मुंबई : देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम-किसान) 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. दरवर्षी त्यांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. दरम्यान, केंद्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला असून यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. या योजनेत बदल काय ?, याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल ?, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया..
20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल
असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे हप्ते काही कारणांमुळे त्यांच्या खात्यात येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. यासाठीच केंद्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने आता जिल्हा पातळीवर नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना इकडे तिकडे भटकावे लागणार नाही. ज्यामध्ये तुम्ही नोडल अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर देखील तक्रार करू शकता. या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल कारण त्यांना आता नोडल ऑफिसरच्या मदतीने त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय मिळतील.
नोडल ऑफिसरचा नंबर किंवा ईमेल आयडी जाणून घ्या..
नोडल ऑफिसरचा नंबर किंवा ईमेल आयडी जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त घरी बसून काही प्रक्रिया कराव्या लागतील.
सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जावे लागेल.
यानंतर, फार्मर कॉर्नरवर जाऊन सर्च युवर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ( Search Your Point Of Contact (POC) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला सर्च स्टेट नोडल (Search State Nodal) आणि सर्च डिस्ट्रिक्ट नोडल (Search district Nodal) असे दोन पर्याय दिसतील. यातील सर्च डिस्ट्रिक्ट नोडल (Search district Nodal) हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला राज्य (State) आणि जिल्हा (district) निवडायचे आहे. हे केल्यांनतर तुम्हाला सर्च (Search) वर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला राज्य नोडल अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची माहिती मिळेल. यातून तुम्ही कोणाशीही संपर्क साधू शकता.
पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी येणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये जारी केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. याआधी, योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला होता. ज्यामुळे 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला. लाभार्थ्यांमध्ये 2.4 कोटी महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता.
पीएम किसानची ई- केवायसी प्रक्रिया
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांच्यासाठी सरकारने ही प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी, ई-केवायसीसाठी बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य होती, जी अनेक शेतकऱ्यांसाठी, विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक होती. आता सरकारने ओटीपी आधारित ई- केवायसी आणि फेस ऑथेंटिकेशनची सुविधा सुरू केली आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त
- सौर कृषीपंपाची A to Z माहिती
- शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस
सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
(अनेकदा शासकीय योजना सुधारित केल्या जातात, अनुदान नियम व टक्केवारीतही बदल होतात. त्यामुळे, ताज्या व अपडेटेड अधिक माहिती साठी तसेच मार्गदर्शक सुचनासाठी नजीकच्या महाराष्ट्र शासन कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.)