शेळी पालन व्यवसायामध्ये 60 ते 70 टक्के खर्च हा फक्त आहारावर होत असतो. हा व्यवसाय प्रामुख्याने अवर्षण प्रवण, दुष्काळी तसेच निमदुष्कळी भागामध्ये प्रामुख्याने केला जातो. सध्या राज्यामध्ये बंदीस्त शेळीपालन सकंल्पना रुजत आहे. बंदीस्त शेळीपालन करीत असताना व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरीता कमी खर्चामध्ये अधिक व पौष्टिक चारा उत्पादन होणे महत्वाचे आहे. परंतु शेळीपालन व्यवसाय करीत असतांना आहार व्यवस्थापनाबाबत बरयाच शेळी पालकांमधे योग्य नियोजन होत नसल्याचे दिसून येते. पौष्टिक चारा उपलब्ध करण्या करीता उत्पादन खर्चामध्ये वाढ होऊन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरीता अडचणी येतात.
शेळी पालन व्यवसायामध्ये नवीन तत्रंज्ञानाचा अवलंब करून व्यवस्थापनावरील खर्च कसा कमी करता येईल, याबाबत शेतकर्यांनी सदैव प्रयत्नशील असणे आवश्यक असते. यामध्ये अॅझोलाचा शेळ्यांच्या आहारात वापर केल्यास आपला खाद्यावरील खर्च कमी होऊन निश्चितच हा व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो. अॅझोला ही पाण्यावर तरंगणारी शेवाळवर्गीय वनस्पती आहे. अझोला मध्येअसणारी पोषणमूल्य व पशधुनास सहज पचनीय असल्यामुळे याचा वापर पशूआहारामध्ये मोठया प्रमाणात होत आहे. अझोला मध्ये आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. अॅझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्याने जनावरे अॅॅझोला सहज पचवू शकतात. अॅझोलाचे घरच्या घरी कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य आहे.
अॅझोला मध्ये विविध खाद्य घटक जसे प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे (अ, ब आणि बीटा कॅरोटिन), क्षार (कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम) व शरीरवाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात असतात. शुष्क घटकांच्या प्रमाणानुसार, अझोला मध्ये 25-35 टक्के प्रथिने, 10 ते 15 टक्के क्षार आणि 7 ते 10 टक्के अमिनो आम्ले, जैविक घटक पॉलिमर असतात. अॅझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्याने जनावरे अॅझोला सहज पचवू शकतात. जनावरांना अझोला थेट अथवा खुराकात मिसळून देता येते. गाई, म्हशी, शेळी, वराह, कोंबड्यांना अॅॅझोलाचा खाद्य म्हणून वापर करता येतो.
…असे घ्या अझोला उत्पादन
- अॅझोला लागवड करावयाच्या ठिकाणच्या जमीन समतल करावी.
- वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. बाय 2 मी.चौरसाकृती रचना करावी.
- 2 मीटर बाय 2 मीटर आकाराचे प्लॅस्टिकचे कापड विटांनी बनविलेल्या चौरसाकृती खड्ड्यामध्ये अंथरावे.
- 10 ते 15 किलो चाळून घेतलेली चांगली माती खड्ड्यामध्ये पसरावी.
- दोन किलो शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे 10 लिटर पाण्यात मिसळून एकजीव करून खड्ड्यात कागदावरील मातीवर पसरवून गादी करावी. त्यावर पाण्याची पातळी 10 सें.मी. होईपर्यंत पाणी टाकावे. बायोगॅस युनिटमधील स्लरी व जनावरांच्या गोठ्यातील, स्वयंपाक घरातील वाया जाणारे पाणीदेखील
- वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. बाय 2 मी.चौरसाकृती रचना करावी.
- 2 मी. बाय 2 मी. आकाराचे प्लॅस्टिकचे कापड विटांनी बनविलेल्या चौरसाकृती खड्ड्यामध्ये अंथरावे.
- 10 ते 15 किलो चाळून घेतलेली चांगली माती खड्ड्यामध्ये पसरावी.
- दोन किलो शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे 10 लिटर पाण्यात मिसळून एकजीव करून खड्ड्यात कागदावरील मातीवर पसरवून गादी करावी. त्यावर पाण्याची पातळी 10 सें.मी. होईपर्यंत पाणी टाकावे. बायोगॅस युनिटमधील स्लरी व जनावरांच्या गोठ्यातील, स्वयंपाक घरातील वाया जाणारे पाणीदेखील अझोला खड्ड्यात वापरता येऊ शकते.
- त्यामध्ये 500 ग्रॅम ते एक किलो अझोलाचे कल्चर समप्रमाणात पसरावे. त्यावर ताजे पाणी शिंपडावे.
- एक आठवड्यात अॅॅझोला चांगले वाढते. हिरव्या गालिच्याप्रमाणे दिसू लागते.