• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

डॉ. पंजाबराव देखमुख कृषी विद्यापीठ विकसित कांदा लोडिंग-अनलोडिंग यंत्र

Team Agroworld by Team Agroworld
January 27, 2021
in तांत्रिक, हॅपनिंग
0
डॉ. पंजाबराव देखमुख कृषी विद्यापीठ विकसित कांदा लोडिंग-अनलोडिंग यंत्र
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

भारतीय लोकांच्या आहारात कांद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शाकाहारी व मांसाहारी लोकांच्या आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो. कांद्यामध्ये “ब” आणि “क” जीवनसत्त्वे, कर्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, कॅल्शियम, लोह व इतर खनिजे असतात     तसेच औषधी गुणधर्म आहेत. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्तवाहिनीमधील दोष या विकारांवर कांदा अत्यंत गुणकारी आहे.

महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील ३७ टक्के कांदा क्षेत्र हे एकट्या नाशिक जिल्ह्यात असून प्रामुख्याने पुणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांदा पीक घेतले जाते.

बाजारात कांद्याला योग्य भाव मिळत नाही, त्याची बरीच कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कांदा हाताळणी. कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेला कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये भरणे व त्यातून बाहेर काढणे हे जिकिरीचे काम असतं. नाशिक येथील व आजूबाजूच्या भागातील उत्पादक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून हे लक्षात आले की, ट्रक्टर ट्रोलीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये कांदा भरण्यासाठी व त्यातून काढण्यासाठी सद्यस्थितीत एका दिवसामध्ये २० टन कांदा भरण्यासाठी व काढण्यासाठी ३० कुशल मजुरांची गरज लागते. शिवाय सर्व मजूर एकाच प्रकारे हाताळणी करतील याची खात्री नसते. मुळात भर हंगामात वेळेवर कुशल मजूर मिळणेच दुरापास्त झाले आहे. प्रत्येक कांद्याची हाताळणी जास्त वेळा झाल्यामुळे टरफले निघतात, कांदे सुकून वजन कमी होतो. तसेच आयुष्यमान कमी होते व कांदा हाताळावा लागल्यामुळे खर्च वाढतो. त्याचप्रकारे कांदा निवडून त्यातील खराब असलेला कांदा बाहेर काढणेसुद्धा महत्वाचे काम असून त्यासाठी सॉरटिंग टेबल आवश्यक आहे.

या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कापणी पश्च्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विभागाने पंदेकृवि कांदा लोडिंग अनलोडिंग यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या सहाय्याने एकाच दिवसात २० टन कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये भरता येतो व त्यातून बाहेर काढता येतो. कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा कांदा चाळीमध्ये भरताना व त्यातून बाहेर काढताना खराब झालेला, कोंब आलेला, जोड कांदा, वेडा-वाकडा कांदा सॉरटिंग टेबलच्या दोन्ही बाजूला असलेल्या मजुरांच्या सहाय्याने वेगळा केला जातो. हे यंत्र २ अश्वशक्ती ३ फेज विद्युत मोटार वर चालते. सदर यंत्रामध्ये कांद्याची साल निघू नये व त्यास इजा होऊ नये यासाठी योग्य कुशनींग देऊन विशेष काळजी घेतली आहे. या कांदा लोडिंग अनलोडिंग यंत्राच्या सहाय्याने फक्त ४ मनुष्यच २० टन कांद्याची भरती कांदाचाळीमधून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीमधून कांदा चाळीमध्ये एका दिवसात करू शकतात.

सदर कांदा लोडिंग अनलोडिंग यंत्राला सोयीस्कर म्हणून कांदा चाळीमध्ये विशेष सुधारणा केल्या आहेत. या सुधारित कांदा चाळीमध्ये दोन चाळ (४.७०९ मी. (लांबी) × १.५२४ मी. (रुंदी) × ४.२१७ मी. (उंची)) असून मधोमध ४.७०९ मी. (लांबी) × ३.१४३ मी. (रुंदी) असलेली जागा दिली आहे. या जागेत लोडिंग अनलोडिंग यंत्र व छोटा उद्वाहक येईल अश्याप्रकारे व्यवस्था केली आहे. ही कांदा चाळ एम.एस. (सी-चैनल) पासून बनलेली आहे. सावलीसाठी चाळीवर लोखंडी पत्र्याचे शाकारलेले छत आहे. या कांदा चाळीच्या तळाला खालच्या बाजूने ३०० उतार (बाहेरून आतमध्ये) दिलेला आहे. तसेच उताराच्या खालचे टोक जमीनीपासून ०.८०७ मी. उंचीवर आहे आणि वरचे टोक जमीनीपासून १.४६२ मी. उंचीवर आहे. कांदा चाळीला उतार असल्याने कांदा चाळीतून काढायला सोपे जाते. कांदाचाळीच्या प्रत्येक भागाला (तळ तसेच चारही बाजु) चौकोनी सछिद्र असलेली लोखंडी जाळी (वेल्डेड मेश) लावलेली आहे. तसेच कांदाचाळीच्या तळाला सछिद्र लोखंडी जाळीवर चौकोनी असलेले सछिद्र रबराचे आवरण दिलेले आहे. त्यामुळे कांदा चाळीत भरताना वरून पडत असलेला कांद्याला इजा होत नाही व सर्व बाजूने हवा खेळती असल्यास कांदा जास्त काळ टिकून राहतो. या सर्व व्यवस्थेमुळे कांदा पाच ते सहा महिने पर्यंत चांगला राहतो.

वैशिष्ट्ये :

  • या यंत्राची क्षमता २० टन प्रति दिवस आहे.
  • कांदा ट्रक्टर ट्रोलीमधून कांदा चाळीमध्ये तसेच कांदाचाळीमधून ट्रक्टर ट्रोलीमध्ये भरण्यास उपयुक्त.
  • २० टन कांद्याला भरतांना व काढतांना ३० कुशल मजुरांची आवश्यकता असते. त्याऐवजी या मशीनने फक्त ४ अकुशल मजूर लागतात.
  • कांदा भरतांना व काढतांना निघालेला खराब, कोंब आलेला, जोड कांदा, वाकड – वेडा कांदा वेगळे करण्यासाठी सॉरटिंग टेबलची व्यवस्था आहे.
  • सदर यंत्र हे चालविण्यास, देखभाल, दुरुस्ती व निगा राखण्यास सोपे आहे.
  • चाकांच्या साह्याने ने–आण करण्यास सोपे.

पिडीकेव्ही कांदा लोडिंग अनलोडिंग यंत्र छोटा उद्वाहक सोबत

 

डॉ. प्रदीप बोरकर, संशोधन अभियंता,
श्री. सुशील सक्कलकर, सहायक संशोधन अभियंता,
श्री. राजन बिसेन, वरिष्ठ संशोधन सहायक
अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,

अकोला- ४४४ १०४ (महाराष्ट्र)

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कांदाकांदा चाळकांदा लोडिंग अनलोडिंग यंत्रडॉ. पंजाबराव देखमुख कृषी विद्यापीठपिडीकेव्ही
Previous Post

पावनखिंड भाग – ४१ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

भारतात गायीबरोबरच म्हशींच्या 90% दुधामध्येही ‘ए 2 प्रथिने’; “प्रीमियम मिल्क” हे मिथक – अमूल एमडी

Next Post
भारतात गायीबरोबरच म्हशींच्या 90% दुधामध्येही ‘ए 2 प्रथिने’; “प्रीमियम मिल्क” हे मिथक – अमूल एमडी

भारतात गायीबरोबरच म्हशींच्या 90% दुधामध्येही 'ए 2 प्रथिने'; "प्रीमियम मिल्क" हे मिथक - अमूल एमडी

ताज्या बातम्या

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.