मुंबई (प्रतिनिधी) – कांदा हे जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक आहे. मात्र, अनेकदा सदोष साठवणुक पद्धतीमुळे 40% कांदा खराब होऊन शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय शोधत ‘टाटा स्टीलच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन ब्रांड नेस्ट’ ने देशातील पहिले कांदा साठवणुकीसाठी एक सोल्युशन ऍग्रो नेस्ट लॉन्च केले आहे. यामुळे कांदा साठवणुकीतील कांदा खराब न होता दीर्घकाळ सुरक्षित राहणार आहे. परिणामी, कांदा उत्पादकांना दरही चांगले मिळतील व जास्त कांदा खराब न झाल्याने आर्थिक नुकसानही होणार नाही. त्यामुळेच चाळीतील साठवलेला कांदा आता उत्पादकांना हसवणार आहे.
महाराष्ट्रातील अग्रेसर कांदा उत्पादक जिल्हे
राज्यात नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी ओळखले जातात. नाशिक जिल्हा तर कांदा उत्पादनासाठी देशात प्रसिद्ध आहे. राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 37 टक्के आणि देशातील 10 टक्के कांदा नाशिक जिल्ह्यात पिकवला जातो.
साठवणीतल्या कांद्याला बाजारात चांगला दर
कांदा काढणीला सुरुवात झाली की दर नेहमी कोसळतात, असा अनुभव शेतकऱ्यांना अपवाद वगळता कायम येतो. काढणीनंतर काही दिवसांनी मात्र कांद्याचे भाव वधारतात. अर्थात चाळीतील साठवणीतल्या कांद्यामुळे शेतकऱ्याला वाढीव दराचा फायदा होऊन अधिकचा नफा होताना दिसतो. साठवणीतल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारात चांगला दर मिळतो. त्यामुळे कांदा साठवणूक करणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. कांदा हा जास्त काळ टिकणारा नसल्यामुळे त्याची साठवणूक तंत्रशुद्ध पद्धतीने करणे फार गरजेचे असते.
टाटा स्टीलच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन ब्रँड नेस्ट
भविष्यात जर कांद्याच्या दरात वाढ झाली तर या दरवाढीचा फायदा मिळावा, यासाठी बरेच शेतकरी कांदा चाळीत साठवितात. परंतु, कांदा साठवणुकीसाठी योग्य यंत्रणा नसल्यामुळे बहुतांशी प्रमाणात कांदा खराब होतो. शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय शोधत ‘टाटा स्टीलच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन ब्रांड नेस्ट’ ने देशातील पहिले कांदा साठवणुकीसाठी एक सोल्युशन अॅग्रो नेस्ट लॉन्च केले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीत होणार असून यामुळे बऱ्याच प्रमाणात कांदा व्यवस्थित ठेवता येणार आहे.
स्मार्ट वेअर हाऊस व सेन्सर सूचीत करणार
या तंत्रज्ञानामध्ये विज्ञान, नवीन अद्यावत इनोवेशन चा वापर केला गेला आहे. बर्याचदा शेतकर्यांच्या साठवणूक करण्याच्या पद्धतीत बर्याच कमतरता असतात. तसेच साठवणुकीच्या राखण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा 40% कांदा चाळीतच खराब होतो. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन टाटा स्टीलच्या नेस्ट इन आणि इनोव्हेटर टीमने एक स्मार्ट वेअर हाऊस म्हणजे गोदाम सोलुशन अॅग्रो नेस्ट विकसित केले आहे. या तंत्रज्ञानात तापमान, ओलावा आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सर लावण्यात आले आहे. जे सेंसर माल खराब होण्याआधीच आपल्याला सूचित करते.
कृषी मालाचे सेल्फ लाईफ वाढवण्यावर भर
टाटा स्टीलच्या सर्व्हिसेस अँड सोल्यूशन्सचे चीफ श्री. आनंद म्हणाले, “आमचा दृढ विश्वास आहे की शेतीमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करुन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे. या मिशनने प्रेरित होऊन आमचे तज्ज्ञ व्यावसायिक कृषी क्षेत्रासाठी अनुकूलीत उपाय विकसित करत आहेत. हवामान बदल आणि पर्यावरणीय परिस्थिती शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या सेल्फ लाइफवर परिणाम करते आणि योग्य साठवण सुविधांच्या अभावामुळे कृषी मालाचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. आम्ही ही समस्या लक्षात घेऊन एक उपाय तयार केला, जो दीर्घकालीन आणि व्यावहारिक आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपाय तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
नेस्ट-इन ऑफरिंगची मुख्य वैशिष्ट्ये
* आधुनिक बांधकाम उपाय
त्रास मुक्त अनुभव
* मालाची गुणवत्ता
* हाय स्पीड बांधकाम
* भारतभरातील सर्वात कठीण भूभागांमध्ये सोयीस्कर स्थापना
* सेवेची विश्वसनीयता
चौकशीसाठी संपर्क : [email protected] वर लिहा किंवा 1800 108 8282 वर संपर्क साधा.
Best 👍