यंदाच्या हंगामात देशात कापूस उत्पादन Cotton Production वाढणार असल्याचा अंदाज सीएआय अर्थात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं वर्तवला आहे. चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन 309 लाख गाठींवर गेल्याचा अंदाज आहे. सीएआयने या पूर्वी 294 लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता.
उत्पादन वाढीमुळे देशातील कापूस दरात काहीशी घट झाली आहे. दुसरीकडे देशांतर्गत वापरातील वाढ आणि जागतिक अस्थिर निर्यात स्थितीमुळे कापसाचे दर सरासरी आठ हजार क्विंटलवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. जगभरात असलेलं मंदीचं वातावरण, इस्रायल-हमास युद्धामुळे सुएझ कालव्यातून बंद असलेली वाहतूक, रशिया-युक्रेनमधील तणाव आणि जागतिक बाजाराच्या तुलनेत देशात मिळत असलेला चांगला दर या कारणांमुळे यंदा कापसाची निर्यात थंड आहे.
कापूस उत्पादन Cotton Production
त्यातच अनियमित पावसामुळे यंदाच्या कापसाचा दर्जा घसरला आहे. कर्नाटक आणि विदर्भातील कापसापासून तयार केलेल्या धाग्याची ताण सहन करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सूतगिरण्यांकडून कापसाला मागणी घटली आहे. त्या तुलनेत मराठवाड्यातील कापसाचा दर्जा चांगला आहे. मात्र, शेतकरी गेल्या हंगामातील शिल्लक कापूस आणि या हंगामातील कापसात मिसळून विक्री करत असल्याने धाग्यांचा दर्जा घटत आहे.
अॅग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतिची नमो बायोप्लांटची केळीची G-9 टिश्युकल्चर रोपे