मुंबई : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केले जाणार आहे. या निर्णयामुळे तात्काळ मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून सततच्या पावसामुळे पिकांचे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बुधवार (दि. ५) रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित. ग्राहकांना स्वस्त दरात वाळू-रेती उपलब्ध होणार, नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता, नॅक व एनबीए मूल्यांकनासाठी परिस स्पर्श योजना… यासह इतर #मंत्रिमंडळनिर्णय पाहा.#CabinetDecisions pic.twitter.com/JMkzTF7ZQP
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 5, 2023
शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. मानवी चुकांमुळे गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होवून अवेळी पाऊस पडणे, पावसाळ्यात उशिराने पावसाला सुरुवात होणे किंवा सतत पाऊस होवून पिकांचे नुकसान होणे अशा अडणचींचा सामना शेतकर्यांना करावा लागतो. जास्तीचे नुकसान झाल्यास काही तरी हाती लागावे म्हणून शेतकर्यांकडून पिक विमा काढला जातो. मात्र, शासकीय आदेश येईपर्यंत शेतकर्यांना पंचनाम्याची वाट पाहावी लागते. पंचनामे तातडीने झाले तरी विम्याची रक्कम कधी मिळेल याची शाश्वती नसते. मात्र, या सारख्या त्रासापासून आता शेतकर्यांची सुटका होणार आहे. कारण राज्य शासनामार्फत सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय बुधवारी (दि.5) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या निर्णयानुसार शेतकर्यांना मदत देण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षस्थानी ही बैठक पार पडली.
अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान 33 टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने अनुदान स्वरुपात शेतकर्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकरणी शेतकर्यांना मदत देणे आवश्यक आहे, या भूमिकेतून नवा निर्णय घेण्यात आला आहे.