• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उन्हाळी भुईमूग उत्पादनाची सुत्रे

Team Agroworld by Team Agroworld
February 27, 2021
in इतर
0
उन्हाळी भुईमूग उत्पादनाची सुत्रे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT
भुईमूग हे राज्यातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. पोषणमुल्याच्या दृष्टीने विचार केल्यास 
त्यामध्ये अंड्यापेक्षा 2.5 पट जास्त प्रथिने असतात. मागील काही वर्षापासून त्याचा उपयोग हा तेलापेक्षा 
मिठाई, बेकरी, खारेदाणे इ. पदार्थ तयार करण्यास होत आहे. तसेच मागील 10 ते 15 वर्षाचा अभ्यास 
केल्यास महाराष्ट्रातील ह्या पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे. उन्हाळी हवामानात स्वच्छ सुर्यप्रकाश तसेच 
किडी व रोगाचा कमी प्रादुर्भाव ह्यामुळे हे पीक लागवड करणे फायदेशीर व सुलभ जाते. तेव्हा या 
गरीबाच्या काजुचे उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन घेण्याकरिता, काही महत्वाच्या सुत्राविषयी जाणून 
घेऊ या. 
1. योग्य जमिनीची निवड :-  
भुईमूग पिकाला मध्यम ते हलकी परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ 
मिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने हवा व पाणी यांचे योग्य 
प्रमाणात संतुलन राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मुळाची चांगली वाढ होऊन आ-या सुलभ रितीने 
जमिनित जाण्यास तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी मदत होते. 
2. वेळेवर पेरणी :-  
भुईमूग हे पीक उष्ण व समीशोतोष्ण कटिबंधात येत असल्याने या पिकास साधारणत: 27 ते 300 
से. तापमान आवश्यक असते. चांगली उगवण व भरपुर फुले येण्यासाठी 24 ते 280 सेल्सिअस तर भरपुर 
आ-यासाठी 19 ते 230 सेल्सिअस तापमान योग्य असते. त्याकरिता उन्हाळी भुईमूगाची पेरणी 
हिवाळ्यातील थंडी कमी होत असतांना साधारणत: जानेवारीच्या दुस-या पंधरवड्यात करावी. लवकर 
पेरणी केल्यास कमी तापमानामुळे चांगली उगवण होत नाही. उशीरा झाल्यास उन्हाने फुलगळ होऊन    
आ-यांची संख्या कमी होते आणि शेंगा चांगल्या पोसल्या जात नाही. पीक पाऊसात सापडते परिणामत: 
उत्पादनात घट होते म्हणून योग्य वेळी पेरणी करणे फार महत्वाचे आहे.  
3. योग्य झाडाची संख्या आणि सुधारीत वाणांची निवड : – 
भुईमूगाच्या लागावडीकरिता 3 ते 4 फुट रुंदीचे, जमिनीपासून 10 ते 15 सेमी उंची असणारे 
शेताच्या लांबीचे गादीवाफे करावे. पेरणी पाभरीने अथवा टोकण पध्दतीने करतांना दोन ओळीत  कमीत 
कमी 30 सेमी तर दोन रोपात 10 सेमी अंतर ठेवणे आवश्यक असते. त्याकरिता उपट्या वाणाकरिता 
हेक्टरी 100 किलो बियाणे ( शेंगदाणे ) वापरावे. त्यापासून आवश्यक प्रमाणात प्रती हेक्टरी 3.33 लाख 
रोपांची संख्या मिळणेकरिता पेरणी पुरेशा ओल्याव्यात, 5 सेमी. खोलीवर व योग्य वेळी करावी. उगवण 
योग्य प्रमाणात न झाल्यास आठ दिवसाचे आत नाग्या भरुन घ्याव्यात. उन्हाळी भुईमूग लागवडीकरिता 
खालीलपैकी वाणांची निवड करावी. 
अ.क्र
. 
वाण 
सरासरी उत्पादन 
(व्किंटल / हेक्टर ) 
शेंगदाणे 
उतारा 
वैशिष्ट्ये 
1. 
जे.एल. 501 
35 -36 
72% 
शेंगा तोडणीस सुलभ 
2. 
फुले उनप ( जे.एल-286) 
25 – 30 
72% 
फुलाचा अधिक कालावधी 
3. 
टिएजी – 24 
30 – 35 
72% 
उन्हाळी हंगामात अधिक उत्पन्न 
4. 
टिपीजी – 41 
25-28 
65% 
जाड दाण्याची व सुप्तावस्था असणारे 
5. 
फुले भारती  
30 –  35  
72% 
तेलाचे प्रमाण-51% खरीप व उन्हाळी 
हंगामासाठी योग्य  
4. तणांचे वेळीच नियंत्रण :- 
तणांचे नियंत्रण करण्याकरिता पारंपारिक तणनाशके वापरुन एकात्मिक पध्दतीचा वापर करणे 
गरजेचे आहे. जमीनीची पुर्व मशागत करतांना नांगरट केल्याने लव्हाळा, हराळी आदि वार्षिक तणे मुळासह 
जमीनी बाहेर येतात. ती सर्व जमा करुन त्यांचा नायनाट करावा. तणनाशकाचा वापर करुन तण 
नियंत्रणासाठी पीक पेरणीनंतर व उगवणीपूर्वी पेंडीमेथॅलीन ( स्टॉम्प) किंवा अँलाल्कोर ( लॅसो ) हे 
तणनाशक 100 ते 150 मिली प्रती लि. पाण्याव्दारे जमीनीवर फवारावे. फवारणी करते वेळी जमीन 
ओलसर असणे आवश्यक आहे. तसेच पेरणी झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसात दोन वेळा कोळपणी व दोन 
वेळा खुरपणी केल्यास संपुर्णपणे नियंत्रण करता येईल. 
5. सेंद्रिय, जैविक आणि सायनिक खतांचा संतुलित वापर :- 
जमीनीचा पोत तसेच पाणी धारण क्षमता वाढविण्यासाठी शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी 
चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडुळखत हेक्टरी 12 गाड्या जमिनीत योग्य प्रकारे मिसळून द्यावेत. तसेच 
पेरणीपुर्वी 10 किलो बियाण्यास रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम या 
प्रमाणात जैविक बिजप्रक्रिया करुन सावलीत वाळवून वापरावे. त्यामुळे रासायनिक खताची मात्रा कमी 
करण्यास मदत होते. 
भुईमूगासाठी हेक्टरी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद एवढ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. 
शास्त्रीय प्रयोगावरुन या पिकास पेरणीच्या वेळी 10 किलो नत्र व 40 किलो स्फुरद आणि पेरणी नंतर 30 
दिवसापर्यंत उर्वरीत 10 किलो नत्र देणे फायद्याचे ठरते.  
पिकाची ही गरज पुर्ण करण्यासाठी 25 किलो ( अर्धी बॅग ) युरिया, 250 किलो सिंगल सुपर 
फॉस्फेट पेरणीचे वेळी उर्वरीत अर्धी बॅग युरिया पेरणीनंतर 30 दिवसांपर्यंत द्यावा, जस्ताची कमतरता पुर्ण 
करण्यासाठी हेक्टरी 20 किलो झिंक सल्पेट जमीनीतून द्यावे. तसेच पिक 30 ते 35 आणि 50 ते 55 
दिवसांचे असतांना 8 ग्रॅम बोरीक अँसिड 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक खते ही 
 मिश्र खते ( उदा. 20 : 20 : 00 ) मधून दिले असल्यास त्याबरोबर हेक्टरी 250 किलो जिप्सम, अर्धे ( 
125 किलो ) पेरणीवेळी व अर्धे ( 125 किलो ) आ-या भरण्याचे वेळी विभागून दिले असता उत्पादनात 
वाढ होते. 
6. पाण्याचे योग्य नियोजन :- 
उन्हाळी भुईमूग साधारणत: 70 ते 80 सेमी पाण्याची गरज असते म्हणून 12 ते 13 पाणाच्या 
पाळ्या द्याव्या लागतात. तसेच भुईमूगाचे शेत ओलवून पेरणी झाल्यावर, जमिनीच्या मगदूरानुसार 8 ते 
10 दिवसांनी पाणी द्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे पेरणीनंतर 10 दिवसानंतर ते फुलावर येण्याअगोदर 
पीक 25 दिवसाचे होईपर्यंत पाण्याचा ताण देणे आवश्यक असते. त्यामुळे पिकाच्या शरीरात उत्प्रेरकाचे 
प्रमाण वाढून जास्तीत जास्त फुलाचे एकाचवेळी निर्मिती होते. परिणामी सर्व आ-या व शेंगा यांची एकाच 
वेळी वाढ होण्यास मदत होते. 
भुईमूगाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी खालील पिक वाढीच्या अवस्थांना 
पाण्याचा ताण पडू न देता पाणी देणे अत्यावश्यक आहे. 
अ) पीक फुलावर असतांना ( पेरणीनंतर 30 ते 40 दिवस ) 
ब) आ-या धरण्याच्या अवस्थेत ( पेरणीनंतर 40 ते 45 दिवस ) 
क) शेंगा भरण्याच्या अवस्थेत ( पेरणीनंतर 60 ते 65 दिवस ) 
उन्हाळी भुईमूगाची लागवड करतांना या सात सुत्रांचा अवलंब केल्यास शेतक-यांची उत्पादकता वाढण्यास 
निश्चितपणे मदत होईल.  
विशेष बाब – आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू 
देवू नये. 
7. पीक संरक्षण – भुईमूग पिकावर प्रामुख्याने टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येतो. या करिता 25 
ग्रॅम मॅन्कोझेब ( DM-45 ) + 25 ग्रॅम बाविस्टीन 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. 
भुईमूग पिकावरील रस शोषणा-या किडीसाठी मिथील डिमेटॉन 25 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर 
पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पाने खाणा-या अळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी, 
अमेरिकन बोंड अळी यांचे नियंत्रणाकरिता क्लोरोपायरीफॉस 20% प्रवाही 25 मिली. 10 लिटर पाण्यात 
मिसळून फवारावे. 
 श्री. महेश विठ्ठल महाजन 
विषय विशेषज्ञ ( पिक संरक्षण )
कृषि विज्ञान केंद्र, पाल

Share this:

  • Facebook
  • X
Tags: उन्हाळी भुईमूगकृषि विज्ञान केंद्रजे.एल. 501पालफुले उनप ( जे.एल-286)फुले भारती
Previous Post

या योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर मिळणार दुधाळ पशुधन…!

Next Post

कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अमेझोनिया-1 सॅटेलाइट लॉन्च

Next Post
कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अमेझोनिया-1 सॅटेलाइट लॉन्च

कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अमेझोनिया-1 सॅटेलाइट लॉन्च

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.