आता जनावरांच्या गोठ्यासाठीही राज्य सरकारकडून शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून तब्बल 2,31,000 इतके अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी दोन ते सहा जनावरांसाठी गोठा बांधायचा असल्यास 77 हजार 188 रुपये इतके अनुदान मिळू शकते. तर सहा किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे 12 जनावरांसाठी दुप्पट तर 18 पेक्षा अधिक जनावरे असतील तर तिप्पट अनुदान मिळू शकणार आहे.
जळगाव आणि नाशिकमध्ये अस्सल व भेसळमुक्त इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद उपलब्ध…
शेतीच्या प्रमुख जोडव्यवसायास मिळेल गती
शेतीचा प्रमुख जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची ओळख आहे. शेळी पालन, गाय-म्हैस पालन यामध्ये वाढ व्हावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, हा शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेचा हेतू आहे. याशिवाय कुक्कुटपालनासही प्रोत्साहन दिले जाते. या योजनेतून यामध्ये वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदाल दिले जाणार आहे. तशा सर्व जुन्या आणि नव्या योजना आता शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेत सहभागी करण्यात आल्या आहेत. जे शेतकरी शेळी पालन, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करतात त्यांना योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये 1. गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे, 2. शेळी पालनासाठी शेड बांधणे, 3. कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे, 4. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा
आजही अनेक शेतकरी आर्थिक व इतर कारणास्तव जनावरांना योग्य निवारा देऊ शकत नाहीत. या निवाऱ्याअभावी शेतकरी पशुपालनाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नव्याने सुरु करण्यात आलेल्या योजनेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास या योजनेचा फायदा होऊ शकेल.
शेळीपालन शेड बांधकाम
10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात.
कुक्कुटपालन शेड बांधकाम
100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून गोठ्यांना अनुदान मिळविण्यााकरिता असा करा अर्ज –
1. गायी गोठा योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्याने आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. त्याला ग्रामपंचायत कार्यालयातच अर्ज करावा लागणार आहे.
2. अर्ज करताना तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यापैकी कुणाकडे अर्ज करीत आहात त्या नावापुढे √ (बरोबर) अशी खूण करायची आहे.
3. त्यानंतर ग्रापंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा आणि अर्जाच्या उजवीकडे तारीख टाकून तुमचा फोटे चिकटवायचा आहे.
4. त्यानंतर खाली अर्जदाराचे नाव, पत्ता, जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
5. आता तुम्ही ज्यासाठी अर्ज करीत आहात, त्यावर बरोबर√ अशी खूण करा.
अर्ज भरताना घ्यावयाची काळजी
• अर्जामध्ये तुमच्या कुटुंबाचा प्रकार म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, महिलाप्रधान कुटुंब याचा उल्लेख करावा.
• 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्प भूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात आपले कुटुंब आहे, त्याचा उल्लेख जरूर करावा.
• तुम्ही जो प्रकार निवडला, त्याच्या योग्य कागदोपत्री पुरावा अर्जासोबत जोडल्याची खात्री करा.
• लाभार्थ्य़ाच्या नावे शेतजमीन असल्यास त्याचा सातबारा, आठ ‘अ’ आणि ग्रामपंचायत नमुना जोडावा.
• यानंतर रहिवाशी दाखला जोडायचा आहे.
• तुम्ही ज्यासाठी अर्ज केला, ते काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्येच येते का, तेही भरावे लागणार आहे.
• ज्यांनी अर्ज केलेला आहे, त्याच्या कुटुंबातील 18 वर्षा पुढील सदस्यांची संख्या नमूद करायची आहे.
• शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.
• अर्जासोबत मनरेगा जॅाब कार्ड, 8- अ, सात बारा उतारा, मालमत्ता नमुना 8 अ उतारा जोडायचा आहे.
• आपला अर्ज सादर केल्यानंतर ग्रामसभेत ठराव घ्यावयाचा आहे. त्यानंतर तुमच्या कागपत्रांची छाननी करण्यात येईल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची सही
-शिक्यानुसार पोचपावती दिली जाईल. त्यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात की नाही, हे सांगितले जाईल.
• तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तरीही लाभ घेता येईल; पण जॅाब कार्ड नसेल तर मात्र लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जॅाब कार्डसाठी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करु शकता.
👌👌👌
Bakari oalan sathi
10 गाईचा गोठा 20×40 कमीत कमी 8 ते 10 गाई गट नं 224 या गटात बांधण्याचा मानस आहे
मी जनावरांच्या गोठ्यासाठी अर्ज केला आणि मंजूर झाला तो मी गोठा तयार पण केला 20,0000 रू खर्च झाला असून मला 50,000 रू भेटले गोठा आहे 77,000रू बाकी 27,000रू कमी का भेटले ग्राम पंचायत बोलते 50,000रू भेटणार तर आता शेतकऱ्याने काय करावे कुठे जायचे
शिंदी तालुका भुसावळ जिल्हा जळगाव जमिन खरेदी करणे बाबत