२२ मे रोजी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा.
प्रतिनिधी’ जळगांव
अम्फान चक्रीवादळाने बंगालच्या किनारपट्टीवरील राज्यात जीवित व वित्त हानी केल्यानंतर त्याचे परिणाम आता महाराष्ट्र राज्यावर दिसायला सुरुवात झाली आहे. बंगाल उपसागरात आलेल्या या चक्रीवादळाने हवेतील बाष्प खेचून नेल्याने राज्यातील हवामान कोरडेपण आला असून त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र व विदर्भ या ठिकाणी जास्त होणार आहे.
याच हवामान बदलाचा परिणाम म्हणून काल विदर्भातील अकोला येथे उच्चांकी ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अम्फान चक्रीवादळामुळे कोरडे वारे उत्तर व वायव्य दिशेने येत असून त्यामुळे देशात अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद मध्यप्रदेशातील खरगोन येथे ४५ अंश सेल्सिअसझाली आहे. त्यामुळे राज्यात तापमानात वाढ होणार असून उत्तर महाराष्ट्र व विदर्भ या ठिकाणी दि. २२ पासून उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.