मुंबई – कमी दाबाची मान्सून प्रणाली पाकिस्तानकडे सरकल्याने सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, बंगालच्या खोऱ्यात लो प्रेशर सक्रिय होणार आहे, ज्यामुळे मध्य व पूर्व भारतात मॉन्सून सक्रीय राहील. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता दिसत आहे. या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असेल. त्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज 12 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढू शकतो. विशेषत: कोकण, मुंबई, पुणे, तसेच विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
12 ते 18 सप्टेंबर 2025 या आठवडाभराच्या काळात सरासरी समुद्रसपाटीवरील मान्सूनचा ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीजवळ राहण्याची किंवा उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहार, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसाम आणि मेघालय या ईशान्य आणि पूर्व भारतातील बहुतेक भागात मुसळधार ते अतिवृष्टीसह व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अनेक दिवसांत मध्य भारतातील अनेक राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच, या आठवड्यात पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची गतिविधी सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे; मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सामान्यच्या जवळपास आणि वायव्य भारतातील बहुतेक भागात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे
सप्टेंबरमध्ये किमान 15 दिवस पावसाचे
12 ते 18 सप्टेंबर या आठवड्यात महाराष्ट्रातही पावसाचा वेग आणि प्रमाण चांगले राहील, या काळात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र घाटमाथा, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात पाऊस सुरूच राहील. राज्यातील सरासरी तापमान साधारण 25°-28° सेल्सियस दरम्यान राहील, ज्यामुळे वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण सप्टेंबरमध्ये किमान 15 ते 20 पावसाचे दिवस अपेक्षित आहेत.
विभागनिहाय पावसाचा अंदाज
1. मध्य/ उत्तर महाराष्ट्र
– उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रातदेखील हलका ते मध्यम पाऊस चालू राहील.
– तापमान सुमारे 28-33°C दरम्यान राहण्याची शक्यता, आद्रता जास्त.
2. मराठवाडा व विदर्भ
– मध्यम ते मुसळधार पाऊस; विशेषतः मराठवाडा, विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस शक्य.
3. पश्चिम महाराष्ट्र
– पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
– रेड अलर्ट पुणे, सातारा ह्या जिल्ह्यांसाठी जारी.
– हवामान ढगाळ तर झोंबणारा वाऱ्याने थंडी जाणवेल.
4. मुंबई आणि आसपास
– 12 ते 25 सप्टेंबर दरम्यान कायमस्वरूपी ढगाळ, काही ठिकाणी रात्री मुसळधार पाऊस.
5. कोकण प्रदेश
– 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांत वादळासह अतिमुसळधार पाऊस राहील.
– काही भागांसाठी रेड अलर्ट जारी, वारा 40 किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने वाहण्याची शक्यता.
– पहाटेपासून संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा इशारा.
जिल्हानिहाय पावसाचा अंदाज
1. जळगाव:
– 12 सप्टेंबर: हलका ते मध्यम पाऊस.
– 13-15 सप्टेंबर: उघडीप; कधीकधी ढगाळ वातावरण.
– 16-18 सप्टेंबर: पुन्हा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस.
2. धुळे:
– 12-13 सप्टेंबर: हलका पाऊस, हवामान अधूनमधून ढगाळ.
– 14-16 सप्टेंबर: मध्यम ते मुसळधार पाऊस.
– 17-18 सप्टेंबर: उघडीप; तापमान 26-32°C.
3. नंदुरबार:
– 12 सप्टेंबर: काही भागात हलका ते मध्यम पाऊस.
– 13-15 सप्टेंबर: काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.
– 16-18 सप्टेंबर: काही भागात पावसाच्या संततधारेची शक्यता
4. नाशिक:
– 12-13 सप्टेंबर: हलका ते मध्यम पाऊस, ढगाळ वातावरण.
– 14-16 सप्टेंबर: काही भागांत मुसळधार पाऊस.
– 17-18 सप्टेंबर: थोडी उघडीप; तापमान 25-31°C.
5. छत्रपती संभाजीनगर:
– 12-13 सप्टेंबर: हलका पाऊस
– 14-16 सप्टेंबर: काही भागात मुसळधार पाऊस.
– 17-18 सप्टेंबर: उघडीप, पण ढगाळ वातावरण कायम.
6. जालना:
– 12-13 सप्टेंबर: हलका ते मध्यम पाऊस.
– 14-15 सप्टेंबर: काही भागात मुसळधार पाऊस.
– 16-18 सप्टेंबर: काही ठिकाणी पावसाची संततधार.
7. अकोला:
– 12-13 सप्टेंबर: हलका ते मध्यम पाऊस.
– 14-16 सप्टेंबर: काही ठिकाणी मुसळधार पावसाचा धोका.
– 17-18 सप्टेंबर: उघडीप, ढगाळ वातावरणाने उष्णता कमी.
8. बुलडाणा:
– 12 सप्टेंबर: हलका पाऊस.
– 13-16 सप्टेंबर: काही ठिकाणी मुसळधार, सतत पाऊस.
– 17-18 सप्टेंबर: उघडीप.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
















