मुंबई : पुढील 3-4 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात हंगामातील शेवटचे कमी दाब क्षेत्र तयार झाल्याचा हा परिणाम आहे. दरम्यान, राजस्थान कच्छमधून मान्सूनची माघार सुरू झाली आहे. (Heavy Rain Alert In Vidarbha)
येत्या 23 सप्टेंबरपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी गडचिरोलीत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस पडला.
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता Heavy Rain Alert In Vidarbha
पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ॲग्रोवर्ल्डला दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान राहील. या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मान्सून हंगामातील ही कमी दाब क्षेत्राची शेवटची सिस्टीम असेल.
धो, धो बरसल्यानंतर नैऋत्य मान्सूनची राजस्थानमधून परतीच्या प्रवसाला सुरूवात, वेधशाळेचा अंदाज खरा ठरला. देशात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 7% अधिक पाऊस झाला, तर महाराष्ट्रात 26% अधिक बरसला.
महाराष्ट्रातून 5 ते 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची माघार
नैऋत्य मान्सूनने आज, 20 सप्टेंबर रोजी दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि लगतच्या कच्छच्या काही भागातून माघार घेतली आहे. मान्सून माघारीची नेहमीची सामान्य तारीख 17 सप्टेंबर असते.
भारतीय हवामान विभागाने राजस्थानात चक्रीवादळविरोधी अभिसरण तयार झाल्याचे सांगितले आहे. गेल्या 5 दिवसात पावसाचे कोणतेही निरीक्षण, ढग, पाण्याची वाफ दिसून आली नाही. खाजुवाला, बिकानेर, जोधपूर, नलिया या पट्ट्यातील मान्सून परतला आहे. महाराष्ट्रातून 5 ते 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघारी जाण्याचा अंदाज आहे.
Return Mansoon Widrawal Started राज्यातील पावसाच्या अपडेट्स
- धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शहरासह साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात सुध्दा गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याना पुर आले असून शहरातील अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
- मुसळधार पावसामुळे अकोल्यातले कापूस पिक धोक्यात
- यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस! सोयबीन, कापूस पिक धोक्यात
- मुसळधार पावसाचा कांद्याला मोठा फटका, पुढील महिन्यात मोठी दरवाढ होण्याची शक्यता
- चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, पिकेही गेली पाण्याखाली.
- जळगाव जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने शासनाने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे – खासदार उन्मेष पाटील यांची मागणी.
- जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले, प्रतिसेकंद एक लाख घनफूटने पाण्याचा विसर्ग सुरू.
- सततच्या पावसाने चिखली मतदारसंघातील पिके पाण्यात उभी असूनही 65 मि.मी. पाऊस पडला नसल्याचे सांगून प्रशासन पंचनामे करणे टाळत आहे. शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत म्हणून या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहेत, असे आमदार श्वेता महाले यांनी ॲग्रोवर्ल्डला सांगितले.
- हिंगोली जिल्ह्यात कडती-काळकोंडी परिसरात मंगळवारी दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. भवानी ओढ्याला आलेल्या पुराच्या प्रवाहात गाळात रुतून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शिवाजी पंडीत असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
पाऊस कधी वाट बघायला लावतो तर कधी वाट लावतो, लोक पुढे जाण्यासाठी माणसाशी लढतात पण आपला शेतकरी राजा हा डायरेक्ट निसर्गाशी भिडतो.#agricultureinindia #Maharashtra #Nashik #tomatofever pic.twitter.com/53XmiHJJxg
— ROSHAN DESHMUKH (@RDsofficial29D) September 19, 2022
- धुळे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असून लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. अनेक ठिकाणी धरणातून विसर्ग होत आहे.
- राहुरी, अहमदनगर : दिवसभर विश्रांतीनंतर मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस
- वैजापूर तालुक्यात मध्यम पाऊस
- रामतीर्थ तालुका बिलोली जिल्हा नांदेड जोरदार पाऊस
- बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प 100 % भरल्याने शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या तीन दिवसापासून प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणत पाऊस झाल्याने मध्य रात्री पासून सांडव्या वरून पाणी वाहत आहे. यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
- नाशिक जिल्ह्यात सूरु असलेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना आलेला पूर कायम आहे. निफाड तालुक्यातील शिवडी इथं एक महाविद्यालयीन युवती पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा मृतदेह सापडला आहे. जिल्ह्यात 24 तासांत 37 मिलिमीटर पाऊस झाला असून गंगापूरसह अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यामध्ये भातसा नदीला वारंवार पूर येत असून पुराच्या पाण्यासोबत ठाणे शहराच्या जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा जमा झालेला आहे. हा गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने पंपाद्वारे होणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे.
Claim your super offer now; More than 100+ offers 👇
Comments 2