तुम्ही लाल मुळा पाहिला आहे का आणि पाहिला असेल तर खाल्ला आहे का ? आपण सर्वांनी पांढरा मुळा खाल्ला पण फार कमी लोकांनी लाल रंगाचा मुळा खाल्ला असेल. या लाल मुळ्यात जास्त अँटिऑक्सिडंट्स आढळतात . लाल मुळ्यात पेलार्गोनिडिन नावाचे अँथोसायनिन असते, त्यामुळे या मुळ्याचा लाल रंग असतो. हा मुळा आपण आपल्या भारतातही लागवड करू शकतो. लाल मुळ्याचा वापर आपण सॅलडमध्ये करतो. हा मुळा गावात नसून शहरात याचा वापर केला जातो. लाल मुळ्याची किंमत ही पांढरा मुळापेक्षा जास्त आहे.यामुळे चव पांढऱ्या मुळ्यासारखेच असते.
लाल मुळ्याची लागवड कशी केली जाते
हे पीक फक्त थंड हवामानातील पीक आहे. या पिकाची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात योग्य ठरते. लाल मुळ्याच्या लागवडीसाठी जीवाश्म माती सर्वात योग्य असते. पिकाची लागवड होण्यासाठी निचरा होणारी जमीन उत्तम असते म्हणजेच जमीन पाणी शोषून ठेवणारी चांगली असते. जमिनीचा सामू 5 ते 7.5 या दरम्यान असावे लागते. या पिकाच्या पेरणीसाठी सुमारे आठ ते दहा किलो बियाणे लागते. साधारण याची रोपे लावलेली चांगले असते. मातीचा PH मुल्य फक्त 6.5 ते 7.5 दरम्यान असावे. पेरणीनंतर साधारण 20 ते 40 दिवसात याचे मुळे यायला सुरुवात होते. एकेरी 50 क्विंटल पर्यंतचे त्याचे उत्पादन मिळते.
कमी खर्च व जास्त नफा
या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून आपल्याला चांगला नफा मिळवता येतो. खूप कमी शेतकरी आहेत जे या पिकाचे उत्पन्न घेतात यामुळे अजूनही हा मुळा बाजारात क्वचितच मिळतो. सामान्य मनापेक्षा अधिक नफा हा लाल मुळा मिळवून देऊ शकतो.
किती मिळतो नफा
सर्वसाधारणपणे पांढऱ्या मुळ्याला बाजारात 60 ते 70 रु किलो पर्यंत भाव असतो, पण लाल मुळ्याचा भाव हा 500 ते 800 रु किलोपर्यंत असतो. अशा परिस्थितीत कमी खर्चात अधिक नफा मिळू शकतो. मोठ मोठे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट या मुळ्याला जास्त प्राधान्य देतात. सॅलड म्हणून या मुळ्याचा वापर केला जातो.
लाल मुळ्याची खासियत
लाल मुळा फ्रेंच मुळा म्हणून ओळखला जातो. यामुळे यात अधिक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म आहे. जे पांढऱ्या मुळ्यापासून लाल मुळाला खास बनवते. या मुळ्याची चव हलकी तिखट असते. मुळे गडद लाल रंगाची असतात आणि पाने गडद हिरव्या रंगाची असतात.