• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अल्पभूधारक काका-पुताण्याचा दुग्धव्यवसाय

वार्षिक १० लाखांचा निव्वळ नफा

Team Agroworld by Team Agroworld
March 6, 2021
in यशोगाथा
0
अल्पभूधारक काका-पुताण्याचा दुग्धव्यवसाय
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, उद्योग क्षेत्र अशा विविध ठिकाणी काका-पुतण्याच्या जोड्या सर्वांनाच माहित आहे. अशीच एक आगळीवेगळी काका-पुतण्याची जोडी शेतीच्या क्षेत्रातही कार्यरत आहे. त्यांनी आपल्या जिद्दी आणि कष्टाने दुग्धव्यवसायात प्रगती केली असून वार्षिक १० लाख रु नफा ते मिळवीत आहेत.  आजच्या घडीला भाऊ-भाऊचे, मुलगा–वडिलांचे जमत नाही असे चित्र समाजात ठिकठिकाणी पहावयास मिळते. पण काका-पुताण्यातील प्रेम, जिव्हाळा त्यातून दुग्ध व्यवसायाची संकल्पना यशस्वीरित्या पूर्णत्वास नेऊन नात्यातील एक नवा आदर्श अण्णासाहेब रामचंद्र पाटील व पुतण्या लखन अमर पाटील यांनी समाजाला दिला आहे.
अण्णासाहेब रामचंद्र पाटील हे कवठेमहाकाळ तालुक्यातील बोरगांव (आमराईनगर) येथील रहिवाशी आहेत. तालुक्यापासून १२ किमी अंतरावर बोरगांव हे गांव वसले आहे. पूर्वीच्या काळी या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत होता, पण जलसिंचानाच्या सोयी झाल्याने गावाचा दुष्काळ पूर्ण संपला आहे. त्यामुळे आता गावकरी भाजीपाला, दुग्धव्यवसाय, द्राक्ष, ऊस यासारखी नगदी पिके घेतात.  त्याचबरोबर गावातील तरुण वर्गाचा व्यवसायाकडेही कल आहे.  येथीलच अण्णासाहेब पाटील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित १.५ एकर जमीन आहे. संपूर्ण जमीन ही खडकाळ प्रकारची आहे. त्यामुळे पिकण्यास कमी उपजाऊ आहे. घराच्या नाजूक परिस्थितीमुळे पाटील यांचे शिक्षण हे ८ वी पर्यंत झाले आहे. शाळा सोडल्यानंतर काही दिवस दुसऱ्यांच्या शेतात काम केले. नंतर काही दिवस मुंबईमध्ये तीन हजार रु पगारावर रेशनिंगच्या दुकानावर काम केले. दरम्यान गावाकडे एक कंपनी सुरु होणार असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे गावाकडे येऊन तेथे काम सुरु केले. गावात असल्याने घरची शेती व कंपनी असे दोनही कामे करणे शक्य झाले.


व्यावसायिक दूरदृष्टी असलेला पुतण्या
       अण्णासाहेब पाटील यांच्या भावाचे आकस्मित निधन झाले, तेव्हा पुतण्या लखन हा अवघा ७ वर्षाचा होता. त्यामुळे घरी पाहणारे कुणीही नव्हते. दुसरे कुणाचे आर्थिक पाठबळही नव्हते. संपूर्ण परिवाराची जबाबदारी अण्णासाहेब यांच्यावर आली. घरी मोठा परिवार होता आणि कमाविणारा एकाच जण होता. त्यामुळे पुतण्या लखन यानेही १० वी पासून शिक्षण सोडले. ज्यावेळी लखन हाताखाली आला त्यावेळी त्यालाही काकांनी कंपनीमध्ये कामासाठी विचारणा केली. परंतु लखन हा व्यावसायिक दृष्टिकोन असलेला जिद्दी मुलगा होता त्यामुळे त्याला दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे आवडत नव्हते. पुतण्याला कंपनीत कामाला लावणे शक्य झाले नाही. त्यामुळे काकांनी त्याला स्वतःचा मार्ग निवडण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले. केला तर स्वतःचा काहीतरी व्यवसायच करायचा ही जिद्द लखनने कायम ठेवली.
२०१७ ला पाटील डेअरी फार्मची उभारणी
      विविध व्यवसायाची चाचपणी करत असतांना त्याला आवडता असा पशुपालनाचा छंद हाच व्यवसाय म्हणून केला तर चांगले अर्थाजन करता येईल असा आशेचा किरण दिसला. लखनला सुरुवातीपासून गाई, म्हशी, बैल सांभाळण्याची खूप आवड होती. त्यामुळे दुग्धव्यवसाय हाच आपल्याला विकासाकडे घेऊन जाणार याची त्याला कल्पना होती. गावातील मोठ-मोठाले गोठे पाहून आपलाही असाच गोठा असावा ही जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली. कितीही कष्ट करावे लागले तरी आपला स्वतःचा गायीचा गोठा उभारायचा निर्णय पुतण्याने काकांच्या समोर ठेवला. पूर्वीपेक्षा आता स्थिती चांगली होती लखन कामासाठी हाताशी होता त्यामुळे अण्णासाहेब यांनाही तो निर्णय आवडला आणि त्यांनी त्यादृष्टीने तयारी सुरु केली.


बँका व फायनान्स कंपन्यांनी नाकारले कर्ज
    पाटील यांची शेती कमी असल्याने अल्पभूधारक म्हणून त्यांना कोणतीही बँक व फायनान्स कंपनी यांनी कर्ज देण्यास सहमती दर्शविली नाही. दुधव्यवसाय सुरु करायचा म्हणजे भांडवल तर हवेच आणि बँका तर कर्ज देण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे घरातील दागिने गहाण ठेऊन शेडच्या उभारणीसाठी भांडवल उभारले. त्यामधून १३० फुट लांब व १६ फुट रुंद अश्या पद्धतीचा सुसज्ज असा गोठा तयार केला.

सुरुवातीला ३ गायींपासून व्यवसायाची सुरुवात केली. गुरांचे आजार, त्यांना लागणारे खाद्य यांचा अभ्यास केला. अशा विविध बारीकसारीक बाबींचा अभ्यास केला. त्यांनतर डेअरी उत्पादकांकडून पैसे घेऊन गायींची संख्या अजून वाढविली. सध्या त्यांच्याकडे एकूण १९ गाई आहेत. यातही दुध देणाऱ्या पशूंची सांख्य अधिक आहे.
गोठ्यातील दिनक्रम
    काका-पुतण्याच्या दिवसाची सुरुवात पाहटे ४.०० वाजता होते. गोठ्यातील शेण काढणे, वैरण घालणे, ही कामे केली जातात. अण्णासाहेब पाटील यांची पत्नी सरिता व मुलगा हर्षल या सर्वांचाच गोठ्यातील कामात सक्रीय सहभाग असतो. आजही पाटील कंपनीत काम करतात. त्यामुळे ते जेव्हा कंपनीत असतात त्यावेळी पुतण्या लखन व पत्नी सरिता सर्व गोठ्याची व्यवस्था सांभाळतात. वैरण कापण्यासाठी कडबाकुट्टी मशीन आहे. गायींचे आजारपण व इतर देखभाल ही कामे सरिता बघतात. सकाळी ६.३० वाजता तर सायंकाळी ६.३० वाजता दुध काढले जाते. दिवसातून गायींना ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुतले जाते. गायींचा गोठा हा गावापासून २ किमीवर आहे. त्यामुळे तेथील सुरक्षेच्या दृष्टीने प्रिन्स व गोपी नावाचे दोन श्वान त्यांनी पाळले आहेत


अर्थार्जन
     साधारण दिवसाला २०० लिटरच्या सरासरीने १९ दुधाळ गायींपासून दुध मिळते. दुधाचा दर हा ३० रु प्रतिलिटर मिळतो. याप्रमाणे महिन्याला १ लाख ८० हजार रु चे दुध विक्री होते. काही वेळा गायींचा भाकड हा जास्त असल्यास दुध कमी जास्त प्रमाणात मिळते. वर्षभराचे शेणखत ३५ ट्रॉली मिळते. याचे पैसे हे बोनसच्या स्वरुपात शिल्लक राहतात. सकाळ संध्याकाळ गायींना सरकी ढेप, गोबी, मका चुणी अश्या विविध प्रकारचे विविध खाद्य दिले जाते. गुरांचा चारा, औषध व इतर किरकोळ खर्च जाता निव्वळ १० लाख रु वार्षिक नफा या व्यवसायातून मिळतो.

प्रतिक्रिया
कमीतकमी २ गाईपासून सुरुवात करावी
    दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत लखन यांना विचारले असता ते सांगतात. युवा शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसायात यावे. सुरुवात करतांना फार मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन सुरुवात न करता फक्त कमीतकमी २ गाईपासून सुरुवात करावी. जेणेकरून या व्यवसायातील बारकावे आणि अडचणी लक्षात येतील. कोणत्याही कामाची लाज न बाळगता कष्ट केल्यास नक्कीच यश मिळते. या व्यवसायात मिळलेला अनुभव आणि भविष्यातील संधी पाहता आम्हाला आत ५० गायींचा गोठा वाढविण्याचा विचार आहे.
लखन पाटील

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अॅग्रोखिल्लारी बैलगायीडेअरीदुध व्यवसायनोकरीम्हशींशेतकरी
Previous Post

गिरणा काठच्या पद्मालय ब्रॅण्डची पवन भरारी

Next Post

तंत्रज्ञानात अग्रेसर…‘टीम अ‍ॅग्रोवर्ल्ड’

Next Post
तंत्रज्ञानात अग्रेसर…‘टीम अ‍ॅग्रोवर्ल्ड’

तंत्रज्ञानात अग्रेसर...‘टीम अ‍ॅग्रोवर्ल्ड'

ताज्या बातम्या

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish