मुंबई : गेल्या वर्षी एल निनोचा प्रभाव असल्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होते. ज्यामुळे सध्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक कमी असून कांद्याचे दर 3 हजार ते 3 हजार 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उच्च पातळीवर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. मात्र, असे असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील एका बाजार समिती कांदा दराने मजल मारली असून कांद्याला सर्वाधिक दर मिळत आहे.
कांद्याचे उत्पादन हे साधारणपणे तिन्ही हंगामात घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2023 ला केंद्र सरकारने वाढलेले कांद्याचे दर पाहता कांदा निर्यातबंदी लागू केली होती. आणि लोकसभा निवडणूक काळात कांद्याचे दर पूर्णपणे घसरले होते. एवढेच नाहीतर भाव घसरल्यामुळे आणि निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दरम्यान, आता कांद्याचे भाव बघितले तर 3 हजार ते 3 हजार 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांद्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. याठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दर हा 5 हजार 061 रुपये मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, लासलगाव – विंचूर कृषी बाजार समितीतही कांद्याला चांगला दर मिळत आहे. याठिकाणी कांद्याला 4,200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत कांद्याला 3 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये काल दि. 9 ऑक्टोबर रोजी कांद्याची 01 लाख 33 हजार 929 क्विंटल ची आवक झाली.
बाजार समिती | परिमाण | आवक | सर्वसाधारण दर |
छत्रपती संभाजीनगर | क्विंटल | 2136 | 2350 |
मुंबई – मार्केट | क्विंटल | 8272 | 3850 |
खेड-चाकण | क्विंटल | 450 | 3800 |
पुणे | क्विंटल | 9857 | 3350 |
पुणे -पिंपरी | क्विंटल | 5 | 4000 |
पुणे-मोशी | क्विंटल | 599 | 2750 |
वाई | क्विंटल | 15 | 3500 |
लासलगाव – विंचूर | क्विंटल | 550 | 4051 |
श्रीरामपूर | क्विंटल | 1854 | 3550 |
पिंपळगाव बसवंत | क्विंटल | 4500 | 4300 |