• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सेंद्रिय शेतीसाठी घरीच तयार करा गांडूळ खत

जमिनीची पोत सुधरून मिळेल रसायनमुक्त अन्न, धान्य

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 10, 2023
in इतर
0
गांडूळ खत
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : अधिक उत्पादन मिळावे यासाठी शेतकर्‍यांकडून पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून जमिनीची पोत खराब होत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. जमिनीची पोत सुधारावी व रसायनमुक्त भाजीपाला, अन्न, धान्य मिळावे यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. जमिनीची सुपीकता वाढावी ह्यासाठी सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत असून गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धतीसह विविध माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

रासायनिक खतांच्या वापरामुळे शेत जमिन तर खराब होतच आहे, शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, अन्न, धान्य खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांकडून सेंद्रिय भाजीपाला, अन्न, धान्याची मागणी पाहता शेतकर्‍यांकडून देखील सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर दिला जात आहे. सेंद्रिय शेती करतांना सर्वात महात्वाचा घटक असतो तो गांडूळ किंवा शेण खत. आपल्याकडील बहुतांश शेतकर्‍यांकडे गाय, म्हैस, बैल यासारखी जनावरे उपलब्ध असल्याने शेण सहज उपलब्ध होत असते. या शेणाचा वापर करुन शेतकरी गांडूळ खताची निर्मिती करून जमिनीची सुपिकता वाढवू शकतो.

PMFME योजनेअंतर्गत मिळवा एक कोटींपर्यंत कर्ज – संचालक सुभाष नागरे
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/se5VHhhNHKU

गांडूळ हा जमिनीत राहणारा जीव असल्याने तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो व ते खाल्ल्यानंतर शरीरासाठी आवश्यक असलेले घटक सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीराच्या बाहेर टाकतो. त्यालाच गांडूळ खत असे म्हटले जाते. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते व परिणामी जमिनीची सुपीकता वाढते. भारतात गांडूळांच्या 300 हून अधिक प्रजाती आढळून येतात. परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या प्रजातींचे गांडूळ महत्त्वाचे असतात. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.

Vikas Milk

अशा आहेत गांडूळ खत करण्याच्या पद्धती

गांडूळ खत तयार करण्यासाठी ढीग आणि खड्डा या दोन पद्धतींचा वापर करता येतो. या दोन्ही पद्धतींमध्ये खत करतांना कृत्रिम सावलीची गरज असते. सूर्यप्रकाश व पावसापासून खताचे संरक्षण करण्यासाठी (दोन ढिगांसाठी) 4.25 मीटरची शेड तयार करावी. शेड तयार करीत असतांना शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असणे गरजेचे असते. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी.

ढीग पद्धत

ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याने जमीन ओली करून घ्यावी. त्यानंतर गवत, नारळाचा काथ्या, भाताचे तूस यासारखे लवकर कुजणार्‍या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा व हा थर पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. 100 किलो सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7 हजार प्रौढ गांडुळे सोडावीत.

दुसर्‍या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे. कुजणार्‍या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 अंश सेल्सियस दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

Jain Irrigation

खड्डा पद्धत

खड्डा पद्धतीमध्ये गांडूळ खत तयार करण्यासाठी सिमेंटचे 3 मीटर लांब, 2 मीटर रूंद आणि 60 सें.मी. खोली असलेल्या खड्ड्यांची आवश्यकता असते. खड्डा तयार केल्यानंतर खड्ड्यांच्या तळाशी गवत, भाताचे तूस, नारळाचा काथ्या, गव्हाचा कोंडा टाकावा, त्यानंतर 3 ते 5 सें.मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर 7 हजार पौढ गांडुळे (100 किलो गांडूळखतसाठी) सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील हवा खेळती ठेवावी. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर हाताने सैल करावेत. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. या पद्धतीत गांडुळ खत तयार होण्यासाठी साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.

गांडूळ आणि खत वेगळं करण्याची वेळ

खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले आहे, असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. त्यानंतर वरचा थर थोडा कोरडा झाला की ते कोरडे झालेले खत गांडुळांसकट बाहेर काढावे. तत्पूर्वी उन्हात ताडपत्री किंवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत. असे केल्यास उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील त्यामुळे गांडूळे आणि गांडुळ खत वेगळे करणे सोपे होईल. ढिगाच्यावरचे खत वेगळे केेल्यानंतर 3 ते 4 तासात सर्व गांडुळे पून्हा खत तयार करण्यासाठी खड्ड्यात सोडावीत. खत आणि गांडूळे वेगळी करतांना टिकाव, खुरपे यासारख्या साधनांचा वापर करू नये. या अवजारांमुळे गांडूळांना इजा होवून ते मरण्याची शक्यता असते. हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात हे खत शेतात टाकून जमिनीची सुपिकता वाढविता येवू शकते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आजचे बाजारभाव
  • यंदा असा असणार मान्सून ; अमेरिकन हवामान विभागाने दिला प्राथमिक अंदाज

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गांडुळ ढिगगांडूळ खतमातीसेंद्रिय शेती
Previous Post

Maka Rate : ‘या’ बाजार समितीत असे आहेत मक्याचे भाव ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

Next Post

जळगाव जिल्ह्यात असे आहेत कापसाचे भाव ; जाणून घ्या… आजचे बाजारभाव

Next Post
जळगाव जिल्ह्यात असे आहेत कापसाचे भाव ; जाणून घ्या… आजचे बाजारभाव

जळगाव जिल्ह्यात असे आहेत कापसाचे भाव ; जाणून घ्या... आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish