मुंबई : Sukanya Samriddhi Yojana अनेक लहान बचत योजना या केंद्र सरकारद्वारे चालवल्या जातात. यातीलच सुकन्या समृद्धी योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया सुकन्या समृद्धी योजनेविषयी..
सुकन्या समृद्धी योजनेत थोड्या प्रमाणात पैसे गुंतवून भविष्यासाठी भरीव निधी बनवू शकतो. जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी, उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करायची आहे तर ही योजना तुमच्यासाठी अधिक चांगली ठरू शकते. केंद्र सरकारने ही योजना बेटी पढाओ बेटी बचाओ योजनेअंतर्गत सुरु केलेली आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
इतक्या रुपयांपासून करा गुंतवणूक
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही फक्त 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करू शकतात. आणि यातील खास गोष्ट म्हणजे यामध्ये इतर योजनांच्या तुलनेत व्याज चांगले मिळते. यासोबत कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलींचे वय हे १० वर्षाच्या आत असावे लागते. तरच तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
या योजनेचा गुंतवणूक केल्यानंतर लॉक-इन कालावधी २१ वर्षांचा असून मुलगी २१ वर्षाची झाल्यावरच तुम्हाला सर्व पैसे काढता येईल. तथापि, शिक्षणासाठी 50% रक्कम काढायची असल्यास मुलीचे वय हे १८ वर्ष पूर्ण असायला हवे. त्यानंतरच तुम्हाला ही रक्कम काढता येईल. समजा, यावेळी जर खातेदारांचा अचानक मृत्यू झाला तर ते मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकतात. या योजनेचे एक खास वैशिष्ट्य आहे. यात तुम्हाला संपूर्ण २१ वर्षे पैसे जमा करावे लागणार नाहीत. खाते उघडल्यापासून 15 वर्षांसाठीच पैसे जमा करता येतात.
असा आहे व्याज दर
या योजनेतील वार्षिक दर हा आता ८ टक्के आहे. तसेच उर्वरित वर्षभर व्याज चक्रवाढ होत राहते. वर्षाला या योजनेतून जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. गुंतवणुकीचा पर्याय हा मासिक आधारावर देखील असू शकतो. सुकन्या समृद्धी योजना ही करमुक्त योजना आहे. या EEE वर म्हणजेच कर सूट तीन वेगवेगळ्या स्तरांवर उपलब्ध आहे.
१. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर सूट.
२. त्यातून मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही कर नाही
३. मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त असते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- IMD Monsoon Update : आजचा पाऊस 23 जून : विदर्भात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी; उत्तर महाराष्ट्र कोरडाच राहणार!
- Advice to Farmers : कृषी हवामान केंद्रांचा शेतकऱ्यांना सल्ला : जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी!