• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सेंद्रियच्या बळकटीकरणाचा ध्यास… शेतकर्‍यांना दोन किलो गांडूळबीजचे मोफत वाटप…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2022
in यशोगाथा
0
सेंद्रियच्या बळकटीकरणाचा ध्यास… शेतकर्‍यांना दोन किलो गांडूळबीजचे मोफत वाटप…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सचिन कावडे, नांदेड :-
मराठवाडा-विदर्भातील शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर बंद करुन पूर्णतः सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील बळवंतराव पौळ हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे वेगवेगळ्या जिल्ह्यातील गावागावांमध्ये जाऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत आहेत. तर सेंद्रिय शेतीकडे वळणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला पौळ यांच्याकडून पहिल्यांदा 2 किलो गांडूळबीज मोफत वाटप करण्यात येत आहे. यामुळे सेंद्रिय शेतीच्या वाढीला एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” … बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..*

 

गांडूळ खत निर्मितीसाठी 10 बेडपासून सुरुवात
हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील बळवंतराव पौळ (48) यांना वयाच्या 16 व्या वर्षापासून शेती व्यवसायाचा छंद होता. त्यांची वडिलोपार्जित 15 एकर शेती असताना त्यांनी शेतीतून मिळविलेल्या उत्पन्नातून पुन्हा 8 एकर शेती नव्याने विकत घेतली. अशा एकूण 23 एकर शेतीत सेंद्रिय खतांचा वापर करण्यास सुरुवात करुन सन 2009 पासून रासायनिक शेती पूर्णतः बंद केली.
दरम्यान, 2009 मध्ये 30 बाय 30 च्या जागेवर शेड उभारुन 10 बेडवर गांडूळखत निर्मिती करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर येथून 10 बेड (खतासाठी) त्यांनी मागवले. एका बेडची उंची 2 फुट असून लांबी 12 फुट तर रुंदी 4 फुटापर्यंत असते. या बेडमध्ये अर्धाफूट कचरा, अर्धाफूट शेणखत अशा प्रकारे 4 थर पाणी मारत मारत भरण्यात येतात. 4 दिवसानंतर थंड झाल्यानंतर गांडूळ बीज एका बेडला 3 किलो याप्रमाणे 10 बेडला एकूण 30 किलो टाकण्यात आले होते. एका बेडमधून जवळपास 1 टन गांडूळखत निघते.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 15 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

 

 

एका वर्षात चारवेळा गांडूळखताची निर्मिती
सेंद्रिय शेतीला अधिक चालना मिळावी, यासाठी पौळ यांनी 10 बेडपासून सुरु केलेला खत निर्मितीचा व्यवसाय सन 2012 पर्यंत 40 बेडवर पोहचला आहे. गांडूळखत निर्मितीसाठी प्रत्येक बेडमध्ये कुटार, चारा, शेण गोमुत्रामध्ये घुसळून थरावर थर दिला जातो. पंधरा दिवस पाणी शिंपडून त्यातील उष्णता काढली जाते. प्रत्येक बेडमध्ये 2 किलो गांडूळ सोडली जातात. सेंद्रिय घटक लवकर कुजण्यासाठी 3 ते 4 किलो गुळ अधिक दोन लिटर दही, 3 किलो हरभरा पीठ व 25 ते 30 लिटर पाणी असलेले द्रव बेडवर नियमित शिंपडले जाते. तीन महिन्याला एक बेडमधून जवळपास 1 टन गांडूळखताची निर्मिती करण्यात येते. 40 बेडमधून वर्षाकाठी 40 टन खताच्या निर्मितीपैकी 20 टन खताचा वापर घरी केला जातो. तर उर्वरित 20 टना खताची 40 किलो प्रमाणे एक बॅग तयार करुन 600 रुपये दराने विक्री केली जाते.

 

घरच्यांचा विरोध; आता कौतुक
2009 मध्ये शेतीत रासायनिक खतांचा पूर्णतः वापर बंद करुन सेंद्रिय शेतीकडे वळायचे, असा निश्चय केल्यानंतर बळवंतरावांना सुरुवातीला घरच्यांनीच विरोध केला. त्यांचे वडील देवराव पौळ हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी देखील पण सेंद्रिय शेतीला खूप मेहनत आहे, तुझ्याने मेहनत होणार नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान करु नकोस, रासायनिक पद्धतीनेच आपली शेती बरी असे सांगून त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्यास विरोध केला होता. परंतु बळवंतरावांनी सेंद्रिय शेती करण्याचा दृढनिश्चय केला होता. आज गांडूळखत निर्मितीसह 23 एकर शेतीही सेंद्रिय पद्धतीने ते करतात. सुरुवातीच्या काळात विरोध करणारे त्यांचे कुटुंब आता कौतुक करत आहेत.

 

 

जिल्हाधिकारी, साईओंसह कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी
हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाने मराठवाड्यासह विदर्भातही डंका वाजविला आहे. या प्रकल्पाला तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे व कृषी क्षेत्रातील तज्ञांनी भेटी देऊन गांडूळखत निर्मितीच्या प्रक्रियेचे कौतुक केले होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन गांडूळखत निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती घेऊन पौळ यांचे कौतुक केले.

 

 

गोमुत्र संकलनासाठी गोठा
गांडूळखत निर्मितीसाठी लागणारे जीवामृत तयार करण्यासाठी खुप मेहनत लागते तर गाईचे गोमुत्र धरण्यासाठी पौळ हे बाटलीचा वापर करीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एमआरजीएस योजनेतून गोठा बांधून देण्याचे आदेश दिले. या योजनेतून 12 बाय 20 चा गोठा 77 हजार रुपये खर्च करून बांधून देण्यात आला. सुरुवातीला पौळ यांच्याकडे 17-18 गायी होत्या. सद्यःस्थितीत 5 गायी व 2 बैल त्यांच्याकडे आहेत. गोठ्यामध्ये गोमुत्र संकलनासाठी गोठ्याच्या एका बाजूला हौद तयार करण्यात आला असून त्यात गोमुत्र जमा होते. पंचायत समितीकडून त्यांना बायोगॅस देखील बसवून देण्यात आला आहे. ज्यामुळे 6 ते 7 जणांचा स्वयंपाक त्यावरच होत असल्यामुळे पौळ यांनी गॅस सिलेंडरचा चक्क वापरच बंद केला आहे.

 

 

बनचिंचोलीचे 25 शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाले
रासायनिक खतांमुळे जमीन खराब होते. अशा जमिनीत घेतल्या जाणार्‍या पालेभाज्या व अन्नधान्याच्या सेवनाने भविष्यात कॅन्सरसाख्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिनविषारी शेतीमालासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे वळालो पाहिजे, असा निश्चय करून बळवंतराव पौळ यांनी 2009 पासून केला व संपूर्ण 23 एकर शेती सेंद्रिय पद्धतीने करण्यास सुरुवात केली. पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली बनचिंचोली येथील 20 ते 25 शेतकरी रासायनिक खतांचा वापर बंद करुन सेंद्रिय शेतीकडे वळाले आहेत.

 

10 हजार शेतकर्‍यांची बांधणी
पौळ हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. त्यांच्या गावासह मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर बंद करुन संपूर्णतः सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी ते मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. तसेच कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमांमधूनही पौळ हे सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. सेंद्रिय शेतीकडे वळणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला मोफत मार्गदर्शन करण्याचे त्यांचे काम अहोरात्र सुरु असल्याने आजघडीला जवळपास 10 हजार शेतकरी त्यांना जोडले गेले आहेत.

 

मार्गदर्शनासाठी कुटुंबियांचा पुढाकार
गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आजही जिल्ह्यासह बाहेरील शेतकरी मोठ्या संख्येने बनचिंचोलीला पौळ यांच्याकडे येत असतात. त्यांना बळवंतराव पौळ हे गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प दाखवून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देतात. शेतकरी घरी आल्यानंतर एखाद्यावेळी बळवंतराव पौळ घरी नसतील तर त्यांचे सेवानिवृत्त वडील देखील शेतकर्‍यांना संपूर्ण माहिती देतात. तसेच त्यांच्या पत्नीही महिलांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात. एकूणच पौळ यांच्या कुटुंबीयांनी देखील सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांच्याच हितासाठी सेंद्रिय शेतीचा प्रचारच जणू सुरु केला आहे.

 

पुरस्काराने सन्मानीत
मराठवाडा-विदर्भातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीला सुरुवात करावी, म्हणून सेंद्रिय पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांना पौळ यांच्याकडून पहिल्यांदा 2 किलो गांडूळ बीज मोफत वाटप करण्यात येते. त्यानंतर शेतकरी स्वतःहून गांडूळ खताचाच आग्रह धरतात. कृषी विभागाने बळवंतराव पौळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानीत केले आहे.

मागील 10 ते 12 वर्षांपूर्वी बिनविषारी शेतीमाल घेण्याचे ठरवून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर पूर्णतः बंद केला. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी कृषी विभागाच्या शेतकरी कार्यशाळेतून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहे. मराठवाडा व विदर्भातील कोणी शेतकरी सेंद्रिय शेती करण्यास इच्छूक असल्यास त्या शेतकर्‍याला मी स्वतः स्वखर्चाने जाऊन मोफत मार्गदर्शन करण्याचे काम मागील काही वर्षांपासून अविरतपणे करीत आहे.
– बळवंतराव पौळ ः 9552284040

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Agriculture DepartmentCollector Dr. Vipin ItankarFarmingOrganicVermicompostकृषी विभागगांडूळबीजजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकररासायनिक खतशेतीसेंद्रिय
Previous Post

हवामान बदलामुळे महाबीजलाही बसतोय बीजोत्पादनाचा फटका… उन्हाळ्यात बीजोत्पादनाचे नियोजन…

Next Post

शेणखताच्या वापरातून वाढवा उत्पादन… चांगले कुजलेले खत शेतात टाकल्याने असा होतो फायदा

Next Post
शेणखताच्या वापरातून वाढवा उत्पादन… चांगले कुजलेले खत शेतात टाकल्याने असा होतो फायदा

शेणखताच्या वापरातून वाढवा उत्पादन… चांगले कुजलेले खत शेतात टाकल्याने असा होतो फायदा

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.