जळगाव : पशुसंवर्धन व्यवसायाला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने कृषी समकक्ष दर्जा दिलेला आहे. राज्यातील लाखो पशुपालकांना याचा थेट लाभ होणार आहे. या दर्जामुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन यासारखे व्यवसाय आता कृषी व्यवसाय म्हणून गणले जाणार आहेत, आणि त्यामुळे त्यांना अनेक शासकीय सवलती व योजना मिळणार आहेत.
योजनांचा लाभ मिळवा
नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व डेअरी फॉर्म, पोल्ट्री फार्म, ब्रिडर युनिट, हॅचरी, लेयर फॉर्म, मेंढी-शेळी, वराहपालन युनिट्स यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
नोंदणीपूर्वी तयार ठेवा खालील माहिती व कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. मोबाईल नंबर
3. शेत / फार्मचे Latitude आणि Longitude
4. पालन व्यवसायाचा प्रकार (उदा. गाय, म्हैस, कुक्कुट, मेंढी, शेळी, वराह)
5. गोठा / शेडची क्षमता
6. विजेच्या मीटरचा प्रकार
7. विद्युत ग्राहक क्रमांक
8. मंजूर विद्युत लोड (KW मध्ये)
9. सरासरी वार्षिक विद्युत वापर (युनिटमध्ये)
कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यावर मिळणारे लाभ :
⦁ कृषी वीज दराने विद्युत पुरवठा
⦁ ग्रामपंचायत करात सवलत
⦁ शेतीसारखी व्याजदर सवलत असलेले कर्ज
⦁ सोलर पंपासाठी अनुदान
⦁ शासनाच्या विविध योजना आणि निधीचा लाभ
हा पशुसंवर्धन क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय असून, आपला फॉर्म वेळेत नोंदवा व या योजनांचा लाभ घ्या. राज्यातील 75 लाख पशुपालकांना या निर्णयामुळे आर्थिक स्थैर्य, रोजगार व उत्पादनवाढीचा मोठा फायदा होणार आहे. पशुपालकांनो ही महत्त्वाची संधी गमावू नका, 31 जुलै 2025 पर्यंत आपली माहिती Google Form मध्ये लवकरात लवकर भरा, असे आवाहन जळगाव येथील जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
आपला व्यवसाय पुढच्या टप्प्यावर घ्या – आजच फॉर्म नोंदवा!
खालील Google Form वर आपली फॉर्म नोंदणी त्वरित करावी.
नोंदणीसाठी अंतिम दिनांक: 31 जुलै 2025
https://forms.gle/fkj1FdFKRHx1deeq8