• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

केळीवरील बुरशीजन्य आजाराचा असा रोखा प्रादुर्भाव… एकात्मिक पद्धतीने करा सिगाटोका रोगाचे नियंत्रण

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 17, 2022
in इतर
0
केळीवरील बुरशीजन्य आजाराचा असा रोखा प्रादुर्भाव… एकात्मिक पद्धतीने करा सिगाटोका रोगाचे नियंत्रण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : ‘सिगाटोका’ हा केळीवर पडणारा बुरशीजन्य आजार आहे. त्याचा प्रादुर्भाव पानांच्या वजनावर व गुणवत्तेवर होतो. सुरुवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळे डाग पडू लागतात. त्यानंतर मोठ्या तपकिरी परिपक्व डागांमध्ये त्याचे रुपांतर होते. पिवळा करपा म्हणूनही हा आजार ओळखला जातो. आवश्‍यक ती काळजी घेऊन योग्य उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे.

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” … बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..*

अशी असतात रोगाची लक्षणे
मायकोस्पेरीला म्युसीकोला या बुरशीमुळे सिगाटोका हा बुरशीजन्य रोग केळीवर पडतो. झाडाच्या पानांपासून या रोगाची लागण होण्यास सुरवात होते. सुरवातीला पानांवर, शिरेस समांतर लहान लहान लांबट गोल पिवळसर ठिपके दिसून येतात. हे ठिपके वाढत जाऊन पिवळ्या रेषेच्या स्वरूपात दिसतात. अनुकूल वातावरणात हे ठिपके पिवळ्या रेषेच्या स्वरूपातून मोठ्या पूर्ण वाढ झालेल्या ठिपक्‍यांत रूपांतरित होतात. हे ठिपके साधारणतः एक ते दोन मि.मी.पासून दोन ते तीन सेंटीमीटर आकाराचे असतात. पूर्ण वाढलेल्या ठिपक्‍यांचा रंग काळपट तपकीरी असतो. कालांतराने ठिपक्‍याचा मध्यभाग वाळून राखाडी रंगाचा होतो. ठिपक्‍याभोवती पिवळसर रंगाचे वलय (कडा) दिसून येते. या रोगाचा प्रसारासाठी आर्द्रता हा अत्यंत महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो. रोगाची बुरशी लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही प्रकारच्या बीजाणूंची निर्मिती करते. या बुरशीचे हे बीजाणू पानांच्या खालच्या बाजूने पर्णरंध्राच्या पेशीतून आत शिरून रोगाची लागण करतात. या रोगामुळे पानातील हरितद्रव्याचा ऱ्हास होऊन पाने करपतात. झाडावरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. परिणामी, अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊन पोषणाअभावी फळांची योग्य वाढ होत नाही. त्यामुळे केळीची फळे आकाराने लहान राहतात. फळांत गर भरत नाही. फळांचे वजन आणि दर्जा खालावतो. काही वेळा रोगाची तीव्रता वाढल्यास घडांवर परिणाम होऊन घडातील फळे अकाली पिकू लागतात. अशा फळांना बाजारात मागणी नसते.

यामुळे होतो रोगाचा प्रसार
कमी अंतरावर दाट लागवड केली, अयोग्य निचरा असलेल्या जमिनीत केळीची लागवड केली, बागेत तणांचा प्रादुर्भाव झाला, शेतात स्वच्छतेचा अभाव असला, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा अनियंत्रित वापर झाला, मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमित न काढता त्याकडे दुर्लक्ष केले, पीक फेरपालट केले नाही, खोडवा पीक घेण्यावर भर दिला, प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष केले तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

असे मिळवा रोगावर नियंत्रण
एकात्मिक पद्धतीने सिगाटोका रोगाचे नियंत्रण करता येते. श्रीमंती या सहनशील वाणाची लागवड करावी, शिफारस केलेल्या अंतरावरच जसे १.५ मीटर बाय १.५ मीटर किंवा १.८ मीटर बाय १.८ मीटर या अंतरावर लागवड करावी. कंद प्रक्रिया केल्याशिवाय लागवड करू नये, ही प्रक्रिया करण्यासाठी प्रती १०० लिटर पाण्यात १५० ग्रॅम ऍसिफेट अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून केलेल्या द्रावणात कंद किमान अर्धा तास बुडवून लागवड करावी. बागेत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होईल याकडे लक्ष द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना हवामान, झाडाच्या वाढीची अवस्था लक्षात घेऊन पाण्याची मात्रा द्यावी. बाग आणि बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत. मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत. शिफारस केलेल्या अन्नद्रव्याची मात्रा (२०० ग्रॅम नत्र + ४० ग्रॅम स्फुरद + २०० ग्रॅम पालाश प्रति झाड) वेळापत्रकानुसार द्यावी. रोगाची लक्षणे दिसताच पानांचा फक्त रोगग्रस्त भाग किंवा रोगग्रस्त पान त्वरित काढून जाळून नष्ट करावे. बागेत पिकाचे कोणतेही अवशेष न ठेवता नष्ट करावेत. केळी हे एकच एक पीक न घेता फेरपालट करावी. खोडवा पीक घेण्याचे टाळावे. यासारख्या उपाययोजना केल्या तर केळीवर बुरशीजन्य आजार पडत नाहीत. याशिवाय पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणन किंवा रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच क्‍लोरोथॅलोनिल २० मि.ली. किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सरफॅक्‍टंट १० मि.ली. प्रती लीटर या प्रमाणात मिसळावा. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा ट्रायडेमॉर्फ १० मि.ली. किंवा प्रोपिकोनॅझोल १० मि.लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सरफॅक्‍टंट १० मि.ली. प्रती लीटर या प्रमाणात मिसळावा. यासंदर्भात अधिक माहितीसाठी केळी संशोधन केंद्राशी संपर्क साधावा.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: BananaDiseaseFungicideMeasuresMycosphaerella Musicolaकॉपर ऑक्‍झिक्‍लोराईडक्‍लोरोथॅलोनिलमॅन्कोझेबरोगाचे नियंत्रणसिगाटोकाहरितद्रव्य
Previous Post

उन्हाळी सूर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान….

Next Post

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Next Post
खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.