शेती हा आता वडिलोपार्जित व पारंपरिक व्यवसाय न राहता त्याला आधुनिकतेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे जो पारंपरिक पद्धती सोडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जुन्या व नव्याची सांगड घालतो तो शेतीमध्ये नक्कीच यशस्वी होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाथसागर जलाशयाच्या जवळ असलेल्या पैठण जवळील मादळमोही तालुका गेवराई येथील एक निवृत्त मुख्य अभियंता… शेतीला जुन्या व नव्याची सांगड घालणारे, माती – पाणी व वातावरणाचा अभ्यास करणारे, बाजारामध्ये काय विकते तेच पिकवणारे शेतकरी यशस्वी होतात. मग त्यांची शेती ही अल्पभूधारक असो, मोठा बागायतदार असो की 15 ते 20 एकर शेती करणारा मोठा शेतकरी असो… काळाची गरजपाहून शेतीमध्ये कष्ट करून उत्पादन घेणारे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे व शेतीमधून व्यवसाय करणारे यांचे उत्पादन व उत्पन्न निश्चितच लोकांना आदर्श ठरते.
जायकवाडीच्या बॅकवॉटरमुळे शेतीसाठी मुबलक पाणी
जालन्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग येथून 31 मार्च 2022 रोजी ओमप्रकाश रामप्रसाद चांडक हे निवृत्त झाले. निवृत्तीनंतर काय करायचे ?, असा विचार करत असतानाच त्यांना मादळमोही येथे एक अशी माहिती मिळाली की, जायकवाडीच्या बॅक वॉटर लगत बाकोंडो {अमदापुर} या गावी एकाची 15 एकर जमीन विक्रीला असल्याचे कळाले. ही जमीन छत्रपती संभाजीनगर पैठण मार्गापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे. पण जायकवाडीच्या बॅक वॉटरमुळे या भागात मुबलक पाणी असते. ही जमीन त्यांनी स्वतः जाऊन पाहिली. त्यांचे भाऊ कृषी विभागात कृषी विस्तारक म्हणून कार्यरत असलेले रामेश्वर चांडक यांना घेऊन त्यांनी जमिनीची पाहणी केली. या जमिनीत पंधरा वर्षांपूर्वी लावलेली केशर जातीची 625 झाडे होती. पेरू, मोसंबी व सीताफळ या फळबागा होत्या व सुमारे पाच ते सहा एकर जमीन इतर पिकांसाठी ठेवलेली दिसून येत होती, पण जमिनीची मशागत होत नसल्यामुळे जमीन रानटी गवत व इतर वनस्पतींनी झाकून गेली होती. जमिनीची प्रतवारी पाहता रामेश्वर चांडक यांनी ही जमीन घेण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार ओमकार चांडक यांनी ही जमीन 12 लाख रुपये एकर प्रमाणे खरेदी केली. एप्रिल 2022 पासून या जमिनीची मशागत सुरू झाली.
आधीच्या शेतकऱ्याने साडेपाच एकर क्षेत्रावर बारा बारा फुटावर आंब्याची 625 झाडे लावलेली होती तर पेरूच्या बागेमध्ये दोन हजार झाडे होती. गोल्डन सिताफळाची 50 झाडे तर मोसंबीची सुमारे 100 झाडे होती. मात्र, या फळझाडांकडे पूर्वीच्या शेतकऱ्याने दर्लक्षु केल्यामुळे झाडांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. चांडक यांनी जमीन ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण जमिनीची मशागत करून शेत स्वच्छ केले. बांधावरील नको असलेल्या झाडांचा नायनाट केला. जमिनीत दोन बोर होते ज्यांची खोली 150 फूट होती. पण, पाणी द्यायची व्यवस्था नव्हती. जुन्या झाडाला खोडकिड, फंगस यांनी व्यापून टाकलेले होते. चांडक यांनी ट्रायकोडर्माचा वापर करून जुन्या झाडावरचे फंगस व खोडकीड नष्ट केली. आंब्याच्या झाडांची व्यवस्थित छाटणी करून त्याला आळे केले व जैन इरिगेशनचे ड्रीप सिस्टीम संपूर्ण आंब्याच्या क्षेत्रात केली. रिकामी झालेली जमीन नांगरून पाया घालून सजीव करून त्यामध्ये जैविक उत्पादनासाठी व सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी तागाची लागवडकरून तो ताग फुलावर आल्यानंतर जमिनीत काढला.
बऱ्यापैकी उत्पादन
जमिनीची सुधारणा झाली सर्वफळबागांना चार वर्षे कुजलेले शेणखत विकत आणून जूनच्या सुरुवातीस दिले. 20 ते 20 मध्ये झाडांची फळे घेण्याचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी उत्पादन निघाले पण व्यावसायिक दृष्टिकोनातून हे परवडणारे नव्हते त्यामुळे त्यांनी रामेश्वर चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील संपूर्ण वर्ष शेती सुधारित करण्यासाठी घालवले.
अन शेती कामात वाढला उत्साह
सर्वप्रथम शेतीमध्ये साडेबावीस किलो वॅटची सोलर सिस्टीम बसवून घेतली. तर शेतातील संपूर्ण फळझाडांना ठिंबक बसवून घेतले. या माध्यमातून त्यांनी पावसाळा वगळता दररोज झाडांच्या वयानुसार 2 ते 4 तास पाणी देणे सुरु ठेवले. पावसाळ्यापूर्वी शेणखत म्हणजे जवळपास 100 टन खत संपूर्ण झाडांना दिले. यामुळे जमिनीची प्रतवारी सुधारली व झाडांना देखील जिवंतपणा जाणवू लागला. यामुळे त्यांचा शेती कामात उत्साह वाढला. मग त्यांनी हुरडा पार्टी, शिवार फेरी जवळपासच्या शेतकऱ्यांना शेतीमधील तंत्रज्ञांनाचे मार्गदर्शन याचे छोटे-मोठे मेळावे आपल्या शेतात सुरू केले. यामुळे विविध तज्ञांचे येणे जाणे सुरू झाले व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शेतामधील परिस्थिती सुधारणे व स्वतः अभ्यास करत राहणे हे प्रयोग सुरू झाले व ते शेतामध्ये रमत गेले. त्यांनी शेतामध्ये पंधरा हजार रुपये महिन्याप्रमाणे दोन कायमस्वरूपी कामगार ठेवले. याशिवाय रोजंदारीवरील मजुरांना 300 ते 400 रुपये रोजगार देणे सुरू झाले. या संपूर्ण शेतातील कार्यक्रमात व कामात त्यांच्या पत्नी सौ. सुनीता ओमकार चांडक या सुद्धा मदत करू लागल्या. शेती घेतानाच ओमकार चांडक यांनी तिघांच्या नावाने ही जमीन घेतलीहोती. त्यात महिला मंडळी सुद्धा मालकीण आहेत.
36 टन केशर आंब्याचे उत्पादन
ओमकार चांडक यांनी निसर्गाशी एकरूप व्हावे म्हणून तीन गावरान गाईसुद्धा घेतल्या. या गावरान गाईचे शेण व मुद्रांपासून जीवामृत तयार करत आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे जीवामृतामुळे संपूर्ण 15 एकर जमिनीला योग्य तंत्रज्ञानाच्या आधारे सेंद्रिय खताचा व सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात पुरवठा होतो आणि हाच त्यामागचा त्यांचा मूळ उद्देश होता. यंदा 2024 मध्ये त्यांना 36 टन केशर आंब्याचे उत्पादन झाले. यापैकी 28 टन आंब्यांची जागेवरच 72 रुपये किलो प्रमाणे विक्री करण्यात आली तर 120 रुपये किलोप्रमाणे