बाजार भाव

कांद्यावरील निर्यात शुल्क रद्दनंतर दरावर झाला हा परिणाम

पुणे : कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कांद्यावर निर्यात शुल्क लावला होता. आणि याला शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली. तसेच बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता हा निर्यात शुल्क केंद्र सरकारकडून मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क केंद्राकडून मागे घेण्यात आल्याची अधिसूचना काढली आहे.

 

ही अधिसूचना जरी काढली असली तरी मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर नवीन नियम लावले आहेत. इतर देशात कांदा निर्यात करण्यासाठी 800 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य लागू राहणार आहे. तसेच हे निर्यातशुल्क 31 डिसेंबरपर्यंत लागू करण्यात येणार आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्दनंतर कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मिल्किंग मशीनचा वापर करा व दुग्धव्यवसायात वाढ करा । milking machine।

 

कांद्याला आज सर्वाधिक दर हा पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी सर्वसाधारण दर हा 5 हजार 250 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 5 हजार 500 रुपये मिळाला. तसेच काल (दि. 30) रोजी लासलगाव कृषी बाजार समितीत कांद्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 581 रुपये मिळाला. तर जळगाव कृषी बाजार समितीत कांद्याला 3 हजार 500 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

 

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (31/10/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 6 5250
संगमनेर क्विंटल 4303 2905
कांदा (30/10/2023)
कोल्हापूर क्विंटल 4736 3200
अकोला क्विंटल 1145 5500
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 1903 3250
मुंबई मार्केट क्विंटल 18302 4100
हिंगणा क्विंटल 2 4000
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 98 3000
कराड क्विंटल 150 5500
सोलापूर क्विंटल 37276 3700
बारामती क्विंटल 659 4000
धुळे क्विंटल 48 4000
लासलगाव क्विंटल 48 2581
जळगाव क्विंटल 1157 3500
नागपूर क्विंटल 1800 5250
साक्री क्विंटल 11565 4500

 

मोबाईल स्टार्टरचा वापर करा आणि घर बसल्या विद्युत पंप सुरु करा। Mobile Starter।

 

Panchaganga Seeds

 

 

OM Gayatari Nursery
OM Gayatari Nursery

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button