• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

वंडर वर्ल्ड : रेसट्रॅक प्लेया – जिथे 300 किलोचा दगडसुद्धा आपोआप चालतो! काय आहे हे जगातील अद्भुत आश्चर्य, जाणून घ्या…

जगभरातील शास्त्रज्ञानी उलगडेलेले कोडे, अमेरिकेतील डेथ व्हॅलीमधील रहस्य उघड

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 29, 2022
in वंडरवर्ल्ड
3
रेसट्रॅक प्लेया

रेसट्रॅक प्लेया

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

न्यू यॉर्क : : रेसट्रॅक प्लेया ही एक अशी जागा आहे जिथे 300 किलोचा दगडसुद्धा आपोआप चालतो! हे जगभरातील शास्त्रज्ञानी मिळून उलगडेलेले कोडे आहे. हे अमेरिकेतील डेथ व्हॅलीमधील रहस्य आता जगासमोर उघड झाले आहे. काय आहे हे जगातील अद्भुत आश्चर्य, जाणून घ्या…

रेसट्रॅक प्लेया म्हणजे नेमके आहे तरी काय?

ही आहे सपाट जमिनीवर आपोआप सरकणाऱ्या दगडांची जागा, जिला म्हटले जाते रेसट्रॅक प्लेया! इथे अगदी 300 किलो वजनाचे निर्जीव दगडसुद्धा सुकलेल्या, शुष्क जमिनीवर स्वतःहून एका जागेहून दुसऱ्या जागी सरकतात. या दगडांच्या प्रवासाचा लांबलचक माग (ट्रेल ट्रॅक) सहजपणे दिसू शकतो. कधी कधी तर हा माग चक्क अर्ध्या किलोमीटरहुन जास्त अंतराचा असतो. म्हणजे निर्जीव दगड स्वतःहून अर्धा किलोमीटर अंतर चालून जातो.

शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo

शास्त्रज्ञ काही प्रमाणात यशस्वी, रहस्य कायमच

अगदी अलीकडील काळापर्यंत जगभरातील शास्त्रज्ञाना या जागेचे कोडे उलगडत नव्हते. काही वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि थोड्याश्या नशिबाच्या साथीमुळे सरतेशेवटी शास्त्रज्ञ त्यात काही प्रमाणात यशस्वी झाले. अजूनही हे रहस्य तसे पुरेसे उलगडलेले नाही.

ऑफर : स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात

प्रतिकूल हवामानामुळे सजीवांची संख्या कमी

अमेरिकेतील डेथ व्हॅलीमधील हवामान खूप शुष्क असते. या भागामध्ये खूपच कमी पाऊस पडतो, त्यामुळे येथील जमीन पण कोरडी असते. तसेच इथे प्रतिकूल हवामानामुळे सजीवांची संख्याही खूप कमी आहे. अशा या वाळवंटी भागामध्ये एक सुकलेले तळे आहे जे जेमतेम 4 किमी लांब आणि 2 किमी रुंद भागामध्ये पसरलेले आहे. जगातील इतर तळी ही सामान्यतः उंचसखल असतात पण हे तळे पूर्णतः वेगळे म्हणजे सपाट, समतल आहे. तसेच पावसाचा अभाव असल्यामुळे हे तळे वर्षाचे बहुतेक दिवस सुकलेले असते.

Panchaganga Seeds

नैसर्गिक आश्चर्याचा अद्भुत अनुभव

या जागेवर एक नैसर्गिक आश्चर्य अनुभवायला मिळते. अगदी लहान आकाराच्या दगडांपासून ते 200-300 किलो वजनाचे दगड इथे सुकलेल्या वाळूमध्ये आपोआप सरकतात आणि मागे एक सरळ किंवा नागमोडी माग सोडतात.

एखादा माणूस दगडांना वाळूमध्ये ढकलतो का?

सुरुवातीला लोकांचे असे मत झाले, की एखादा माणूस किंवा प्राणी दगडांना वाळूमध्ये ढकलत असावा; पण दगडांचा माग सोडून इथे माणसाचे किंवा कोणत्याही प्राण्याच्या पायाचे ठसे कधीच आढळून आले नाहीत. त्यामुळे ही शक्यता नाकारण्यात आली आणि शास्त्रीय संशोधन सुरू करण्यात आले.

सरकणाऱ्या दगडांचे केले गेले जीपीएस ट्रॅकिंग

रेसट्रॅक प्लेया भागातील अनेक दगडांवर स्थाननिश्चिती करण्याची उपकरणे म्हणजे जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात आली. तसेच सभोवतालच्या भागामध्ये काही स्वयंचलित कॅमेरा बसवण्यात आले. एवढा सगळा खटाटोप करून कित्येक दिवस शास्त्रज्ञांच्या हाती विशेष असे काहीच लागत नव्हते. या जागेचे कोडे उलगडण्याची कोणतीही शक्यता दिसत नसताना अचानक त्यांचे नशीब पालटले.

रात्रीच्या वेळी तापमान गोठणबिंदूच्या जवळपास

एकाएकी पाऊस सुरू झाला. त्यामुळे गेले कित्येक दिवस पाण्याअभावी कोरडे पडलेल्या या भागामध्ये पाणी जमा झाले. रात्रीच्या वेळी येथील तापमान गोठणबिंदूच्या जवळपास पोचते. त्यामुळे तळ्यातील पाण्यावर बर्फाचा थर जमा होऊ लागला. हा बर्फाचा थर जास्त जाड किंवा जास्त बारीक नव्हता.

Planto

दगड सरकत असतानाचे व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद

शास्त्रज्ञ गेले कित्येक दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, ती घडायला सुरुवात झाली. डिसेंबर 2013 ते जानेवारी 2014 या काळामध्ये अनेक दिवशी दगड सरकत असतानाचे व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद करण्यात आले. दगडांवर बसविलेल्या जीपीएस उपकरणांच्या साहाय्याने ते किती अंतर पार करून गेले ते पण नोंदविण्यात आले. पुढे फेब्रुवारी 2014 मध्ये तळे पूर्णपणे सुकले तेव्हा अपेक्षेप्रमाणे दगडांचे माग दिसू लागले.

प्रत्यक्षात पाण्याच्या पृष्ठभागावरील बर्फाचे थर सरकतात

यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, जेव्हा जेव्हा रेसट्रॅक प्लेया भागामध्ये पाऊस पडतो आणि तळ्यामध्ये पाणी जमा होते, तेव्हा एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की दगड सरकू लागतात. पाण्यामध्ये अर्धवट बुडालेल्या दगडांवर बर्फाचे आवरण जमा होते आणि जेव्हा मोठ्याने वारा वाहू लागतो, तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर जमा झालेले बर्फाचे थर सरकू लागतात. त्याच्या बरोबर हे मोठमोठाले दगड पण सरकू लागतात. नंतर जेव्हा तळे आटते तेव्हा दगडांचे माग दिसू लागतात. इथे बर्फ महत्वाची भूमिका निभावतो. अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी एका नैसर्गिक आश्चर्याचा उलगडा केला आहे. मात्र, या दगडांची आपणहून सरकासरकी, प्रवासयात्रा आजही सुरू आहे. जगभरातून आजही हजारो पर्यटक हा दगडांचा प्रवास पाहायला या ठिकाणी भेटी देत असतात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • वंडरवर्ल्ड : राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वप्रथम ईमेलचा वापर करणारी टेकसॅव्ही राणी! जग तेव्हा ई-मेल बाबत जाणतही नव्हते! No 1 Knows
  • वंडरवर्ल्ड : द्वारका हे नवव्या शतकापासूनचे धार्मिक स्थळ; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाच्या उत्खननात मात्र द्वारका नागरी समुद्रात बुडल्याचा थेट पुरावा अप्राप्तच!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अमेरिकेतील डेथ व्हॅलीजगातील अद्भुत आश्चर्यजीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईसदगडांचा प्रवासपर्यटकरेसट्रॅक प्लेयावाळवंटी भागशास्त्रज्ञसंशोधन
Previous Post

Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन

Next Post

Relief: रिटर्न मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार; पुढील 3 दिवसात शेवटचे कमी दाब क्षेत्र

Next Post
रिटर्न मान्सूनला अनुकूल परिस्थिती,

Relief: रिटर्न मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार; पुढील 3 दिवसात शेवटचे कमी दाब क्षेत्र

Comments 3

  1. Pingback: Wonder World : जग फिरायची आवड असलेला जिगरबाज चहावाला; फाटक्या आयुष्याला जोडले अदृश्य पंख! - Agro World
  2. Pingback: Wonder World : जग फिरायची आवड असलेला जिगरबाज चहावाला; फाटक्या आयुष्याला जोडले अदृश्य पंख!
  3. Pingback: Ram Setu Mystery : राम सेतूशी संबंधित न ऐकलेले रहस्य ; अमेरिकाही झाली नतमस्तक - Agro World

ताज्या बातम्या

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish