तमाम शेतकरी वर्गाला अभिमान वाटावी अशी जबरदस्त बातमी आहे. एकाच शेतकरी कुटुंबात तब्बल 11 आयएएस-आयपीएस अधिकारी आहेत. आजोबांनी पाहिलेल्या स्वप्नामुळे, जिद्दीने त्या ध्येयाचा पाठलाग करत राहिल्यामुळे, काळ्या मातीत पिढ्या न पिढ्या राबलेले, अशिक्षित कुटुंब आता भारतीय प्रशासन सेवेत कर्तव्य बजावत आहे.
तसे प्रत्येक मात्या-पित्याला वाटते की आपली मुले शिकून मोठी व्हावीत, उच्चशिक्षित होऊन चांगल्या पदावर नोकरीस लागावीत. तशाच धडपडीतील चौधरी बसंत सिंग श्योंकद या चौथी शिकलेल्या शेतकऱ्याची ही कथा आहे. विशेष म्हणजे कमी शिकलेले असूनही त्यांचे नेहमीच बड्या लोकांशी संबंध आणि अधिकाऱ्यांशी मैत्री होती. तेच संस्कार त्यांनी आपल्या चार मुलगे आणि तीन मुलींवर केले. या यशोगाथेचे नायक बसंत श्योंकद यांचे मे 2020 मध्ये निधन झाले.
पिंपळगाव बसवंत येथे 12 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन https://agroworldexpo.com/
नातवंडेही पुढे नेत आहेत वारसा
हे कुटुंब मूळचे हरियाणातील डूमरखान कलान या छोट्याशा गावातील. अस्सल, हाडाचे शेतकरी कुटुंब. बसंत सिंग श्योंकद यांच्या कुटुंबाच्या यशाची सुरुवात मुला-मुलींच्या यशाने झाली. आता पुढच्या पिढीत नातवंडेही तोच वारसा पुढे नेत आहे. त्यांचे चारही मुलगे क्लास वन अधिकारी झाले. त्यांच्या तीनही मुली पदवीधर झाल्या होत्या. एक सून आणि नातू आयएएस झाले. त्याचवेळी नातवाने आयपीएसची बाजी मारली. लेकीची लेक IRS आहे.
आई-मुलगा IAS, मुलगी IPS
बसंत सिंह यांचा मोठा मुलगा रामकुमार श्योकंद कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त झाला. त्यांची पत्नी जयवंती आयएएस आहे. रामकुमार यांचा मुलगा यशेंद्र हाही आयएएस आहे. मुलगी स्मिता चौधरी आयपीएस आहे. स्मितीचे पती राजेश कुमार बीएसएफमध्ये आयजी आहेत.
दोन मुले लष्करात बडे अधिकारी
बसंत सिंग यांचा दुसरा मुलगा सज्जन कुमार हा आर्मी कर्नल तसेच कॉन्फेडमध्ये जीएम होते. त्यांच्या पत्नी कृष्णा या डेप्युटी डीईओ झाल्या आहेत. तिसरा मुलगा वीरेंद्र एस.ई., त्यांची पत्नी इंडियन एअरलाइन्समध्ये डेप्युटी मॅनेजर आहे. बसंत सिंह यांच्या चौथ्या मुलाचे नाव गजेंद्र सिंह आहे. ते भारतीय लष्करात कर्नल म्हणून निवृत्त झाले आहेत. सध्या खाजगी वैमानिक म्हणून कार्यरत आहे.
Follow AGROWORLD on Google News
पिंपळगाव बसवंत येथे 12 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन https://agroworldexpo.com/
मुली, नाती यांचीही करिअरमध्ये आघाडी
बसंत सिंग यांच्या मुलीही यशस्वी आहेत. बसंत
सिंग यांची मोठी मुलगी बिमलाचे पती इंदर सिंग हे प्रख्यात वकील आहेत. त्यांचा मुलगा अनिल धुल हा बीबीएमबीमध्ये एसई व्हिजिलन्स आहे. दुसरी मुलगी कृष्णा प्राचार्य पदावरून निवृत्त झाली आहे. कृष्णाचा विवाह रघुबीर पंघल यांच्याशी झाला आहे, ते लष्करात मेजर होते आणि सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर, HAU मध्ये विभागप्रमुख होते. कृष्णा यांची मुलगी दया पंघाल ही ईटीओ आहे. मुलगा विक्रम हा डॉक्टर आहे. तिसरी मुलगी कौशल्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केले. तिचा पती रणधीर सिंग हे सार्वजनिक आरोग्याचे एसई आहेत. तिची मुलगी रितू चौधरी आयआरएस आहे आणि रितूचे पती अनुराग शर्मा हेही आयआरएस आहेत.
आयएएस फॅमिली म्हणून आदराचे स्थान
बसंत सिंह श्योकंद हे डूमरखान कलान या गावातून जिंद या जिल्ह्याच्या मुख्यालयात आले होते आणि तेव्हापासून त्यांचे कुटुंब येथे राहत आहे. चारही भावांची गावात वडिलोपार्जित जमीन आहे. विशेष म्हणजे चौधरी साहेबांच्या चारही मुलांचा एकमेकांवर अतूट विश्वास आहे. मोठा भाऊ रामुकमार सिंग शेतीचे संपूर्ण काम पाहतो आणि प्रत्येक भावाला मिळकतीचा वाटा देतो. वडिलांनी सर्वच भाऊ आणि बहिणींना तसेच इतर मुलांना हात देऊन सहकार्य करायला शिकवले. जिंदमध्ये त्यांनी एक हुशार मुलगा आणि मुलगी दत्तक घेतली आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. सध्या दोघेही महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहेत.