पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणून चीन सर्वांना माहिती आहे. मात्र, आता अमेरिकेला मागे सारत जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांच्या यादीत चीनने अव्वल स्थान पटकावले आहे. अधिकृतपणे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणून ओळखले जाणारे, चीन पूर्व आशियामध्ये वसलेले आहे आणि पाच भौगोलिक टाइम झोनमध्ये पसरलेले आहे.
जगाच्या संपत्तीत 20 वर्षांत तिप्पट वाढ
गेल्या 20 वर्षांत जगाच्या संपत्तीत तिप्पट वाढ झालीय. या सगळ्यात सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे, चीनमध्ये यापैकी एक तृतीयांश मालमत्ता आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदांवर लक्ष ठेवणाऱ्या मॅनेजमेंट कन्सल्टंट मॅकिन्से अॅण्ड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार अहवालानुसार, सन 2000 मध्ये जगाची एकूण संपत्ती $156 खरब डॉलर इतकी होती, जी 2020 मध्ये म्हणजेच, 20 वर्षांनी वाढून $514 खरब डॉलर झालीय. मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटचे सहयोगी जान मिशके म्हणाले, जगातील अनेक देश अधिकाधिक श्रीमंत झाले आहेत, असं त्यांनी नमूद केलंय. अहवालात असंही म्हटलंय, की जागतिक एकूण संपत्तीपैकी 68% संपत्ती स्थिर मालमत्तेच्या रूपात आहे, तर उर्वरितमध्ये पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचा समावेश आहे.
चीनची संपत्ती 20 वर्षांत 7 खरब डॉलरवरून $ 120 खरब डॉलर झाली..
अहवालातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, सन 2000 मध्ये चीनची एकूण संपत्ती $7 खरब डॉलर होती, जी 2020 मध्ये वेगाने वाढून $ 120 खरब डॉलर इतकी झालीय. सन 2000 च्या आधीच चीनचा जागतिक व्यापार संघटनेत समावेश होता. तेव्हापासून चीनची अर्थव्यवस्था किती वेगाने वाढलीय, याचा अंदाज यावरून लावता येईल. 20 वर्षात जगानं मिळवलेल्या संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती चीनकडे आहे. त्याचबरोबर अहवालात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेची संपत्ती 20 वर्षांत दुप्पट झालीय. अहवालानुसार, 2000 मध्ये अमेरिकेची संपत्ती 90 खरब डॉलर इतकी होती.
10 टक्के श्रीमंतांकडे सर्वाधिक संपत्ती
‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, मॅकिन्से अँड कंपनीच्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दोन तृतीयांशपेक्षा अधिक संपत्ती 10 टक्के कुटुंबांकडे एकवटली आहे. या 10 टक्के लोकांकडे संपत्तीचे होणारे केंद्रीकरण दिवसेंदिवस वाढत आहे.
भारताच्या संपत्तीत घट
भारत हा 2017 साली सर्वात चांगली कमाई करणारा देश असल्याचं अहवालात म्हटलं होत. त्यावेळी भारताची संपत्ती 8 हजार 230 अब्ज डॉलर इतकी होती. 2020 – 21 मध्ये भारत एकूण संपत्ती 12.61 लाख कोटी डॉलर (882.7 लाख कोटी रुपये) सह 7व्या क्रमांकावर होता. भारताचा क्रमांक 2021 – 22 च्या सर्वेक्षणात आता पहिल्या दहातही नाही.