कृषी महोत्सवात जैन कंपनीच्या ॲग्री डेव्हलपमेंट विभागातर्फे विकसित शेतकऱ्यांच्या सोयीची यंत्रसामग्री ठेवण्यात आल्या. या सगळ्या काही आधुनिक मशिनरी आहेत. या ठिकाणी ठेवलेल्या यंत्रसामग्रीमुळे, जेणेकरून शेतकऱ्यांचे कष्ट आणि जे शेतामध्ये लागणारे मजूर कमी करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.
जैन कम्बाइन सीड प्लांटर मशीन इथे महत्त्वाचे आहे. पहिल्यांदाच आपण हे मशीन मार्केटमध्ये आणतोय. या मशीनच्या सहाय्याने साधारणतः पाच काम आपण एकाच वेळेस करू शकणार आहे. त्याच्यामध्ये खताचा बेसल डोस दिला जाईल, मातीत चांगल्या प्रकारे मिक्स केला जाईल.
गादी वाफा बनवण्याची सोय, कांद्याची सहज पेरणी
या मशीनमध्ये पुढचा भाग आहे तो गादी वाफा बनवण्याचा आहे. हा भाग साधारणतः चार फूट रुंदीचा आणि नऊ इंच उंचीचा गादी वाफा या मशीनच्या सहाय्याने बनवतो.. गादी वाफा तयार झाल्यानंतर पुढचा भाग येतो तो पेरणीचा. सगळ्या प्रकारची बियाणे पेरणी याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये खास आपण कांद्याची पेरणी करण्यासाठी याच्यामध्ये सोय केलेली आहे. यात कांद्याची रेग्युलर तर पेरणी होतेच; पण त्या व्यतिरिक्त आपण त्याच्यामध्ये कांद्याची नर्सरी पण करण्याची सोय केलेली आहे.
मेथी, धना, हरभरा, सोयाबीनसाठीही उपयुक्त
कांद्याव्यतिरिक्त दुसरा भाजीपाला आहे, जसे की मेथी, धना वगैरे ते पण याच्यावर आपण एकदम चांगल्या प्रकारे पेरणी करू शकतो. हरभरा, सोयाबीन, वाटाणा या इतर बियाण्याची पण पेरणीची सोय याच्यामध्ये आपण दिलेली आहे. आपण याच्यामध्ये सरकते फण ठेवलेले आहे, त्यामुळे दोन ओळीतले अंतर आपल्याला पाहिजे तेवढे ठेवू शकतो.
2 बियाण्यातले अंतर बदलण्यासाठी गिअर बॉक्स
दोन बियाण्यातले अंतर बदलण्यासाठी आपण एक मध्ये गिअर बॉक्स दिलाय, त्या गिअर बॉक्सच्या सहाय्याने आपण एक इंचापासून ते दहा इंचापर्यंत बियाण्यातला अंतर जेवढे पाहिजे तेवढे कमी-जास्त करू शकतो. बियाण्याची खोली एक इंचापासून ते साडेतीन इंचापर्यंत याच्यात अॅडजेस्ट करण्याची सोय केलेली आहे. अशा प्रकारे या पेरणी यंत्राद्वारे फक्त कापूस सोडून इतर सर्व प्रकारचे बियाणे एकदम चांगल्या प्रकारे पेरण्याची सोय दिलेली आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक नळी अंथरण्याची सोय
आता पेरणी झाल्यानंतर पाणी देण्याची सोय असते. ठिबक नळी अंथरण्याची सोय सुद्धा यात दिलेली आहे. साधारणतः 50 किंवा 50 एचपीपेक्षा जास्त अश्वशक्ती असणारे ट्रॅक्टर यासाठी आवश्यक आहे. चैन कम्बाईन सीड प्लांटर हे मशीन मार्केटमध्ये पहिल्यांदाच लॉन्च करतोय.
– ब्रह्मदेव चव्हाण
ॲग्री डेव्हलपमेंट विभाग,
जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- अॅग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतिची नमो बायोप्लांटची केळीची G-9 टिश्युकल्चर रोपे
- कापसाला कुठे मिळतोय सर्वाधिक दर ? ; वाचा आजचे कापूस बाजारभाव