नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रश्न पडतो – बीएससी ॲग्री की बीटेक ॲग्री इंजिनिअरिंग? Bsc Agri or BTech Agri Engineering? हे दोन्हीही कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम लोकप्रिय असून चार वर्षांचेच आहेत. कृषी पदवीसाठी कोणता पर्याय अधिक उत्तम, ते आपण जाणून घेऊ…
बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रीकल्चर (बीएससी ॲग्री) म्हणजेच कृषी विषयात विज्ञान पदवीधर तर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन ॲग्रीकल्चर (बीटेक ॲग्री) म्हणजेच कृषी विषयात अभियांत्रिकी (तंत्रज्ञान) पदवीधर.
उत्तम तांत्रिक कौशल्याला कृषी क्षेत्रात मागणी
भारतातील राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यायामुळेच या क्षेत्रात उत्तम तांत्रिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची मागणी निर्माण झाली आहे. तथापि, या क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या वाढीबद्दल आणि भविष्यातील संभावनांबद्दल जागरूकतेचा मात्र अभाव आहे.
ॲग्रोवर्ल्ड वाचकांसाठी खास मोबाईल अपग्रेड ऑफर!
Bsc Agri or BTech Agri Engineering बीएससी ॲग्री की बीटेक ॲग्री इंजिनिअरिंग?
बीएससी ॲग्री अभ्यासक्रमाची रचना
बीएससी इन ॲग्रिकल्चर ही चार वर्षांची पदवी आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना कृषी विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देणे आहे. शेतीच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यासाठी हा एक आदर्श पर्याय आहे.
शेतीच्या पद्धतींशी परिचित होण्यास मदत
लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एलपीयु) कृषी विद्यालयाचे उपअधिष्ठाता चंद्र मोहन मेहता म्हणाले, “या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतीच्या पद्धतींशी परिचित होण्यास मदत होते. कोर्समध्ये मिळालेले प्रशिक्षण त्यांना उत्पादकता कशी वाढवायची आणि शाश्वत पद्धतीने कृषी गुणवत्ता कशी सुधारायची याचा विचार करण्यास मदत करते. त्यांना पर्यावरणपूरक आणि जैव-सुरक्षित पद्धतींचा वापर करून शेती कशी करावी, हे शिकवले जाते.”
बीटेक ॲग्री अभ्यासक्रमाची रचना
बीटेक ॲग्रिकल्चर (कृषी अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यात विद्यार्थ्यांना कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन वापरण्याची पद्धत शिकवली जाते.
अन्न-धान्य तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग परिचय
“बीटेक ॲग्री या कोर्समध्ये, शेतीमध्ये तंत्रज्ञान कसे वापरले जाते, यावर भर दिलेला असतो. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित कृषी प्रक्रिया यापुढे आवश्यक आहे. त्यामुळेच सर्व भारतीय कृषी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये बीटेक ॲग्री अभ्यासक्रम आता सुरू झालेले आहेत,” असे ‘एलपीयु’चे चंद्र मोहन मेहता यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाची व्याप्ती
यशस्वीरित्या बीएससी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ॲग्रीकल्चरमध्ये ॲग्री-बिझनेस मॅनेजमेंट कोर्स, ॲग्रीकल्चरमध्ये स्पेशलाइज्ड मास्टर ऑफ सायन्स (एमएससी) पदवी किंवा एमबीए करण्याचा पर्याय निवडता येतो. सार्वजनिक आणि खाजगी संस्था/ कंपन्यांमध्ये त्यांना चांगली व्यावसायिक पदे व वेतनमान मिळू शकते.
बीटेक ॲग्री विद्यार्थ्यांसाठी अनेक सरकारी नोकऱ्या
कृषी अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान बीटेक विद्यार्थ्यांना नॅशनल सीड कॉर्पोरेशन, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विविध राज्यायाईल फार्म कॉर्पोरेशन्स, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) मध्ये नोकऱ्या मिळू शकतात. याव्यतिरिक्त, ते अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (गेट) देण्यास पात्र ठरतात. मात्र, उच्च शिक्षणाच्या अनेक शक्यता असल्या तरी, व्यक्तींना तांत्रिक क्षेत्राऐवजी संशोधनात अधिक रस असेल तर कृषी विषयातील बीएससी हा श्रेयस्कर पर्याय असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले.
ॲग्रीसाठी देशातील उत्कृष्ट संस्था
भारतात काही उत्कृष्ट खाजगी आणि सरकारी कृषी महाविद्यालये आहेत. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ , जोधपूर येथील कृषी विद्यापीठ, आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर येथे उत्तम बीटेक शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील राहुरी कृषी विद्यापीठ, जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, बीकानेर येथील स्वामी केशवानंद राजस्थान कृषी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था, यांमध्ये बीएससी ॲग्रीकल्चर या पदवीचे उत्तम शिक्षण आहे.
बीटेक पदवीधरांना अधिक चांगल्या नोकरीच्या संधी
कृषी अभियांत्रिकी म्हणजेच बीटेक ॲग्रीला बीएस्सी ॲग्रीपेक्षा वरचढ नोकरीच्या संधी आहेत. रोजगार पर्याय आणि वेतनमान याच्या दृष्टीने बीटेक अधिक फायद्याचे राहू शकते. बीएस्सी ॲग्री पदवीधरांना वार्षिक सरासरी पॅकेज म्हणून सुमारे 3 लाख रुपये ऑफर केले जातात. तथापि, कृषी अभियांत्रिकीमधील बीटेक पदवीधरांसाठी सरासरी पॅकेज प्रति वर्ष 7 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. या प्रचंड तफावतीचे एक कारण म्हणजे कृषी शेतीच्या आधुनिक तंत्राची सध्याची गरज. बी टेक ग्रॅज्युएट्सना त्यांच्या समकक्ष बीएस्सी ॲग्री पदवीधरापेक्षा जास्त पगार दिला जातो.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘द राईट चॉइस’ या शैक्षणिक मालिकेत शिक्षणासंबंधी सामान्य प्रश्न, गैरसमज आणि पदवीपूर्व प्रवेशासंबंधीच्या शंकांचे निराकरण केले जाते. त्यातच लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एलपीयु) कृषी विद्यालयाचे उपअधिष्ठाता चंद्र मोहन मेहता यांनी ही तुलनात्मक माहिती सांगितली आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
अशी करा इलायची शेती ज्यातून होईल A-1 बंपर कमाई!
आधुनिक शेती : नाशिक जिल्ह्यातील उच्चशिक्षित जाधव कुटुंब दरवर्षी घेतेय 20 लाखांचे उत्पन्न Outstanding Practices!!
शेती ड्रोन : ॲग्री इन्फ्रा फंडने धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी गरूड ड्रोनसाठी मंजूर केले पहिले किसान ड्रोन कर्ज
अतिवृष्टीने कपाशीचे नुकसान; काय राहू शकतात कापूस दर? सविस्तर जाणून घ्या
Agree 👍