पुणे : पाण्यात बुडणारी शहरे आता नेहमीची झाली. या शहरांना वाचाविण्यासाठी आयएमडीची अत्याधुनिक फोरकास्ट यंत्रणा लवकरच उभारली जाणार आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
ताज्या मान्सूनच्या जोरदार पावसात पुणे, नागपूर या शहराची दाणादाण उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर होसाळीकर यांनी ही दिलासादायक माहिती दिली.
पाण्यात बुडणारी शहरे : कारणांचा शोध सुरू
अलीकडल्या पावसात राज्यातील मोठी शहरे पाण्यात का बुडाली, याचा आता शोध घेतला जात आहे. सरकारी पातळीवर त्याच्या कारणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. वाढते नागरीकरणाबरोबरच इतर अनेक बाबी त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
नागपूरची उडालेली दैना, राज्यातील पाऊस स्थिती, कुठे कोणता ॲलर्ट ते इथे क्लिक करून जाणून घ्या
होसाळीकर म्हणाले, आगामी काळात अनेक शहरांना अशा प्रकारची आव्हाने असतील. त्यामुळे भारतीय हवामान खाते अर्थात आयएमडीने (IMD) आधीच त्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. शहरी हवामान योजना (अर्बन मेट्रॉलॉजी), मेगासिटी अंदाज प्रणाली, पूर चेतावणी प्रणाली (फ्लड वॉर्निंग,), दाट निरीक्षण नेटवर्क (डेन्स ऑब्जर्व्हेशन), उच्च रिझोल्यूशन मॉडेल मार्गदर्शन (हाय रिझोल्यूशन मॉडेल गाईडन्स), सुधारित संज्ञापण (इम्प्रूव्हड कम्युनिकेशन), प्रभाव आधारित पूर्वानुमान (इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट) प्रणाली कार्यान्वित करण्यासह इतर नियोजन केले आहे.
#punerains Lack of infrastructure to evacuate storm water glaring. Blaming the unprecedented rains no longer holds good. Funds need to be released urgently. Citizens blameworthy too. Throwing garbage in nulls is a common sight. @CMOMaharashtra @PMCPune pic.twitter.com/05vQ101GxF
— Ashok Chhibbar (@chibskycoo) September 13, 2022
👆 पुणे शहर पाण्यात वाहून जाण्याचा माध्यमांनी घेतलेला आढावा
This is not Bangalore!! It’s #pune #Maharashtra this is much worst then Bangalore..
All the city’s have its problems not only in bangalore!!
In pune it just rained for an hour and this is the condition of Pune #punerains #hatersgonnahate #Maharashtra #StaySafeStayHealthy pic.twitter.com/4UL9Dv15r0— Lohith_ReddyM (@LohithR66368872) September 12, 2022
👆 पुण्यातील अलीकडच्या पावसात झालेल्या दाणादाणीची तीव्रता दर्शविणारा हा व्हिडिओ
Comments 2