सध्याची पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता काही शेतकर्याकडे दोन ते तीन ओलिताची सोय आहे. या परिस्थिती ज्वारी, करडई, हरभरा, गहू आदी पिकांची पेरणी केलेली आहे. या पिकाला काटेकोर व्यवस्थापन करून पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.-
डॉ. सूर्यकांत पवार
रब्बी ज्वारी ः * पीक उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी पहिली विरळणी करावी. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरी विरळणी करून हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवावी (हेक्टरी 1.20 ते 1.35 लाख झाडे). * कोरडवाहू ज्वारीस पेरणीनंतर 3, 5 व 8 आठवड्यांनी एकूण तीन कोळपण्या द्याव्यात आणि आवश्यकतेनुसार 1 ते 2 निंदण्या कराव्यात म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडणार नाहीत, जमिनीवर ओलावा टिकून राहील आणि तनाचा बंदोबस्त़ होईल.- रब्बी हंगामात जमिनीतील जवळवास 60 ते 70 टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे कमी होतो. जमिनीतील उपलब्ध़ ओलावा टिकविण्यासाठी शेतातील काढलेले तण, पालापाचोळा, गव्हाची काडे, तूर काटके आदीचा वापर ज्वारी पेरल्यापासून 50 दिवसाच्या आत आच्छादन म्हणून करावा.
- शक़्य झाल्यास कमकुवत झाडे काढावीत.
- संरक्षित पाणी व्यवस्थापन करावे. एकच पाण्याची सोय असल्यास पीक 35 ते 40 दिवासाचे असतांना किंवा पीक पोटर्यात असतांना पाणी घावे.
- पाणी मोकाट पद्धतीने न देता पट्टा पद्धतीने द्यावे.
करडई ः * पीक उगवणीनंतर 25 ते 30 दिवसांनी विरळणी करून दोन रोपातील अंतर 20 से.मी. ठेवावे. * पीक उगवणीनंतर 25 ते 30 आणि 45 ते 50 दिवसांनी दोन निंदण्या व कोळपण्या कराव्यात. * पाणी सोड ओळ पद्धतीने किंवा रुंद वरंबा पद्धतीद्वारे द्यावे. * सोड ओळ पद्धतीने पिकाच्या दोन ओळीनंतर एक ओळ पेरणी न करता सोडून घावी व सोडलेल्या ओळीतून सरी पाडून त्या सरीद्वारे पिकास पाणी द्यावे. * सुरवातीच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करावा. * पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (पीक फुलावर येते वेळेस व बोंडात दाणे भरताना) पाणी द्यावे.
गहू ः * गव्हाची एकेरी पेरणी करावी. * वेळेवर आंतर मशागतीमुळे तणाचा नायनाट होवून ओलावा टिकून राहण्यास मदत होते. * पेरणीनंतर 30 ते 40 दिवसाच्या आत गरजेप्रमाणे 1 ते 2 वेळा खुरपणी करावी. * आच्छादनाचा वापर करावा. - पाणी देण्यासाठी पिकास तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा.
- कमी प्रमाणात ओलीताची सोय असेल तर पाण्याच्या पाळ्याचे पुढीप्रमाणे नियोजन करावे.
ओलीताची उपलब्ध़ता पाण्याची पाळी देण्याची वेळ (पेरणीनंतरचे दिवस)
एक ओलीतची सोय 42
दोन ओलीतची सोय 21, 65
तीन ओलीतची सोय 21, 42, 65
हरभरा ः * तीन आठवड्याच्या आत पिकास एक कोळपणी व खुरपणी करून शेत तणविरहीत ठेवावे. * जिरायती क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असतो आणि एखादे पाणी देणे शक़्य असल्यास पिकाला फुले येवू लागताच पाणी घावे. * जिरायती हरभर्यासाठी पीक फुलावर येण्यापूर्वी एक टक्का पोटॅशियम नायट्रेट किंवा दोन टक्के युरीयाची फवारणी करावी. त्यानंतर दुसरी 15 दिवसांनी फवारणी करावी. * तूषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.
ऊस ः * हलक्या ते मध्यम जमिनीत पाणी लवकर मुरते व जास्त पाणी दिल्यास बहुतांशी पाणी निचर्याद्वारे वाया जाते अशा जमिनीत सर्वसाधारण 5 से.मी. पर्यंत पाणी द्यावे व दोन पाळ्यातील अंतर कमी करावे. * पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एकावेळी एकच सरीत पाणी न देता दोन ते तीन सर्यामध्ये तो सारख्या प्रमाणात विभागून घावा. * पाणी नेहमी एकाआड एक सरीमध्ये द्यावे. * पट्टा पद्धतीने व जोडओळ पद्धतीने उसाची लागवड करावी. * हेक्टरी 8 ते 10 टन ऊसाचे पाचट किंवा शेतातील पालापाचोळा अथवा पॉलीथीन सीटचा वापर करावा. * अती अवर्षण काळात पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन (10 टक्के) बाष्पीभवन विरोधी द्रावणाचे 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. * पिकांच्या बुंध्याकडील वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत व त्याचा आच्छादनासाठी वापर करावा. * तणांचा बंदोबस्त़ करावा. * उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार असेल तर अगोदर नोव्हेंबर पासूनच प्रत्येक पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे व शक्य तेथे आंतरमशागत करावी. पिकाला सिंगल सुपर फॉस्फेटचा 25 टक्के हप्ता अधिक घावा.
मो.नं. 9422178982
(लेखक वनामकृवि अंतर्गत औरंगाबाद येथे
संशोधन सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत.)