महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेततळे मोठयाप्रमाणात तयार होत असून या शेततळयाचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येतो.मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदाससाठी त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मासे उत्पादन करुन त्या पासून व्यवसाय करून उत्पन्न मिळविणे हा त्यातील एक उद्देश आहे.
मत्स्यपालनातून मिळणारा फायदा:
या माशाचा संवर्धन काळ दहा महिने इतका असतो. या कालावधीमध्ये माशाची वाढ एक किलो पेक्षा जास्त होऊ शकते.
मत्स्य शेती करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बारमाही पाणी असणे आवश्यक आहे. तसेच मत्स्यबीज हे चांगलं कॉलिटी असणे आवश्यक आहे. मत्स्य पालना मध्ये आपणास कमी वेळेत भरपूर नफा कमावता येतो.
मत्स्यपालनाचा शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा….
शेततळ्यामध्ये मासे पालन करताना शेतकऱ्यांना फायदा होतो तो म्हणजे शेतीसाठी पाणी देखील उपलब्ध होते व मत्स्य पालन व्यवसाय देखील होतो. त्यामुळे दुहेरी आर्थिक लाभ मिळतो.