• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कुक्कुटपालन : पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2024
in कृषी सल्ला
0
कुक्कुटपालन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कुक्कुटपालन : सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची गोष्ट आपणापैकी बहुतेकांनी ऐकली असेल व ऐकविलीही असेल. इसापनिती मधील त्या कथेच्या चार पावले पुढे जाऊन असे म्हणता येईल, की कोंबड्या म्हणजे खरोखरच सोन्याची खाण असून एकेक अंडे हे सोन्याच्या चिपाप्रमाणे बहुमूल्य असे आहे. ही सोन्याची खाण प्रत्येकाच्या घरात सापडू शकते. परंतु त्यासाठी प्रयत्न जिद्द व चिकाटी यांचा त्रिवेणी संगम होण्याची गरज आहे. विशेषतः शाकाहारी लोक अंडी म्हटले की नाक मुरडतात. परंतु या अशा नाक मुरडण्यामुळेच ते सोन्याच्या खाणीस परागंदा होतात, हे त्यांना कळत नाही. हा व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही विद्यापीठाची पदवी घेण्याची आवश्यकता नसते. इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक नसते किंवा वयाची अटही नसते. कोणत्याही अटी नसल्याने कसलाही अटीतटीचा प्रसंग उद्भवत नाही. साधा अंगठे बहाद्दर अडाणी माणूस देखील हा व्यवसाय करू शकतो व त्यासपासून मिळणारे फायदे घेऊ शकतो.

 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडील हवामान हे कोंबड्या पाळण्यास अतिशय उपयुक्त असे आहे. त्यामुळे फारसा खर्च न करताही हा व्यवसाय वाढविणे शक्य होते. दिवसेंदिवस कोंबडीच्या मांसाला अंड्यालाही जास्त मागणी येत असल्याने प्रारंभी जोडधंदा म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय वाढविता येतो. अनेक पाश्चिमात्य राष्ट्रात याच व्यवसायावर अवलंबून राहणारे लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत.

कुक्कुटपालन : पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

१) पावसाळी वातावरणामुळे कोंबड्यांना आजार होतात.
२) पोल्ट्री शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत.
३) पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे. परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून खड्डे बुजवून घ्यावेत. पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत.

४) पावसाळ्यामध्ये शक्यतो प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत, पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत पडद्याची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते पक्ष्यांना त्रास होत नाही.
५) पक्ष्याची गादी (लिटर) दिवसातून किमान एक वेळातरी चागली खाली-वर हल- वून घ्यावी. ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते ओलसर गादीमध्ये रोगजंतूची वाढ होते, पक्षी रोगास बळी पडण्याची शक्यता असते. चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झालेली असेल, तर गादीचा तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी टाकावी.
६) गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सीडीओंसीस रोगाचे एकपेशीय जतूचे प्रमाण वाढते गादीतील आर्द्रता कमी करण्यासाठी शिफारशीनुसार चुना मिसळावा शेडमध्ये माश्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.

७) खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्यांच्या गोण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये.
८) कोंबडी खाद्य तपासून घ्यावे. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. ब्रॉयलर कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये शिफारशीत जतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत.
९) पाण्याची टाकी लोखडी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून व बाहेरून रेड ऑक्साईड लावून घ्यावे. भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून चुना लावावा.

(सौजन्य : ॲग्रोवर्ल्ड प्रकाशन)

Shree Sairam Plastic & Drip Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • IMD 15 July 2024 : राज्यात पावसाचा जोर वाढणार ; पहा कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट ?
  • EXPORT WORKSHOP.. कृषी शेतमाल निर्यात कार्यशाळा..; अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे नाशकात 20 जुलैला…

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कुक्कुटपालनपोल्ट्री शेड
Previous Post

IMD 15 July 2024 : राज्यात पावसाचा जोर वाढणार ; पहा कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट ?

Next Post

IMD चा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Next Post
IMD

IMD चा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish