कानपूर : Lal Mula… देशातील सर्वच शेतकरी आपल्या मेहनतीच्या जोरावर शेती क्षेत्राला विकासाच्या दिशेने घेवून जात आहेत. नवनवीन तंत्रज्ञान, वाण यांचा वापर करुन अधिक दर्जेदार बनवित आहेत. आजच्या या लेखात आपण अशाच एका प्रगतीशील शेतकर्याची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याने खेळाचे मैदान सोडून शेती केली आणि नुसती शेतीच केली नाही तर औषधी गुणांनी परिपूर्ण लाल मुळाचे उत्पादन घेवून अनेक पुरस्कार प्राप्त केले व शेतकर्यांसमोर एक आदर्श देखील निर्माण केला आहे.
कमलेश चौबे असे या प्रगतीशील शेतकर्याचे नाव असून कमलेश हे बिहार राज्यातील नरकटियागंज जिल्ह्यातील मुशहरवा गावाचे रहिवासी आहेत. कमलेश यांनी लाल मुळाची शेती करून एक चांगले उत्पन्न मिळविले आहे. कमलेश यांनी केलेल्या या प्रयोगानंतर अख्या चंपारणची शेमजमीन लाल मुळाच्या शेतीने बहरली आहे. त्यांच्या शेतातून निघालेला लाल मुळा गावासोबतच आजू-बाजूच्या बाजारात पोहोचला आहे.
कमलेश यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळाल्याचे पाहून जिल्ह्यातील अनेक शेतकरी लाल मुळाची शेती करण्याकडे आकर्षित होत आहेत. हे पाहिल्यानंतर येत्या काही दिवसात लाल मुळाची शेती संपूर्ण बिहारमध्ये होवून सर्वाना लाल मुळाची चव चाखायला मिळेल, असे वाटू लागले आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
कमलेश राहीले आहेत खेळाडू
कमलेश चौबे हे उत्कृष्ठ खेळाडू राहीले आहेत. त्यांच्या वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांनी खेळ सोडून शेती करण्यावर भर दिला. आणि लाल मुळाची शेती करुन बिहार राज्यातील अनेक शेतकर्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
महिनाभरातच निघते उत्पादन
कमलेश यांना नवनवीन पिके घेण्याची आवड असून तसे उत्पादन देखील त्यांनी घेतले आहे. नवी काही लागवड करावे म्हणून त्यांनी देहरादून येथून लाल मुळाचे बियाणे मागवून एक नवीन प्रयोग म्हणून त्याची शेती केली. आणि या प्रयोगात ते चांगले यशस्वी देखील झाले. यात त्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळाले. कमलेश चौबे सांगतात की, लाल मुळाचे पिक हे 30 ते 40 दिवसात काढण्यासाठी तयार होवून जाते. त्यामुळे त्यांनी आत 1 एकरावर या लाल मुळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मान
कमलेश चौबे यांनी केलेल्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना बिहार सरकारच्यावतीने अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कमलेश यांना मिळालेले यश पाहून इतर शेतकरी देखील शेतात काही तरी नवे करण्याचा प्रयत्न करीत आहेत.