Home शासकीय योजना शेतकऱ्यांनो, दरमहा 55 रुपये जमा करा आणि मिळवा 3000 रुपये मासिक पेन्शन;...

शेतकऱ्यांनो, दरमहा 55 रुपये जमा करा आणि मिळवा 3000 रुपये मासिक पेन्शन; जाणून घ्या काय आहे योजना…

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवते. या योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्यांसाठी आता सरकारने अशीच एक नवी योजना आणली आहे. यात दरमहा फक्त 55 रुपये जमा केल्यावर दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. काय आहे ही नवी योजना, त्यासाठी पात्रता काय ते जाणून घ्या.

वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकरी शेती करण्यास सक्षम राहत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. आता या नव्या योजनेमुळे त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे, तेही आपण जाणून घेऊया.

 

पीएम किसान मानधन योजना

सरकार शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवत आहे. पीएम किसान मानधन योजना (PMKMY) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना मासिक केवळ 55 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर त्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.

 

Nirmal Seeds

कोणते शेतकरी आहेत पात्र?

केंद्र सरकारने 2019 मध्ये ही प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली होती. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे, हा सरकारचा उद्देश होता. 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेले 18 ते 40 वयोगटातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांनुसार वेगवेगळे प्रीमियम भरावे लागतात. ज्याची किंमत दरमहा 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहे.

योजनेतून मिळणारे लाभ काय?

वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला निम्मे पेन्शन म्हणजेच 1,500 रुपये दरमहा दिले जातात.

Ajeet Seeds

 

अर्ज कसा करायचा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे शेतकऱ्यांना लॉग इन करावे लागेल. योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती त्यात भरावी लागेल. त्यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर लिंक मोबाईलवर येणारा ओटीपी टाकावा लागेल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल. तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

वेबसाईट : https://pmkmy.gov.in/

सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇