मुंबई : Scheme for farmers… देशभरातील कृषी क्षेत्र अधिक मजबूत होवून उत्पादन वाढावे, यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांची माहिती आपण आज यात जाणून घेणार आहोत. मात्र यासाठी आपल्याला संपूर्ण बातमी वाचणे गरजेचे आहे.
शेती करत असताना शेतकऱ्यांना पाणी, शेती अवजारे यासारख्या साधनांची गरज असते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना ही साधने खरेदी करता येत नाहीत. शेतकऱ्याची ही गरज लक्षात घेऊन सरकार विविध योजना राबवित असते. अशाच काही योजननांपैकी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असून ‘प्रत्येक शेताला पाणी’ हे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवण्यात आली आहे. शेती करताना पाण्याची निर्माण होणारी अडचण लक्षात घेत केंद्र सरकारने कृषी सिंचन योजना राबवून शेतकऱ्यांची पाण्याची समस्या दूर केली आहे.
या योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही http://pmksy.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.
किसान क्रेडिट कार्ड योजना
शेती करत असताना शेतकऱ्यांना पेरणीपासून ते विक्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. या दरम्यान शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पैसे संबंधित समस्यावर उपाय म्हणून सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना माफक व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कार्ड दिले जाते.
यासोबतच कर्जाची वेळेवर परतफेड करण्यासाठी अनुदानही दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जवळची वित्तीय संस्था किंवा बँकेची संपर्क साधावा लागतो. किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही http://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
मृदा आरोग्य कार्ड योजना
अधिक व चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतातील मातीचा वाटा सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मातीची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. कारण त्या मातीच्या माध्यमातूनच शेतकरी पिकं घेऊ शकतात. मातीचे आरोग्य जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतीतील मातीचे नमुने माती परीक्षण चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवू शकतात. प्रयोगशाळेमध्ये माती पाठवल्यानंतर शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड जारी केले जाते. या कार्डमध्ये शेतकरी मातीची कमतरता, मातीची गरज, योग्य प्रमाणात मातीला लागणारे खत इत्यादी प्रकारची माहिती मिळू शकतात. शेतकरी मृदा आरोग्य कार्ड योजनेबद्दल अधिक माहितीसाठी http://dac.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇