मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी जवळपास गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. मात्र, आता महाराष्ट्र सरकारकडून ड्रॅगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोहत्सानपर दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात हेक्टरी किती व कसे अनुदान मिळेल याची माहिती जाणून घेऊ.
शेतकऱ्यांचा कल आता आधुनिक शेतीकडे वाढत आहे. कमी वेळेत आणि कमी कष्ट करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रकारची फळे आणि भाज्या यांचेही उत्पादन घेवू लागले आहेत. यामध्ये त्यांना चांगला नफाही मिळतो. इतर फळांप्रमाणेच ड्रॅगन फ्रुटची लागवड भारतात खूप वेगाने लोकप्रिय होत आहे. दरम्यान, आता महाराष्ट्र सरकारनं ड्रगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
किती अनुदान मिळणार?
राज्य सरकारकडून एक हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी 4 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी हेक्टरी १ लाख 60 हजारांचं अनुदान अर्थात एकूण लागवड खर्चाच्या 40 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे 1 लाख 60 हजार रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं ड्रॅगन फ्रुट लागवड योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी 4 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरुवात झाली असून काही ठिकाणी याबाबत सोडत देखील झाल्याचं ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
अनुदान किती टप्प्यात मिळणार?
ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 60 टक्के म्हणजे 96 हजार रुपये दिले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 20 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात 20 टक्के अनुदान दिलं जाईल.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान मिळवण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर 0.20 हेक्टर जमीन असणं आवश्यक आहे. ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी अनुदान मिळवायचं असल्यास शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. त्यासाठी पासपोर्ट फोटो, सातबारा उतारा, 8 अ चा उतारा, आधार कार्डसोबत जोडलेलं बँक खातं, जातीचा दाखला आणि इतर कागदपत्रं आवश्यक आहेत.
ड्रॅगन फ्रूटचे प्रकार
पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ.
लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ.
पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ.
ड्रॅगन फ्रुटचे हे आहेत आरोग्यदायी फायदे
एकदम भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते. बाहेरुन जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात. त्या खाल्या तरी चालतात.
हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात विटामिन सी चे भरपूर कोठार. विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही.
ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही तरुण रसरसलेले दिसतात.
ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. साहिजकच एकदा पोट साफ असले की 90% व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते. म्हणजे डायिबटीस धोका टळला. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका रहात नाही. तसेच यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार सर्वावर मात करता येते.
खरे पाहता हे आंबट फळ आहे तरी यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डेंग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पण या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्या बरोबर हाडे पण मजबूत होतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- काय आहे MSME योजना ? ; छोट्या उद्योगांना कसे मिळते आर्थिक सहाय्य..!
- शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ; असा घ्या PMEGP योजनेचा लाभ
Comments 2