• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेवगा शेतीतून एकरी दीड लाखांचा नफा

चौगावचे रामभाऊ मोरे यांचा यशस्वी प्रयोग

Team Agroworld by Team Agroworld
July 5, 2021
in यशोगाथा
0
शेवगा शेतीतून एकरी दीड लाखांचा नफा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

भूषण वडनेरे/धुळे
धुळे तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी रामभाऊ नवल मोरे यांनी शेवगा लागवडीचे तंत्र आत्मसात करुन उत्कर्ष साधला आहे. रामभाऊ हे 12 वी शिकलेले असले तरी केवळ मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी आपल्या 5 एकर क्षेत्रात शेवगा लागवड केली. गेल्या दोन वर्षापासून त्यांना एकरी दीड लाखांचा नफा मिळत आहे. लॉकडाउन असुनही त्यांच्या उत्पन्नात फरक पडलेला नाही. कारण त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेवग्याच्या शेंगा घेण्यासाठी व्यापारी स्व:ता त्यांच्या बांधापर्यंत येतात. विशेष म्हणजे सुरूवातीला रामभाऊ हे हॉटेल व्यवसाय करत. मात्र वडीलांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि मार्गदर्शनच्या बळावर त्यांनी तोट्यातील शेती फायद्यात आणली.

हॉटेल व्यवसाय बंद करुन वळाले शेतीकडे!

धुळे तालुक्यातील चौगाव हे लहानसे गाव. जवळूनच एक्सप्रेस कालवा गेला असल्यामूळे येथील शेतकरी पाण्याच्या बाबतीत समाधानी आहेत. याच गावात रामभाऊ नवल मोरे यांचा छोटासा हॉटेल व्यवसाय होता. वडिलांची 7 एकर बागायती शेती असल्यामूळे त्यांच्यासोबत शेतात राबणेही आलेच. वडील नवल मोरे हे प्रयोगशील शेतकरी असल्यामूळे ते गुण रामभाऊ यांच्यात आनुवंशिकपणे आले होते. पण कधी पुर्णवेळ शेती करावी लागेल असा विचारही रामभाऊ यांनी केलेला नव्हता. मात्र, त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि लहान भाऊ शेती संभाळू लागला. पण त्यालाही नोकरी लागली आणि तो मुंबईला गेला. मग शेतीची जबाबदारी रामभाऊ यांच्यावर आली. परंतु ते डगमगले नाहीत. हॉटेल व्यवसाय बंद करुन पुर्णवेळ शेतीत लक्ष केंद्रीत केले. शिवाय हॉटेलही फारशी चालत नव्हती. त्यामूळे हॉटेलमध्ये 2-2, 5-5 रूपये कमविण्यापेक्षा शेतातून चांगली कमाई होईल, असा विचार करुन रामभाऊ हे शेतीकड़े वळले.

सुरूवातीला डाळिंबातुन नुकसान!

रामभाऊ हे सन 2014-15 पासून शेती करत आहेत. पुर्वी वडील व लहान भाऊ हे डाळिंब, केळी, पपई अशी फळपिके घेत. लहरी हवामानामुळे कधीकधी नुकसानही होत असे. वडिलांप्रमाणेच रामभाऊ यांनी फळपिके घेण्यावर भर दिला. त्यानूसार सुरवातीला त्यांनी डाळिंबाची लागवड केली. परंतु, तेल्या रोगाने थैमान घातले. त्यामूळे हंगाम वाया गेला. त्यानंतर पुढील वर्षी पुन्हा डाळिंबाची लागवड केली. याहीवेळी तेल्या रोग आला अन संपूर्ण हंगाम वाया गेला. सलग दोन वर्षे नुकसान झाले. त्यामूळे रामभाऊ हे डाळींबाला पर्याय शोधू लागले. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. शेवटी त्यांना पर्याय सापडला. त्यांच्या गावातच श्रीराम शेवाळे यांनी शेवगा लागवडीतून 4 एकरात 40 लाखाचे उत्पन्न घेतले होते. (याबाबत शेवाळे यांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत देखील आलेली आहे.) त्यांच्याकडून माहिती व प्रेरणा घेतली. तसेच धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्रातून तांत्रिक मर्गदर्शन घेतले आणि शेवगा लागवड करायची असे त्यांनी ठरवले.

पाच एकरात शेवगा लागवड!

शेवगा लागवड करण्यासाठी रामभाऊ यांना बियाण्याची गरज होती. तथापि, त्यांनी कृषि विज्ञान केंद्रात मस्त्यपालन, कुक्कुटपालन, आँर्गेनीक फार्मीँग आदी प्रशिक्षण घेतल्यामुळे तेथे विनोद पाटील यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनीही शेवगा लागवड केली असल्यामूळे त्यांच्याकडून बियाणे उपलब्ध झाले. शिवाय विनोद पाटील हे कृषि विज्ञान केन्द्र अंतर्गत शास्रज्ञ मंचचे सदस्यही आहेत. त्यांच्याकडून पी.के.एम.1 या जातीचे शेवगा बियाणे घेऊन मे 2019 मध्ये 5 एकर क्षेत्रात लागवड केली. लागवड करतांना दोन ओळींमध्ये 12 फुट व दोन झाडांमध्ये 7 फुटाचे अंतर ठेवले. जमीन काळीभोर व कसदार असल्यामूळे शेवग्याचे पिक हमखास येईल, असा रामभाऊ यांना ठाम विश्वास होता. पाण्याची मुबलकता होतीच पण शेवगा पिकाला पाणी कमी लागते, हेही रामभाऊ जाणुन होते.

केवळ सेंद्रिय खतांचा वापर!

रामभाऊ हे भुमिपुत्र या ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपमध्ये 13 शेतकरी असुन सर्वजण केवळ सेंद्रिय शेती करतात. त्यामूळे शेवगा लागवड केल्यानंतर रामभाऊ यांनी केवळ सेंद्रिय खते, शेणखत, जिवामृत, बायो पेट्रीसाईडचा वापर केला. त्यामूळे किटकनाशक, तणनाशक, मजुरी इ. खर्च कमी झाला. सेंद्रीय शेतीचा फायदा म्हणजे गवत जास्त उगवत नाही, आंतरमशगतीची कामे जास्त करावी लागत नाही. स्व:ताच्या दोन गायी असल्यामूळे शेणखताची गरज भागते. शिवाय सेंद्रिय शेतीमूळे एक्सपोर्ट क्वालीटीचा माल तयार होतो. एकेका झाडाला हजार ते बाराशे शेंगा लागतात. मजुर लावून दर 8-10 दिवसांनी मालाची तोडणी केली जाते. महिन्याला 3-4 तोडणी होतात. एका तोडणीला एकरी सुमारे 2 टन माल निघतो. त्यानूसार 5 एकरातून 8 ते 10 टन माल निघतो. सेंद्रीय शेवगा असल्यामूळे मोठी मागणी असते. वर्षभर उत्पादन घेतल्यानंतर पुढील हंगामात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात छाटणी केली जाते. छाटणी करतांना जमिनीपासून अर्धा फुटापासून छाटणी (रिकट) केली जाते. व एक मेन स्टंप काढून त्याला परत सहा महीन्यानंतर उत्पन्न सुरु होत असल्याचे रामभाऊ सांगतात. त्यानूसार डिसेंबर ते एप्रिल असे पाच महिने शेवगाचे उत्पन्न निघते. त्यानंतर मे मध्ये छाटनी केली जाते. तर काही चांगल्या दर्जाची झाडे ते बियाणे म्हणून ठेवत असतात. छाटनी करण्यापूर्वी ते बियाणे काढ़णी करतात.

दरम्यान, छाटनी करतांना वरवर छाटनी करण्याचाही प्रकार असतो. त्यास पंजा छाटणी म्हणतात. अशी छाटणी केल्यास जून-जुलै मध्ये नविन शाखा येतात. मात्र, त्यात फ्लॉवरिंग सेट होत नाही. कारण छाटणी केल्यानंतर ताण द्यावा लगतो. त्यामूळे मे महिन्याच्या शेवटी जमिनीपासून अर्धाफुटावरुन छाटणी करत असल्याचे रामभाऊ सांगतात.

एकरी दीड लाखाचे उत्पन्न!

शेतकऱ्यास केवळ माल पिकवणे एवढ्यावरच थांबून चालत नाही,  ही बाब रामभाऊ जाणुन होते. त्यामूळे त्यांनी सुरूवातीला आपला माल (शेवगा शेंगा) स्थानिक मार्केटमध्ये विक्री केला. याठिकाणी 40 ते 50 रूपये प्रतिकीलो दर मिळाला. शिवाय कुठल्या मार्केटमध्ये काय भाव आहे, याचाही अंदाज ते घेत. वाशी ( मुंबई) येथे एक्सपोर्ट मार्केट आल्यामुळे रामभाऊ हे बऱ्याचदा तेथे माल नेऊन विकतात. त्याठिकाणी 80 ते 90 रूपये दर मिळतो. त्यामूळे गेल्या दोन वर्षापासून रामभाऊ यांना शेवगा विक्रीतुन सुमारे दीड लाख रूपये निव्वळ नफा मिळत आहे. लॉकडाउन असला तरी त्यांच्या उत्पन्नात कमी झालेली नाही. बऱ्याचदा व्यापारीच त्यांच्या शेतात येऊन मालाची खरेदी करतात. शिवाय चौगाव गावात बहुतांश शेतकऱ्यानी सुमारे 400 ते 500 एकरवर शेवगा लागवड केली असुन गावातून दररोज 25 टन माल निघत असल्याचेही रामभाऊ सांगतात.

मंदीतही संधी शोधण्याचा प्रयत्न!

शेवगाच्या शेंगांना  मार्च ते  एप्रिल या दोन महिन्यात मागणी कमी असते. त्यामूळे मंदी असते. या मंदीच्या काळात नविन काहीतरी करता येईल का, याचा शोध रामभाऊ घेत आहेत. त्यांना शेवगा पासून मोरिंगा ऑइल तयार करण्याची माहिती मिळाली आहे. हे ऑइल विमानाचे स्पेअरपार्टच्या सर्विसींगसाठी वापरले जात असल्याचे रामभाऊ सांगतात. त्यासाठी तेल बनविणाऱ्या कंपन्यांची माहिती ते मिळवीत आहेत. तसेच शेवगाच्या पाल्यापासून तयार केलेल्या पावडरचा उपयोग मेड़ीसीन कंपन्या करीत असतात. त्यामूळे पावडर बनविण्यासाठी कमीतकमी मानवी हस्तक्षेप असलेले सनरायजर मशीन घेण्याचा रामभाऊ यांचा मानस आहे. एकंदरीत मंदीतही संधी साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

कृषि विज्ञान केंद्राचे मर्गदर्शन!

शेवगा लागवड करण्यासाठी रामभाऊ यांना धुळ्यातील कृषि विज्ञान केंद्राची मोठी मदत झाली. तेथील कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नान्द्रे, पिक संरक्षण शास्रज्ञ डॉ.पंकज पाटील, उद्यानविद्या शास्रज्ञ रोहित कडू यांचे मार्गदर्शन लाभले. लागवड कशी करावी, खते व्यवस्थापन, छाटनी इ. ची तांत्रीक माहिती त्यांनी दिली. शिवाय वेळोवेळी मार्गदर्शनही केले. त्यामूळे मोठा फायदा झाल्याचे रामभाऊ सांगतात.

नोकरीवाल्यापेक्षा माझी कमाई अधिक

अगोदर केळी, पपई, डाळिंब इ. फळपिकांची लागवड करीत होतो. पण गेल्या दोन वर्षापासून शेवगाचे उत्पादन घेत आहे. गेल्या दोन वर्षापासून एकरी सुमारे सव्वा ते दीड लाख रूपये नफा मिळत आहे. पुर्वी इतर फळपिके विक्री करतांना बऱ्याचदा दर कमी मिळून नुकसान व्हायचे. पण आता दररोज 50-100 किलो माल निघतो आणि हा माल कुठेही जाऊन विकु शकतो. शेतीत जो स्व:ता राबतो त्यालाच उत्पन्न दिसते. शेती ही बांधावरुन करण्याची गोष्ट नाही. मला 5 एकरातुन वर्षाला 5 लाख उत्पन्न मिळाले तरी नोकरीवाल्यापेक्षा माझी कमाई अधिक आहे, याचे मला समधान आहे. शेवगा पिकामुळे मला फायदा झाला.

-रामभाऊ नवल मोरे, शेतकरी, ७९७२६५२४०२

चौगाव ता.धुळे

………..

 
शेतकऱ्यांनी नविन पिकपद्धती अवलंबिणे गरजेचे

एक पिकपद्धती शेतकरी मोठ्या प्रमाणात अवलंबतात. अनेकजण कापूस एके कापूस पीक घेतात. त्यामूळे आम्ही शेतकऱ्यांना नविन पिकपद्धती अवलंबिण्यासाठी प्रवृत करतो. त्यात शेवगा पिक येते. शेवगा चांगल्या पद्धतीने वर्षभर उत्पन्न देऊ शकते. त्यानुषंगाने शेवगाचे उत्पन्न घेतांना शेवगाची छाटनी वेळेवर करने गरजेचे आहे. मार्केट, आपल्याकडे उपलब्ध असलेले पाणी याच्या अनुषंगाने आपल्याला छाटनी करता येते. शेवगाचे उत्पादन घेण्यासाठी आम्ही छाटणी तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन व किडरोग व्यवस्थापन या तीन प्रमुख गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोहचवितो. त्यामूळे रामभाऊ मोरे यांच्याप्रमाणेच जिल्ह्यात अनेक शेतकरी यशस्वीपणे शेवगा शेती करत आहेत.

-दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक,

कृषि विज्ञान केन्द्र, धुळे

 

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अन्नद्रव्य व्यवस्थापनकिटकनाशककृषि विज्ञान केन्द्रछाटणी तंत्रज्ञानतणनाशकधुळेशेवगा
Previous Post

अमेझॉन जंगल रहस्य भाग- ४

Next Post

राज्यात तुरळक पावसाची शक्यता

Next Post
राज्यात तुरळक पावसाची शक्यता

राज्यात तुरळक पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.