मुंबई : टोमॅटो म्हटले डोळ्यासमोर येतो तो लाल किंवा कच्चा टमाट्यांचा हिरवा रंग. परंतु, ब्रिटनमधील एका शेतकर्यांने चक्क काळा टोमॅटोची (Black tomatoes) शेती केली आहे. या टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असल्याने भारतात देखील या टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून शेतकर्यांसाठी हा टोमॅटो उत्पन्नाचे मोठे साधन ठरत आहे. चला तर मग जाणून घेवूया या टोमॅटोबद्दलची माहिती.
जगभरात खाल्ल्या जाणार्या काही भाज्यांपैकी टोमॅटो ही सर्वात लोकप्रिय भाजी आहे. टोमॅटोचा वापर जवळपास सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये केला जातो. एवढेच नव्हे तर टोमॅटोपासून सॉस (केचअप), प्युरी, रस, सूप, लोणचे देखील बनविले जात असल्याने त्याची जगात सर्वाधिक विक्री देखील होते. त्यामुळे शेतकर्यांकडून नियमित टोमॅटोची लागवड करून त्यातून चांगले उत्पन्न देखील घेतले जाते.
टोमॅटो म्हटल की, डोळयासमोर येतो तो लाल किंवा हिरव्या रंग, परंतु टोमॅटोचा रंग काळाही असतो, असे सांगितले तर यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. इंग्लंड येथील रे ब्राउनला यांनी जनुकीय उत्परिवर्तनातून काळे टोमॅटो तयार केले आहेत. त्याला इंडिगो रोज टोमॅटो (काळा टोमॅटो) असे नाव देण्यात आले. युरोपच्या बाजारपेठेत हा टोमॅटो सुपर फूड किंवा इंडिगो रोज टोमॅटो म्हणून ओळखला जातो. युरोपमध्ये प्रथम काळ्या टोमॅटोची रोपवाटिका तयार करण्यात आली. यामध्ये जांभळा टोमॅटो आणि इंडिगो गुलाब लाल रंगाच्या बियांचे मिश्रण करून नवीन बियाणे तयार करण्यात आले. ज्यापासून संकरित काळ्या टोमॅटोची उत्पत्ती झाली.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
भारतातही होतेय उत्पादन
काळ्या टोमॅटोची नर्सरी सर्वप्रथम ब्रिटनमध्ये तयार करण्यात आली होती. त्याची लागवडही प्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली. परदेशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारे ब्लॅक टोमॅटो (इंडिगो रोज टोमॅटो)चे आता भारतातही उत्पादन होत आहे. अनुकूल जमीन व हवामानामुळे भारतात अनेक ठिकाणी या टोमॅटोची लागवड केली जात आहे. झारखंडच्या रामगढमध्ये या काळ्या टोमॅटोच उत्पादन केले जात आहे.
हेक्टरी तीन ते पाच लाखांचा नफा?
काळा टोमॅटो उष्ण प्रदेशात चांगला पिकवता येतो. दंव झालेल्या भागात पिकण्यास त्रास होऊ शकतो. या टोमॅटोची लागवड पद्धत लाल टोमॅटोसारखीच आहे. यासाठी वेगळे काही करण्याची गरज भासणार नाही. 130 बिया असलेले ब्लॅक टोमॅटो सीड्सचे पॅकेट भारतातही उपलब्ध आहेत. शेतकरी त्याचे बियाणे ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. काळ्या टोमॅटोची रोपवाटिका जानेवारी महिन्यात तयार करून त्याची तयार रोपवाटिका मार्च अखेरीस लावता येते.
काळा टोमॅटो लाल टोमॅटो पेक्षा थोड्या जास्त वेळाने पिकतो. लाल टोमॅटो साधारण तीन महिन्यांत पिकतात, परंतु या टोमॅटोला पिकायला तीन ते चार महिने लागतात. काळ्या टोमॅटोच्या लागवडीचा खर्च लाल टोमॅटोएवढा आहे. त्याच्या लागवडीत फक्त बियाणांचा खर्च वाढतो. लागवडीचा खर्च काढल्यास हेक्टरी तीन ते चार लाखांचा नफा मिळू शकतो. त्यामुळे काळ्या टोमॅटोचे पीक हे शेतकर्यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे उत्तम साधन बनू शकते.
अशी करा जमिनीची निवड
काळ्या टोमॅटोची रोपवाटिका प्रथम ब्रिटनमध्ये तयार करण्यात आली होती, परंतु आता भारतात अनेक भागात त्याची लागवड केली जात आहे. येथील माती आणि हवामान त्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. काळ्या टोमॅटोचे उत्पादन ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते ते आता झारखंडच्या रामगढमध्ये देखील घेतले जात आहे. येथील हवामान काळ्या टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे येथील शेतकरी सांगतात. लाल टोमॅटोप्रमाणेच त्याची लागवड सर्व प्रकारच्या मातीत जसे की गुळगुळीत, चिकणमाती, काळी लाल माती इत्यादीमध्ये यशस्वीपणे करता येते. परंतु ज्या ठिकाणी लागवड करायची आहे, त्या ठिकाणची माती सेंद्रिय पदार्थांनी युक्त आणि पाण्याचा चांगला निचरा करणारी असावी. भारतात झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये या टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे.
अशी आहे या टोमॅटोचे वैशिष्ट्य
काळा टोमॅटोचा उपयोग कॅन्सरशी लढण्यासोबतच इतर अनेक आजारांवर होतो. काळे टोमॅटो सुरुवातीच्या अवस्थेत किंचित काळे असतात आणि पिकल्यावर पूर्णपणे काळे होतात. तोडल्यानंतरही ते बरेच दिवस ताजे राहतात आणि लवकर खराब होत नाही. त्यातही कमी बिया असतात आणि ते दिसायला काळे असले तरी आतून लाल रंगाचे असतात. काळ्या टोमॅटोच्या बिया देखील सामान्य लाल टोमॅटोसारख्याच असतात. लाल टोमॅटोच्या तुलनेत त्याची चव किंचित खारट आहे. जास्त गोड नसल्यामुळे साखरेच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे. शुगर आणि हृदयरोगाचा त्रास असलेले व्यक्ती काळ्या टोमॅटोचे सेवन सहज करू शकतात.
काळ्या टोमॅटोमधील औषधी गुणधर्म
काळ्या टोमॅटोमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन-ए, सी, खनिजे, लोह फॉस्फरस आणि इतर खनिज क्षार यांसारखे अनेक प्रकारचे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यात फ्री रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता आहे, ज्यामुळे कॅन्सरपासून बचाव करण्यात खूप मदत होते. याशिवाय त्यात अँथोसायनिन असते, जे हृदयविकाराचा झटका टाळते. एवढेच नाही तर यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे काळ्या टोमॅटोचे उत्पादन आणि सेवन दोघेही फायदेशीर मानले जात आहे.