामेथोक्झाम १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

शेंडा पोखरणारी अळी

जेव्हा झाडाला किंवा कलामांना कोवळी फुट निघते. त्यावेळेस या किडीचा प्रादुर्भाव होतो. तसेच मोहोर येण्याच्या वेळीही या अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचा पतंग काळसर बदामी रंगाचा असून त्याची लांबी १५ ते २० मि.मि. असते. या किडीची मादी (पतंग) कोवळ्या पानांच्या देठावर तसेच मोहोराच्या देठावर / दांड्यावर अंडी घालते. अळीची वाढ होत असताना तिचा रंग गुलाबी होत जातो व त्यावर पांढरे ठिपके असतात. पानाच्या देठातून शेंड्यात/फांदीत शिरताना ती जे छिद्रे पाडते. त्या छिद्रातून विष्ठा बाहेर येताना

दिसते. अशी विष्ठा कोवळ्या पालवीवर आढळून आल्यास या किडींचा प्रादुर्भाव झाला असे समजावे.

नियंत्रण

● नवीन लागवड केलेल्या बागेत या किडीचा उपद्रव जास्त असतो. कारण नवीन बाग वाढीच्या अवस्थेत असताना वारंवार नवीन कोवळी फुट येत असल्याने या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी वेळीच संरक्षण झाले नाही, तर झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. म्हणून प्राथमिक अवस्थेतच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच केिडग्रस्त शेंडे किडीच्या अवस्थेसह काढून जाळून नष्ट करावेत.

● कोवळी फुट निघल्यानंतर कार्बारिल ५० टक्के प्रवाही ०.२ टक्के किंवा क्रिनॉलफॉस २५ टक्के प्रवाही o.o५ टक्के किंवा निंबोळी अर्क ५ टक्के किटकनाशकांची फवारणी करावी.

खोडकिडा

कीटकाच्या मादीने झाडाच्या सालीवर घातलेल्या अंड्यातून निघालेल्या पिवळसर रंगाच्या अळ्या सालीखालचे खोडही पोखरतात. खोडावर लहान छिद्र व त्यातून गोंद आणि भुसा आलेला मरते.

नियंत्रण

● खोडकिडीमुळे जे छिद्र पडते छिद्रामधून टोकेरी तार घालून आतील अळी बाहेर काढावी. या छिद्रामध्ये क्लोरप्पायरीफॉसच्या द्रावणात भिजवलेले कापसाचे बोळे तारेच्या सहाय्याने घुसवावेत. तोंड चिखलमातीने बंद करून घ्यावे. किडीच्या विविध अवस्था आतमध्ये मरुन जातील.

● याचप्रमाणे, साधे पेट्रोल किंवा दोन भाग कार्बन डायसल्फाइड, एक भाग क्लोरोफॉर्म व क्रिओसोटाचे मिश्रण अळीने पाडलेल्या भोकात पिचकारीने मारून भोक चिखलाने बंद करतात, विषारी वाफेने अळ्या मरून जाऊन झाड वाचते.

● एखाद्या फांदीला जास्त प्रादुर्भाव आढळल्यास अशी फांदी काढून जाळून टाकावी.

मिजमाशी

ही आंबा फळपिकावरील दुय्यम महत्वाची कोड आहे. मीजमाशीची मादी माशी मोहोर फुटल्यानंतर कोवळ्या दांड्यामध्ये अंडी घालते. या अंड्यातून २ ते ३ दिवसात पिवळसर रंगाची अळी बाहेर आल्यानंतर देठाच्या आतील भाग खाते. एका वर्षात या किडीच्या ३ ते ४ पिढ्या पूर्ण होतात. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास फुले व फळे गळून पडतात. नियंत्रण

● मीजमाशीची अळी जमिनीत कोषावस्थेत जाता असल्याने बागेतील करावी. जेणेकरून सुमावस्थेतील किडीचे कोष उन्हाने तापून मरून जातील किंवा पक्षी वेचून खातील.

● झाडाखालील जमीन चाळल्यानंतर जमिनीमध्ये मिथील पॅराथिऑन या कीटकनाशकाची २ टक्के भुकटी मातीत मिसळावी. म्हणजे झाडाखालील  जमिनीतील अळ्या आणि कोशांचे नियंत्रण होईल.

● आंब्याचा मोहोर फुटू लागताच फेनीट्रोथिऑन १ मिली किंवा डायमेथोएट १.२५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून झाडांवर

फवारणी कारवी.

फुलकिडे

रोपवाटिकेतील आंब्याच्या कलमांच्या नवीन फुटीवर, झाडांच्या कोवळ्या पानांवर तसेच मोहोरावर या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. फुलकिडे आकाराने अतिशय सुक्ष्म असल्याने सहजपणे दिसत नाहीत. या किडीची पिले तसेच प्रौढ फुलकिडे कोवळ्या पानांचा पृष्ठभाग खरडून आतील रसावर उपजिवीका करतात. प्रादुर्भाव झाल्यास विशेषत: मध्यशीर, उपशिरा तसेच पानांच्या कडा प्रथम विटकरी होतात. पाने वेडीवाकडी होतात. करपतात व पानगळ होते. फळांची साल खरवडल्यामुळे ती खाकी, खडबडीत होते. फळांचा आकार लहान राहतो व बाजारातील प्रत घटते. नियंत्रण : फुलकिड्यांच्या नियंत्रणाकरिता किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोयेट ३oटक्के प्रवाही o.o३ टक्के, फोझॉलोन ५० टक्के प्रवाही o.o५ टक्के, निंबोळी अर्क ५टक्के यापैकी एका किटकनाशकाची संपूर्ण झाडावर फवारणी करावी.

रोग व्यवस्थापन

  1. भुरी : आंबा फळपिकावरील फारच नुकसानकारक असा हा रोग आहे. या रोगामुळे मोहरावर व दांड्यावर कवकाची पांढुरकी वाढ होते. रोगाचा प्रसार वा-यामुळे होतो. या बुरशीची बीजे कोवळ्या मोहोरावर किंवा पालवीवर उगवतात. त्यांची मुळे मोहोराच्या पेशींमध्ये शिरून अन्नरस शोषतात. सुरुवातीला रोगाची लागण मोहोराच्या शेंड्याच्या भागात होऊन नंतर इतरत्र पसरते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणत झाल्यास आंब्याच्या मोहोराचे जवळपास ७o ते ८० टक्के नुकसान होऊ शकते. नियंत्रण : प्रादुर्भावग्रस्त झाडावर हेक्झाकोनॅझोल ५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  2. करपा : रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांपेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांची रोगग्रस्त देठे काळी पडतात, पाने खाली वाकतात, लक्षण दिसून येते. काही वेळा डागांमुळे संपूर्ण फळ पडते. डागांवर खोल चिरा निर्माण होतात. बुरशी फळात खोल शिरते व फळे नासतात. नियंत्रण : या रोगाच्या नियंत्रणासाठी काबॅन्डेझीम एक ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  3. बांडगुळे : जुन्या झाडांवर बांडगुळे मोठ्या प्रमाणावर वाढतात. फांद्यांना अत्रपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात. उपाय म्हणून संबंधित फांद्या छाटून टाकाव्यात. मोहोर संरक्षण आबा मोहोरख्या संरक्षणासाठी क्रायसोपली कार्निया या परोपजीवी किडीच्या १o ते १५ हजार अळ्या प्रति हेक्टर झाडावर सोडाव्यात अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीवर आधारित कीटकनाशक चार ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे किंवा कार्बारिल (५० टक्के) २0 ग्रॅम अधिक पाण्यात मिसळणारे ८0 टक्के गंधक हे २0 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  4. आंबा मोहोर संरक्षणाचे वेळापत्रक १. ऑक्टोबरचा तिसरा आठवडा क्रेिनॉलफॉस २५ टक्के २0 मिली + सायपरमेश्रीन १० टक्के ५ मिली + डायथेन एम-४५ ३0 ग्रॅम + १0 लिटर पाणी. २. १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३0 ग्रॅम + इमामेक्टीन बेझोएट ५ ग्रॅम + १o लिटर पाणी. ३. १५ ते २0 नोव्हेंबर दरम्यान मिथिल डिमिटॉन २o मिली + ८o टक्के सल्फर २0 ग्रॅम + १o लिटर पाणी. ४. १ ते ५ डिसेंबर दरम्यान डायक्लोरोव्हॉस २0 मिली + प्रोपिकोनॅझॉल ५ मिली + डायकोफॉल २o मिली + १o लिटर पाणी. ५. २0 ते २५ डिसेंबर दरम्यान कार्बन्डॅझीम १o ग्रॅम + स्पिनोसॅड ५ मिली + १0 लिटर पाणी ६. फळे साधारणपणे ज्वारीच्या आकाराची झाल्यानंतर जिब्रेलीक ऍसीड १ ग्रेम अएँसिटोन ६0 मिली किवा अल्कोहोल १00 मिली + १ किलो युरिया अचिलेटेड झिंक २५० ग्रॅम + १oo लिटर पाणी.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आंबा मोहोराचे संरक्षणकरपाकृषी विभागक्रेिनॉलफॉसझिंकडायकोफॉलडायथेनप्रोपिकोनॅझॉलबांडगुळेभुरीमहाराष्ट्र शासनसायपरमेश्रीन
Previous Post

पावनखिंड भाग – 22 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

राज्यात या ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज…!

Next Post
राज्यात या ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज…!

राज्यात या ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज...!

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.