मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
ऑक्टोबर महिन्याची सुरुवात ही उन्हाच्या चटक्याने झाली पण, त्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात प्रामुख्याने रात्रीच्या वेळी मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, काल (दि. 13 रोजी) काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा,अहमदनगर, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतातील तण काढायचंय तेही काहीही त्रास न होता.. मग हा व्हिडीओ बघाच
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇