मुंबई : सद्य:स्थितीमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी व निळे भुंगिरे यांचा प्रादूर्भाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी जागरुक राहून भात शेतीचे नियमित सर्वेक्षण करावे व प्रादूर्भाव आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे कीडनिहाय उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सुरळीतील अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. शेत निस्तेज दिसते. सुरळीतील अळीचा प्रादूर्भाव आढळून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे व नंतर कीडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील नंतर शेतातील पाणी एका बाजूने बाहेर काढावे व सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन पाण्याची साठवण करण्याची व्यवस्था करावी. नियंत्रणासाठी कॉस्टॅप हायड्रोक्लोराइड 4 टक्के दाणेदार 188 ग्रॅम प्रति गुंठा या प्रमाणात दाणेदार कीटकनाशक जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे. पाणथळ भागांमध्ये बांध बांधून घेऊन दाणेदार कीटकनाशकांचा वापर करावा.
भात पिकावर खोडकिडीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असून खोडकिडीची अळी प्रथम कोवळ्या पानावर उपजीविका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. त्यामुळे रोपाचा मधला भाग वरून खाली सुकत येतो यालाच गाभामर असे म्हणतात. लावणी नंतर शेतात 5 टक्के कीडग्रस्त फुटवे आढळून आल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळून आल्यास उपाययोजना कराव्यात. कॉस्टॅप हायड्रोक्लोराइड 4 टक्के दाणेदार 188 ग्रॅम प्रति गुंठा किंवा क्लोरॅनट्रीनीलीपोल 0.4 टक्के दाणेदार 100 ग्रॅम किंवा फिप्रोनील 0.3% दाणेदार 208 ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात दाणेदार कीटकनाशक जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे.
पाणथळ भागांमध्ये पाण्याचा निचरा करून बांध बांधून घेऊन दाणेदार कीटकनाशकांचा वापर करावा. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये 20 ते 25 मीटर अंतरावर एक असे आठ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत. फुटवे अवस्थेत देण्यात येणाऱ्या नत्र खताच्या मात्रे सोबत दाणेदार कीटकनाशक द्यावे.
निळ्या मुंगेराचा प्रादूर्भाव भात खाचरा मधील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा जागेवर होतो. त्यामुळे अशा सखल भागांची शेतकरी बांधवांनी वेळोवेळी पाहणी करावी. फुटव्यांच्या अवस्थेत एक भुंगेरा किंवा एक ते दोन प्रादूर्भावीत पाने प्रति चूड आढळून आल्यास या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे समजावे. या किडीच्या व्यवस्थापनाकरिता भात खाचरात पाणी जास्त काळ न साठवा निचरा होईल याची काळजी घ्यावी. भात लावणी नंतर बांध तनवीरहीत ठेवावेत. प्रादूर्भाव दिसून येताच त्वरित क्विनॉलफॉस 25% प्रवाही 25 मिली किंवा लॅमडा सायहेलोबीन 5 टक्के प्रवाही 6 मिली प्रति दहा लिटर पाण्यामधून फवारणी करावी.
ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे भात पिकावर विशेषत: सूवर्णा भात जातीवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगामुळे मुस्वातीला पानांवर ठिपके दिसून येतात व पिकाच्या वाढीसोबत ठिपक्यांचे आकारमान वाढवून पानांवर असंख्य ठिपके निर्माण होऊन पाने करपून रोपांची वाढ खुंटते. हे ठिपके दोन्ही बाजूला निमुळते असून मध्यभागी फुगीर असून त्यांच्या कडा तपकीर रंगाच्या असून मध्यभाग राखाडी रंगाचा असतो.
करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझोल 75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी 10 ग्रॅम किंवा आईसोप्रोथिऑॉलेन 40% प्रवाही 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून रोगाची लक्षणे दिसून येताच फवारणी घ्यावी. त्याचबरोबर लष्करी अळी व तपकरी तुडतुड्यांचा प्रादूर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी देखील योग्य उपाययोजना कराव्यात.
शेतकऱ्यांनी वातावरणातील बदल व किडींचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन वरीलप्रमाणे वेळीच कीडनिहाय व्यवस्थापनाच्या उपाययोजना करून आपल्या भात पिकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
पाकिस्तानातील पूर, टेक्सासमधील दुष्काळ आणि शिनजियांगमधील लॉकडाऊनने जगभरात कापूस टंचाई
Cotton Rate 2022 – शेतकऱ्याला 10 हजारांच्या वर भाव मिळू लागताच ‘सेबी’कडून कमोडिटी बाजारात कापूस व्यवहारांना महिनाभराची स्थगिती ; कापूस विक्रीची घाई करू नका
Comments 2