मुंबई – राज्यातील लांबलेला पाऊस 5 नोव्हेंबरनंतर जाण्याची चिन्हे दिसत होती. मात्र बंगालच्या उपसागरावर आणखी एक नवे कमी दाब क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुढील 2-3 दिवस पाऊस असणार आहे. शिवाय, पश्चिमी विक्षोभाचाही (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) देशातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे.
ईशान्य बंगालच्या उपसागरावर आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात, म्यानमार आणि बांगलादेश किनाऱ्यावर एक स्पष्ट कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. 5 नोव्हेंबर रोजी पश्चिमी विक्षोभाचा परिणाम वायव्य भारतावर होण्याची शक्यता आहे.

मुंबई, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.
कर्नाटक सीमेनजीक – बेळगाव, बागलकोट.
सक्रिय हवामान प्रणाली
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागर आणि लगतच्या म्यानमारवरील कमी दाबाचे क्षेत्र 4 नोव्हेंबर रोजी ईशान्य आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागर, म्यानमार आणि बांगलादेश किनाऱ्यावर तीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतरीत झाले आहे. येत्या 24 तासांत ते म्यानमार-बांगलादेश किनाऱ्यांसह आणि त्याच्या बाहेर वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. शिवाय, दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीत वरच्या हवेचे चक्राकार अभिसरण आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील पश्चिममध्य बंगालच्या उपसागरावर कमी उष्णकटिबंधीय पातळीत वरच्या हवेचे चक्राकार अभिसरण आहे. उत्तर हरियाणा आणि आसपासच्या भागातही कमी उष्णकटिबंधीय पातळीत वरच्या हवेचे चक्राकार अभिसरण आहे. चक्राकार अभिसरण म्हणून पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि आसपासच्या भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीत पसरलेला आहे.

राज्यात दक्षिण कोकणातील काही भाग वगळता, इतरत्र ते सरासरी पेक्षा जास्त असण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे.
देशातील हवामानात बदल होण्याची शक्यता
या प्रणालींच्या प्रभावाखाली, देशातील हवामानात पुढील बदल होण्याची शक्यता आहे.
वायव्य भारत: 5 नोव्हेंबर रोजी पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस तसेच हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. लगतच्या मैदानी भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद येथे विजांसह वादळ आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विजांसह वादळ होण्याची शक्यता आहे.

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात आज-उद्या पाऊस
हवामान प्रणालींचा पश्चिम भारत क्षेत्रातही परिणाम होईल. 5 आणि 6 नोव्हेंबर दरम्यान कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह वादळ होण्याची शक्यता आहे.
मध्य भारत: पूर्व मध्य प्रदेशात विजांसह वादळ होण्याची शक्यता आहे.
ईशान्य भारत: येत्या 2-3 दिवसांत नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे विजांसह वादळाची शक्यता आहे.


दक्षिणेकडील राज्यांत 8 नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबणार
दक्षिण द्वीपकल्पीय भारत क्षेत्रही हवामान प्रणालीने प्रभावित होणार आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तसेच गडगडाटी वादळाची शक्यता आहे. कर्नाटकात काही ठिकाणी 7 तर तामिळनाडूत 8 नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस लांबण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र तीव्र चक्रीवादळात बदलल्यास उत्तर अंदमान समुद्रात ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. 4 नोव्हेंबरनंतर कमी दाब क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खावळण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडीची तीव्रता कमी
आणखी 2-3 दिवसांचा पाऊस ओसरल्यानंतर, पुढे उर्वरित नोव्हेंबर महिनाभर देशातील बहुतेक भागात किमान तापमान सरासर पेक्षा जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे. फक्त वायव्य भारतात काही ठिकाणी ते सरासरी पेक्षा कमी असू शकते.
राज्यात दक्षिण कोकणातील काही भाग वगळता, इतरत्र ते सरासरी पेक्षा जास्त असण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे.



















