नवी दिल्ली : India’s Agricultural Exports 2023… शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी माहिती समोर आली आहे. भारताची कृषी निर्यात 2022-23 मध्ये 6.04 टक्क्यांनी वाढली. एप्रिल-जानेवारी 2022-23 या कालावधीत भारताची कृषी निर्यात 6 टक्क्यांनी वाढ झाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीत मोठी मदत होणार आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारी दरम्यान भारताची कृषी निर्यात 6.04 टक्क्यांनी वाढून 43.37 अब्ज अमेरिकी डॉलर (USD) झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते USD 40.90 अब्ज होते. भारताच्या कृषी निर्यातीने 2021-22 या आर्थिक वर्षात USD 50.21 अब्ज इतका उच्चांक गाठला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी नुकतीच लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
2023-24 साठी अद्याप निर्यातीचे कोणतेही लक्ष्य निश्चित करण्यात आलेले नाही. कृषी निर्यातीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारते. शेतकऱ्यांना निर्यातीचा फायदा मिळावा, यासाठी सरकारने शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातदारांशी थेट संवाद साधण्यासाठी शेतकरी/कंपन्या (FPOs/FPC) आणि सहकारी संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक किसान कनेक्ट (Farmers Connect) पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय एजन्सी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांसाठी निर्यात प्रोत्साहन गतिविधींमध्ये गुंतलेली असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले.
विविध आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे आणि प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हावे. तसेच व्हर्च्युअल व्यापार मेळाव्याचे आयोजन, खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन आणि GI उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी APEDA परदेशातील भारतीय मिशनसोबत सहयोग करत आहे. APEDA ने निर्यात क्षमता असलेल्या नवीन उत्पादनांसाठी आणि नवीन गंतव्यस्थानांसाठी चाचणी शिपमेंटची सुविधा देखील दिली असल्याचं मंत्री अनुप्रिया यांनी सांगितले.