जळगाव : कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाच्या देशपातळी वरील आयोजित दोन दिवसीय कापूस शेतकरी कार्यक्रमातील प्रतिक्रिया होत्या. यावर्षी कापूस पिकाचे उत्पादन कमी आल्याने कापूस पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा न झाल्याने कापूस पिकाच्या क्षेत्र कमी होणार असून शेतकरी आता कापूस पिकाला पर्यायी पिकाच्या शोधात आहेत.
या वर्षातील कापसाचे कमी दर, कापूस पिकाचे मिळालेले कमी उत्पादन, अती पाऊस, गुलाबी बोंडअळी आणि बोंडसडची समस्या, कापूस वेचणीचे वाढलेले दर, मजुरांची समस्या, वाढलेला उत्पादन खर्च, कापूस लागवडीबाबत संभ्रमात आहे, कापूस बाबत नाराजी जाणवत आहे. या बाबींचा येणाऱ्या खरीप हंगामात कापूस लागवडीवर निश्चितच परिणाम करणार आहे. विचार करायला लावणाऱ्या आहे. पण, हे सत्य आहे. मागील वर्षापेक्षाही यावर्षी कापसाचे क्षेत्र हमखास कमीच होणार आहे. किती होईल हे आता सांगता येणार नाही.

गेल्या ४ – ५ वर्षांपासून सातत्याने कापूस पिकाचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. यावर्षी कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट होईल, असे शेतकऱ्यांच्या चर्चे वरून वाटते. आणि कापूस पिकाबाबतची नाराजी स्पष्ट जाणवली. कापूस पिकाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा यंदाही मात्र पुर्ण होऊ शकल्या नाहीत म्हणूनच शेतकरी पर्यायी पीक म्हणून मका, तूर, सोयाबीनचा विचार करीत आहेत कारण याचा उत्पादन खर्च कमी आणि मजुरांची समस्या कमी असते.
– डॉ. बी. डी. जडे
वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ
जैन इरीगेशन सिस्टीम्स लि.
