मुंबई : हवामान बदलामुळे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकरी खचू नये म्हणून शासनाने आंबिया बहार फळपीक विमा योजना 2024 – 25 लागू केली आहे. काय आहे ही योजना ?, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ?, कोणत्या फळांचा समावेश आहे ? इत्यादी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
अवेळी होणारा पाऊस, कमी आणि जास्त तापमान, गारपीट, सापेक्ष आद्रता, वादळी वारा यासारख्या हवामान धोक्यांपासून या योजनेच्या माध्यमातून संरक्षण दिले जाणार आहे. आंबिया बहार फळ पीक विमा योजना ही 30 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सहभाग ऐच्छिक आहे
या योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे त्याठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. तसेच जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.
योजनेत कोणत्या फळांचा समावेश
डाळिंब, द्राक्ष, स्ट्रॉबेरी,
केळी, पपई, आंबा
काजू, संत्रा, मोसंबी
येथे करा अर्ज
आंबिया बहार फळ पीक विमा 2024 – 25 योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही PMFBY च्या संकेतस्थळावर आपला अर्ज करू शकता. या संकेतस्थळावर अर्ज करताना तुम्हाला बँक खाते क्रमांक, आधार कार्ड पासबुक फोटो, डिजिटल सहीचा सातबारा उतारा व हमीपत्र ही कागदपत्रे लागणार आहेत. शेतकर्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
ही योजना खालीलप्रमाणे कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबविण्यात येत असते.
भारतीय कृषी विमा कंपनी लि. – जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी
फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. – जालना जिल्ह्यासाठी
युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – छत्रपती संभाजीनगर, धाराशिव ,अमरावती,अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार
बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, आणि वाशिम जिल्ह्यासाठी
फळपीक विमा योजनेचा अर्ज करण्याची अंतिम तारीख
द्राक्ष पिकासाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोबर, 2024
मोसंबी, केळी पपई पिकासाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024
संत्रा, काजू, आंबा (कोकण) पिकासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024
आंबा (इतर जिल्हे) अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 असा आहे.
स्ट्रॉबेरी पिकासाठी अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2024
डाळिंब पिकासाठी अंतिम दिनांक 14 जानेवारी 2025
सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रो
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार 2 लाखांची मदत
- कृषी यांत्रिकीकारणासाठी मिळणार 80 टक्के अनुदान