Home बाजार भाव कांदा बाजारभाव ; या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

कांदा बाजारभाव ; या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

कांदा बाजारभाव

पुणे : मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे कांदा पिकांचे नुकसान झाले. यामुळे कांदा बाजारभावात काय परिणाम झाला ?, कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज (दि. 4) रोजी जास्तीत जास्त दर हा 5 हजार रुपये मिळाला. तर सर्वसाधारण दर हा 3 हजार 500 रुपये मिळाला. तसेच कांद्याची सर्वाधिक आवक ही पुणे कृषी उत्पन्न समितीत झाली. येथे कांद्याची 8109 क्विंटल इतकी आवक झाली. तर पुणे – पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 4 हजार 500 रुपये मिळाला. तसेच शनिवारी (दि. 2 रोजी) लासलगाव कृषी बाजार समितीत कांद्याला सर्वसाधारण दर हा 3 हजार 900 रुपये मिळाला असून कांद्याची 2352 क्विंटल इतकी आवक झाली.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (4/12/2023)

पुणे क्विंटल 8109 3550
पुणे -पिंपरी क्विंटल 1 4500
पुणे-मोशी क्विंटल 520 2750
वाई क्विंटल 20 3500
कल्याण क्विंटल 3 4250
कांदा (3/12/2023)
मंचर क्विंटल 3276 3755
दौंड-केडगाव क्विंटल 305 3500
सातारा क्विंटल 139 3200
राहता क्विंटल 1219 3200
जुन्नर क्विंटल 674 3500
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 34 2500
जुन्नर -आळेफाटा क्विंटल 2860 4000
कांदा (2/12/2023)
येवला क्विंटल 1346 3200
येवला -आंदरसूल क्विंटल 446 3400
लासलगाव क्विंटल 2352 3900
लासलगाव – निफाड क्विंटल 150 3461
लासलगाव – विंचूर क्विंटल 3850 3800
जळगाव क्विंटल 487 2500

 

Panchaganga Seeds

 

Ajit seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇