वॉशिंग्टन : कापूस टंचाई … यंदा कापसावर जागतिक संकट ओढवले आहे. हवामानातील गंभीर बदल, नैसर्गिक आपत्ती, कोविड साथीचा अजूनही जारी असलेला प्रकोप आणि राजकीय तणावामुळे जगातील टॉप-5 कापूस उत्पादक देशातील उत्पादन यंदा कमालीचे प्रभावित झाले आहे.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
पाकिस्तानात निम्मे पीक पावसाने वाया
या आठवड्यात, महापुरामुळे पाकिस्तानातील निम्म्याहून अधिक कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. पाकिस्तान हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे काऊस उत्पादक राष्ट्र आहे. जागतिक कापूस पुरवठ्यात पाकिस्तानचा सहा टक्के वाटा आहे. पाकिस्तानमधील जोरदार पावसाने देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला असून किमान 1,500 लोकांचा बळी घेतला आहे .
वस्त्रोद्योग कंपन्यांवर कापूस आयात करण्याची वेळ
पाकिस्तानातील नैसर्गिक संकटापूर्वीही हे वर्ष कापसासाठी तसे चांगले नाही. जगातील अव्वल उत्पादक असलेल्या भारतातही मुसळधार पाऊस आणि कीड अळीने कापूस उत्पादनावर परिणाम केला आहे. त्यामुळे देशाच्या वस्त्रोद्योग कंपन्यांवर कापूस आयात करण्याची वेळ आली. निम्म्याहून अधिक जिनिंग उद्योग बंद पडले. भारतातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या 35.3 दशलक्ष गाठींवरून, या वर्षी 33.51 दशलक्ष गाठींवर येण्याची शक्यता भारतीय कॉटन असोसिएशनने वर्तविली आहे.
जगातील आघाडीचे कापूस उत्पादक देश
भारतासह चीन, अमेरिका, ब्राझील आणि पाकिस्तान हे जगातील पाच आघाडीस कापूस उत्पादक देश आहेत. या सर्वच देशात सध्या असलेल्या काही ना काही समस्या कापसाच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.
टेक्सासमधील बहुतांश पिके दुष्काळात नष्ट
देशांतर्गत उत्पादनात अर्ध्याहून अधिक योगदान देणारे अमेरिकेतील सर्वात मोठे उत्पादक राज्य टेक्सासमधील बहुतांश कापूस पिके दुष्काळामुळे नष्ट झाली आहेत. राज्यात कापूस उत्पादन $2 अब्जपेक्षाही कमी म्हणजे नेहमीच्या तुलनेत जवळपास निम्मेच होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अमेरिकी कृषी मंत्रालयाने एकूण राष्ट्रीय अपेक्षित कापूस उत्पादनात 28% ने घट केली आहे. ही या दशकातील सर्वात कमी पातळी आहे.
जागतिक पुरवठा संतुलन, निर्यातीवर परिणाम
अमेरिका हा तिसरा सर्वात मोठा जागतिक उत्पादक आणि जगभरातील नंबर वन कापूस निर्यातदार देश आहे. अमेरिकेतील खालावलेल्या कापूस उत्पादनाने जागतिक पुरवठा संतुलन व निर्यात करण्यायोग्य पुरवठ्यावर मोठा प्रभाव पडेल, असे ग्रो इंटेलिजन्स या प्रमुख अमेरिकी कृषी डेटा फर्मने म्हटले आहे.
चीन, ब्राझीलमध्येही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव
चीन आणि ब्राझीलमध्येही यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. या आठवड्यात अखेरीस चीनमधील दुष्काळग्रस्त भागात थोडा पाऊस पडला; परंतु जूनपासूनच अमेरिकेने शिनजियांगमधील कापूस आयात करण्यास अमेरिकन कंपन्या आणि ग्राहकांना बंदी घातली आहे. हा चीनच्या पश्चिमेकडील स्वायत्त प्रदेशातून जगभारत 20% कापूस पुरवठा केला जातो. मात्र, चीन सरकारने तेथे दहा लाखांहून अधिक तुर्की उइगर मुस्लिम नागरिकांना सक्तीच्या छावण्यात डांबून ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीत मजूर, मशागत व लागवड, कापणी समस्या निर्माण झाल्या आहेत.
शिनजियांग कापूस मुक्त प्रमाणपत्र सक्तीचे
बंदीनंतरही शिनजियांग कापूस वापरून बनविलेला माल अजूनही अमेरिकी ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याची सरकारला शंका आहे. मध्यस्थ देशांद्वारे फिरवाफिरव व प्रक्रिया करून शिनजियांग कापूस अमेरिकेत पोहोचवला जात आहे. परंतु बिडेन प्रशासनाने टेक्सटाइल कंपन्यांना त्यांचा माल शिनजियांग कापूस मुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणे भाग पाडण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेत दहा वर्षांतील विक्रमी कापूस भाव
खालावलेल्या उत्पादनामुळे अमेरिकेतील कापसाच्या किमतीने दहा वर्षांचा विक्रम मोडला आहे. याचा परिणाम भारतावरही झाला असून येथे कापसाचे भावही विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. कापसाची तेजी आता थांबणार नसून भविष्यातही ती कायम राहणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
भारतातही उत्पादन खालावण्याच्या भीतीमुळे तेजी
भारतातही उत्पादन खालावण्याच्या भीतीमुळे कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात अस्थिरतेचे वातावरण आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यापर्यंत देशभरात 123.10 लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्ये कापसाची किंमत 50,000 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करण्याचा अंदाज येताच टेक्सटाइल कंपन्यांच्या दबावातून सेबीने भारतातील कापूस वायदा व्यवहार बंद केला आहे.
ऑगस्टमध्ये कापसाच्या भावात 15 टक्के वाढ
खरेतर, अतिवृष्टी आणि कापूस उत्पादक भागात कीटकांच्या शिरकावामुळे उत्पादन खालावण्याच्या अहवालामुळे भारतीय स्पॉट मार्केटमध्ये कापसाचे भाव वाढले होते. ऑगस्टमध्ये आतापर्यंत कापसाचे भाव सुमारे 15 टक्क्यांनी वाढले होते. त्यातच संततधार पावसाचा कापूस पिकावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे यावर्षी देशात अधिक उत्पादन अपेक्षित असल्याच्या सरकारी आकडेवारीकडे दुर्लक्ष करून कापसाच्या भावातील तेजी कायम आहे. तामिळनाडू आणि हरियाणात पावसाने कापसाचे मोठे नुकसान केले आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
Cotton Rate 2022 – शेतकऱ्याला 10 हजारांच्या वर भाव मिळू लागताच ‘सेबी’कडून कमोडिटी बाजारात कापूस व्यवहारांना महिनाभराची स्थगिती ; कापूस विक्रीची घाई करू नका
गुड न्यूज : खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता; डीएपीच्या जागतिक किमती 860 डॉलर्सपर्यंत घसरल्या
Comments 2