• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

१० गुंठे क्षेत्रातून २ लाखांचा निव्वळ नफा

सिमला मिरचीतून चंदनसे कुटुंबाची किमया

Team Agroworld by Team Agroworld
August 16, 2021
in यशोगाथा
0
१० गुंठे क्षेत्रातून २ लाखांचा निव्वळ नफा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रविण देवरे / जळगाव
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका अजूनही ठोस अश्या सिंचन सुविधांसाठी प्रयत्नरत आहे. दानापूर, बाणेगाव येथील सिंचन प्रकल्प असले तरी बहुतांश शेती ही कोरडवाहू प्रकारची असल्याने ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध आहेत. असे शेतकरी कापूस, सोयाबीन सारखी नगदी व पारंपारिक पिके घेत आहेत. परंतु काही युवा शेतकरी असेही आहेत की जे आपल्या पारंपारिक शेतीला छेद देत नवीन प्रयोग करत आपल्या शेतीत विविधता आणत आहेत. त्यापैकी एक आहेत तुकाराम चंदनसे. त्यांनी आपल्या १० गुंठे क्षेत्रातून पहिल्याच प्रयत्नात सिमला मिरचीतून दोन लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे.

प्राचीन काळी भोग्वर्धन नावाने प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या भोकरदन या तालुक्याच्या गावापासून 14 किमीवर गोद्री हे गाव. प्राचीन गावांप्रमाणे येथेही बारा बलुतेदारी असल्यासारखी सर्वच जातीसामाजाची घरे सालोक्याने राहतात. याचा गावात काही वर्षांपूर्वी कौतिक चंदनसे व मंगलबाई चंदनसे हे दांपत्य राहावयास आले. मुळचे गांधेली येथील रहिवाशी असलेल्या चंदनसे यांनी येथेच जमीन घेत आपली कर्मभूमी मानून शेती सुरु केली. घरी वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या घरात तुकाराम हे मोठे तर त्यांचे लहान बंधू नामदेव व ज्ञानेश्वर हे देखील शेतीच करतात. कौतिक चंदनसे यांनी आता सर्व शेतीची सूत्रे मुलांच्या हाती दिले असून आता शेतीची संपूर्ण जबाबदारी नवीन पिढीच करते. त्यात प्रामुख्याने मार्केटिंग / विक्री व्यवस्थापन हे तुकाराम हे सांभाळतात. काही वर्षांपूर्वी चार्टर्ड अकाउंटेंटकडे नोकरीस असलेल्या तुकाराम यांना बाहेर असलेल्या मार्केटचा अनुभव त्याकामी आल्याचे ते सांगतात. तर इतर दोघे भाऊ शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष देतात.

पाण्याचा शाश्वत स्रोत तयार केला.
चंदनसे कुटुंबीयांची एकूण १२ एकर जमीन, टप्प्याटप्याने जमीन घेतल्यानंतर चंदनसे कुटुंबीयांनी आपल्या शेतीत दोन विहीर द्वारे हमीचा असा पाण्याचा स्रोत तयार केला. चंदनसे परिवाराची येथे दोन शिवारात एकूण १२ एकर जमीन असून संपूर्ण क्षेत्राला त्यांनी बागायती केले आहे. आजवर वडील फक्त पारंपारिक पिके घेत असत, परंतु नवीन पिढीतील चंदनसे बंधूनी सतत नाविन्याचा व प्रयोगशीलतेचा अंगीकार करून शेतीत नवनवीन प्रयोग सुरु केले.
शेतातच निवास
गावातील नको त्या गोष्टीवर वेळ वाया जातो आणि शेतीकडे दुर्लक्ष होते, हा प्रत्येक गावातील अनुभव आहे. असाच अनुभव आपल्याला नको या कारणासाठी आणि शेतीला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून चंदनसे बांधवांनी शेतात पक्के घर बांधले असून त्याच ठिकाणी त्यांनी सर्व राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शेतात कामासाठी हवा तेव्हा वेळ मिळतो असे ते म्हणतात.

परंपारीक शेतीला प्रयोगांची जोड
आजही चंदनसे कुटुंबीय पारंपारिक कापूस, मका, सोयाबीन यासारखी पिके घेतात. त्याचबरोबर त्यांनी सिमला मिरचीच्या माध्यमातून नवीन पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे. मागील वर्षी उत्पादित झालेली अद्रक विक्री न करता त्यांनी ती यावर्षासाठी जास्त क्षेत्रावर लगावड करता यावी यासाठी बियाणे म्हणून ठेवली आहे. तर याच शेतीतील १० गुंठे क्षेत्राच्या सिमला मिरचीने त्यांना लखपती केले आहे.
खुल्या क्षेत्रावर सिमला लागवड
   बहुतेक शेतकरी सिमला मिरची लागवडसाठी शेडनेट किंवा पॉलीहाउसला प्राधान्य देतात. परंतु चंदनसे बंधूनी फक्त मल्चिंग टाकून मोकळ्या रानात मिरची लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आधी आमच्या स्थानिक हवामानाला अनुकूल हे पिक आहे का याची खात्री केल्याची तुकाराम हे सांगतात. कारण मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र किंवा लागुनच असलेला विदर्भ यांच्या तुलनेत आमच्याकडील हवेत अधिक गारवा असल्याचे ते सांगतात. त्यामुळे यापिकाच्या वाढीवर फारसा अनिष्ट परिणाम खुल्या क्षेत्रावर होत नाही.

सिमला लागवडपूर्व तयारी
एकूण १० गुंठे जमिनीवर मिरची लागवड केली असून त्यापूर्वी जमिनी नागरणी करून रोटाव्हेटरने भुसभुशीत करून घेतली त्यावर बेड तयार करून मल्चिंग अंथरून घेतले. तत्पूर्वी त्यावर सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार २ बॅग, डीएपी १ बॅग,फ्युरी ५ किलो असा खतांचा बेसल डोस टाकला. १५ मे २०२० या महिन्यात स्थानिक नर्सरी मधून १.५ रु दराने ४ हजार सिमला मिरचीची रोपे आणून लागवड केली. संपूर्ण क्षेत्राला पाण्यासाठी ठिबक सिंचनची व्यवस्था केली असून त्याद्वारे विद्राव्ये खते देणे सोपे होते
लागवड पाश्च्यात व्यवस्थापन
लागवडनंतर १० दिवसांनी १९:१९:१९ हे खत ४ kg त्यानंतर १५ दिवसांनी १३:४०:१३ हे खत ड्रीपद्वारे दिले.
त्यानंतर १२:१६:०० आणि लगेच ५ दिवसांनी मिरचीची साईज वाढविण्यासाठी पोटॅशियम शोनाईट दिले.
फवारणी करतांना सतत शेतात पिकाचे निरीक्षण करून वेळोवेळी आलेल्या किडीच्या प्रकारानुसार गरजेनुसार सेंद्रिय व रासायनिक कीडनाशक औषधी फवारणी केली. खते व फवारणीसाठी संपूर्ण हंगामाला २० हजार रु खर्च आला.

अर्थकारण
   लागवड नंतर साधारणपणे ४५ दिवसांनी पहिला तोडा आला. तो ९० किलोचा होता. त्यानंतर सरासरी २ दिवसाआड मिरची तोडली जाऊ लागली. संपूर्ण मालाची विक्री ही स्थानिक बाजारात केली त्याला सरासरी २३ रु  दर मिळाला. एकूण हंगामात ११ टन माल निघाला त्याचे एकूण २ लाख ५० हजार रुपये आले. घरचेच लोक कामासाठी असल्याने गरजेनुसार मजूर लागले. त्यामुळे मजुरी खर्च जास्त लागला नाही.


जमीन पूर्वमशागत १५००
बेसल डोस २५००
मल्चिंग पेपर ४५००
मिरची रोप ६०००
फवारणी १००००
खते १००००
एकूण खर्च ३४५००
इतर किरकोळ खर्च धरून जवळपास ४० हजार रु संपूर्ण हंगामात लागले
एकूण ११  टन मिरची विक्रीतून २५५००० रु पर्यंत मिळकत झाली. यातून खर्च वजा जाता २ लाख १५ हजार रु निव्वळ नफा शिल्लक राहिला. हा नफा आमच्या शेतातील इतर कोणत्याही पिकापेक्षा नक्कीच जास्त असल्याचे तुकाराम चंदनसे यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षीही त्यांनी मिरची लागवड केली आहे.

कुटुंबाची साथ महत्वाची
    घरात वारकरी संप्रदायाची परंपरा असल्याने साहजिकच एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे शेतीत कमीत कमी मजूर लागतात. आई-वडील यांनी घराची जबाबदारी घेतल्याने तिन्ही भाऊ आणि त्यांच्या पत्नी यांची याकामी मदत झाली. तुकाराम यांची पत्नी सुजाता या स्थानिक विद्यालयात शिक्षिका होत्या. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी नोकरी सोडून पूर्णपणे घरातील मुलांचे शिक्षण आणि शेती या कामात स्वताला झोकून दिले आहे. त्यामुळे शेतात जरी चंदनसे परिवार राहत असला तरीही घरातील मुलांच्या भविष्याबाबत त्या जागरूक असल्याचे दिसून येते.

नियोजन भविष्यातील
आता यावर्षी देखील त्यांनी सिमला मिरची सह इतर तीन विविध मिरचीच्या जातींची ७००० रोपे लागवड केली आहे. परिसरातील वाढते सिमला मिरचीचे क्षेत्र लक्षात घेत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे ते तुकाराम सांगतात. साहजिकच त्यांना या निर्णयाचा फायदा झाला आहे यावर्षी सिमला मिरचीला कमी दर असून त्यांनी लावलेल्या इतर मिरचीच्या वाणाला चांगला भाव आहे. त्यामुळे त्यांचे होणारे नुकसान टळले आहे. मागील वर्षी तयार केलेल्या अद्रक पासून नवीन क्षेत्रावर अजून अद्रक लागवड वाढविली आहे. येत्या काही काळात त्यांना पशुपालनाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करत शेतीला जोडव्यवसाय करायचे आहेत. आजवर त्यांना शेळीपालन व दुग्धव्यवसायाचा अनुभव असला तरी याला आता व्यावसायिक रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. असेही चंदनसे बंधू सांगतात.


काय आहे
पोटॅशियम शोनाईट
पोटॅशियम शोनाईट हे उत्पादन पोर्टेशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहे. हे खत पाण्यात १०० % विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते.
• यात २३% पोटेंश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत.
• कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि कॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात,

  • पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो.

  • पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होते, पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियममुळे अबाधित राहते.

  • गंधकामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती व फळांची टिकाऊ क्षमता वाढते तसेच पिकाची पकता लवकर व एकसारखी होते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गोद्रीजालनाडीएपीभोकरदनसिंगल सुपर फॉस्फेटसिमला मिरची
Previous Post

विषारी कीटकनाशक फवारणीला पर्याय !

Next Post

राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार…!

Next Post
राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार…!

राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार...!

ताज्या बातम्या

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish