सध्या देशात वारंवार हवामान बदलत आहे. या बदलाचा झाडे-वनस्पतींबरोबरच गुरांवरही परिणाम होऊ शकतो. विशेषत: शेळ्या-बकऱ्यांमध्ये टीपीआर रोगाच्या संक्रमणाची भीती असते. कडाक्याचा उन्हाळा आणि अधूनमधून पाऊस अशा परिस्थितीत जनावरे आजारी पडण्याचा धोका वाढतो.
विशेषत: उघड्यावर चरायला जाणाऱ्या शेळ्या, गायी आणि म्हशींना त्रास होऊ शकतो. या काळात ते संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात येतात आणि आजारी पडतात. त्यामुळे या हंगामात जनावरांची काळजी घेण्याबाबत शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे.
सरकारनं पशुपालकांसाठी जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये असं म्हटलं आहे की, शेळ्यांमध्ये टीपीआर रोगाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या रोगाची लागण झाल्यावर योग्य उपचार न मिळाल्यानं अनेकदा शेळ्यांचा मृत्यू होतो. हा रोग टाळण्यासाठी प्रत्येक शेळीला टीपीआर लस द्यावी. एक मिलिलिटरची ही लस शेळ्यांच्या त्वचेवर लावली जाते. ज्या शेळ्यांचे वय तीन महिन्यांपेक्षा कमी आहे किंवा गाभण असलेल्या शेळ्यांना ही लस टोचू नये.
या आजारापासून बचाव करण्यासाठी जनावरांना सूर्यप्रकाशापासून संरक्षण द्यावं आणि त्यांना पिण्यासाठी पुरेसं पाणी द्यावं. टीपीआर रोगाची लागण झालेल्या जनावरांना खूप ताप येतो. तोंडात फोड येतात. बाधित शेळीच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येतं, जुलाब आणि न्यूमोनियाची लक्षणं दिसतात.
- धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !
- आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !
- खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज
- अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव
- राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी